إعدادات العرض
सर्वोच्च अल्लाह ने फरमाविले आहे की:{आणी जे कुणी अल्लाह ने पाठवलेल्या आदेशानुसार निर्णय करणार नाहीत, तर असेच लोकं…
सर्वोच्च अल्लाह ने फरमाविले आहे की:{आणी जे कुणी अल्लाह ने पाठवलेल्या आदेशानुसार निर्णय करणार नाहीत, तर असेच लोकं सत्याचे ईंकारी आहेत}
हजरत इब्ने अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: सर्वोच्च अल्लाह ने फरमाविले आहे की:{आणी जे कुणी अल्लाह ने पाठवलेल्या आदेशानुसार निर्णय करणार नाहीत, तर असेच लोकं सत्याचे ईंकारी आहेत} [अल माएदा: ४४] आणी {तेच लोकं खरे अत्याचारी आहेत} [अल माएदा: ४५] आणी {तेच लोकं विद्रोही आहेत} [अल माएदा: ४७] ईब्ने अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी फरमावितात की:सदर आयत दोन यहुदी जमाती बद्दल अवतरली, अज्ञान काळात एक जमात दुसऱ्यावर वरचढ ठरत होती, त्या वरचढ ठरलेल्या जमातीने ठरवले की, जर कमतर जमातीने अगर कुणाला ठार केले तर त्याकडुन ५० वस्क वसुल करण्यात येईल, आणी जर वरचढ जमाती पैकी कुणाला ठार केले तर मात्र १०० वस्क वसुल करण्यात येईल, ही पद्धत अशाच प्रकारे प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर मदिना आगमनापर्यंत चालु होती, परंतु प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आगमनाने दोन्ही जमाती नरम पडल्या, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्यांच्यावर सक्ती केली नाही, ना त्यांच्या जमीनी हिसकावल्या, कारण ते (सुलह) शांती करारात होते, त्यादरम्यान कमतर जमाती पैकी एका व्यक्तीने प्रबल असलेल्या व्यक्तीला ठार केले, वरचढ जमातीने कमतर जमातीला आदेश दिला की, त्यांना पत्र लिहिले, तुम्हाला १०० वस्क द्यावे लागतील, कमतर जमातीने उत्तर दिले की, काय असे कधि होऊ शकते की, ज्यांचा धर्म एक, वंशावळ एक, शहर एक असेल परंतु एकाची दैत दुसऱ्यांच्या अर्धि कशी? आम्ही आतापर्यंत दय्या फक्त भीती पोटी दिली होती, परंतु आता प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आले आहेत, आता मात्र आम्ही देऊ शकत नाही, हे प्रकरण युद्धा पर्यंत पोहचले, मग दोन्ही जमातींनी ठरवले की, प्रकरण प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर निर्णय करावा, नंतर वरचढ जमाती ने ठरलले की, अल्लाह शपथ मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला ते देऊ शकत नाहीत जे आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, आणी हे एकदम सत्य आहे, आम्ही जे काही केले ते सर्व जुलुम व अत्याचार होते,म्हणून त्यांनी मुहम्मद यांच्याकडे गुपचूप असा एक माणूस पाठवला,जो तुमच्यासाठी त्यांचे मत जाणून घेईल,ते म्हणाले: जर त्यांनी तुम्हाला हवे ते दिले, तर त्यांना न्यायनिर्णायक (हाकीम) मानावे, आणि जर त्यांनी तुम्हाला हवे ते दिले नाही, तर त्यांच्यापासून सावध राहावे आणि त्यांना न्यायनिर्णायक मानू नये, मग त्यांनी रसूलुल्लाह यांच्याकडे काही मुनाफिक लोक पाठवले, जे त्यांच्यासाठी रसूलुल्लाह यांचे मत जाणून घेतील, नंतर त्यांनी दांभिक कडुन प्रेषितां कडे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर निरोप पाठविला की, त्यांनी आमच्या दरम्यान न्याय करावा, जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आले तेव्हा त्यांना एकमेव अल्लाह ने त्यांचे मनसुब्यांनी अवगत केले, त्यावर सदर आयत अवतरली {पैगंबरा! त्या लोकांमुळे तुम्ही दुःखी होऊ नका, जे ईंकार करण्यात घाई करत आहेत, काही म्हणतात की आम्ही ईमान आणले} [अल माएदा: ४१] ते {जे कुणी अल्लाह ने प्रकट केलेल्या आदेशानुसार निर्णय करत नाही, तेच लोकं विद्रोही आहेत} [अल माएदा: ४७] इब्ने अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की सर्वोच्च अल्लाह ने सदर आयत याच कारणामुळे अवतरीत केली.
الترجمة
العربية Português دری Македонски Tiếng Việt Magyar ქართული Indonesia Kurdî বাংলা ไทย ភាសាខ្មែរ অসমীয়া Nederlands ਪੰਜਾਬੀ Kiswahili Hausa Tagalog English Français ગુજરાતી Русскийالشرح
मदिना मध्ये दोन कबिले बनु कुरैजा आणी बनु नजीर होते, अंधकार युगात एक कबिला दुसऱ्या वर वरचढ तो विजयी ठरत असे, विजयी जमात ने ठरवले की, जो व्यक्ती कमजोर कबिल्या्च्या हातुन मारला जाईल, त्याची दैत (भरपाई) १०० वस्क असेल, आणी जो व्यक्ती विजयी कबिल्या कडुन मारल्या जाईल, त्याची दैत (भरपाई) ५० वस्क असेल,एक वस्क साठ साअ बरोबर आहे. सदर व्यवस्था अशीच कायम राहली, जोपर्यंत प्रेषित सलामती असो त्यांच्यावर मदिना हिजरत करून आले नाही, आणी दोन्ही कबिल्यांनी त्यांच्या थांबण्याला मान्यता दिली, अजुन प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आपल्या शत्रूंवर विजय मिळविला नव्हता, ना ही त्यांना अनुसरण करण्यास मजबुर केल्या गेले; कारण हिजरत च्या सुरुवातीचा काळ होता. त्यादरम्यान कमजोर गटातिल व्यक्ती ने मजबुत गटातिल एकाला ठार केले, विजयी गटाने कमजोर गटाला सांगितले की:ठरलेल्या करारानुसार आम्हाला १०० वासक दैत भरपाई अदा करावी, त्यावर कमजोर गटाने उत्तर दिले की:कधि असे झाले आहे का, आम्हा सर्वांचा धर्म एक, वंश एक, व शहर एक असतांना सुद्धा कुणाची दैत अर्धि कुणाची पुर्ण का?! आतापर्यंत आम्ही दैत ची रक्कम फक्त तुमच्या जूलुम व भितीपोटी भरली खरी, परंतु आता जेव्हा प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम आले आहेत, आता आम्ही कदापिही असे करणार नाही. हा विषय युद्धाच्या अवस्थेत पोहचला, मग दोन्ही जमातींनी ठरवले की, हे प्रकरण मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लमच या प्रकरणात न्याय देतील, विजयी गटाने विचाराअंती सांगितले की:अल्लाह ची शपथ मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जो निर्णय देतील, तो आमंच्यापेक्षा जास्त न्यायसंगत ठरेल, आम्ही दैत फक्त जुलुम व भितिपोटी भरली होती, मग त्यांनी गुपचुपपणे आपल्या प्रतिनिधी पाठविले: तो तुमच्यासाठी त्यांचे मत जाणून घेईल, जर त्यांनी तुम्हाला जे हवे आहे ते दिले, तर त्यांना न्यायनिर्णायक (हकम) बनवा, आणि जर त्यांनी तुमच्या इच्छेप्रमाणे दिले नाही, तर त्यांना सोडून द्या आणि त्यांच्याकडे न्यायासाठी जाऊ नका. जेव्हा हे लोकं मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम पर्यंत पोहचले, तेव्हा सर्वोच्च अल्लाह ने वहि द्वारे प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना या विषयाची व त्यांच्या ईराद्याची खबर दिली, अल्लाह ने सुरह माएदा मध्ये सविस्तर वर्णन केले:{पैगंबरा! त्या लोकांमुळे तुम्ही दुःखी होऊ नका, जे ईमान आणल्याचा दावा करतात, आणी घाई घाईत ईंकार (कुफ्र) अंगीकारतात, यांच्यापैकी काही मुखाने ग्वाही देतात की आम्ही ईमान आणले} [अल माएदा: ४१]. सरतेशेवटी फरमाविले:{आणी जो अल्लाह ने पाठविलेल्या शरियत नुसार निर्णय करत नाहीत, तेच लोकं (फासिक) विद्रोही आहेत} [अल माएदा: ४७] मग इब्ने अब्बास रजिअल्लाहु अनहु सांगतात की:सदर आयत या दोन कबिल्याबाबत अवतरित करण्यात आली आहे: {आणी जो अल्लाह ने पाठविलेल्या ग़्रंथानुसार निर्णय करणार नाहीत, असेच लोकं सत्याचे ईंकारी आहेत} [अल माएदा: ४४] आणी {तेच लोकं अत्याचारी आहेत} [अल माएदा: ४५] आणी {तेच लोकं विद्रोही आहेत} [अल माएदा: ४७] या दोन कबिल्यांना उद्देशून वरिल आयत अवतरली आहे.فوائد الحديث
यहुदी लोकांकडुन मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम ची सत्यता व अमानतदारी जाणणे.
यहुदी लोकांची चतुरता व अन्याय प्रदर्शित होतो, ते आपल्या लोकांना सुद्धा सोडत नव्हते.
सर्वोच्च अल्लाह तर्फे स्पष्ट आयत यहुदींना जगामध्ये फजिती व परलोकात मोठी यातना.
अल्लाह च्या पाठवलेल्या आदेशानुसार निर्णय न करणे व मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या दिलेल्या निर्णयावर समाधानी न होणे, (कुफ्र) अल्लाह विरुद्ध बंड, जुलुम, व विद्रोहाचे प्रतीक आहे.
मुनाफिकांचा धोका आणि यहुद्यांसोबत त्यांचे सहकार्य.
التصنيفات
Occasions of Revelation