प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम लैंगिक संबंधा‌नंतर ची आंघोळ केवळ एक साअ पाण्यातच उरकत होते,…

प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम लैंगिक संबंधा‌नंतर ची आंघोळ केवळ एक साअ पाण्यातच उरकत होते, आणी वुजु एका मुद पाण्यात करत होते

हजरत सफिना रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम लैंगिक संबंधा‌नंतर ची आंघोळ केवळ एक साअ पाण्यातच उरकत होते, आणी वुजु एका मुद पाण्यात करत होते.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम अशुद्धी पासुन शुद्धी प्राप्ती साठी एक साअ पाणी द्वारे करत होते, आणी वुजु एक मुद पाण्याने, एक साअ चार मुद बरोबर आहे, आणी एका सामान्य शरीरयष्टी असणाऱ्या माणसाच्या दोन्ही तळहातात जेवढे पाणी मावते तेवढ्या पाण्याला एक मुद म्हणतात.

فوائد الحديث

शुद्धी करता वुजु असो की आंघोळ पाणी जपुन वापरणे योग्य आहे, तसेच पाण्याचा गैरवापर करणे योग्य नाही, मग पाणी मुबलक उपलब्ध असले तरीही जपून वापरावे.

वुजु व गुस्ल म्हणजे आंघोळी मध्ये गरजेनुसार वापरणे, प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या आचरणातुन स्पष्ट होते.

उद्देश हाच आहे की, वुजु आणी आंघोळ पुर्णपणे पैगंबरांच्या शिकवणीनुसारच अदा करणे जरुरी आहे, पाणी वापरतांना अपव्यय सुद्धा नको तर अति काटकसर सुद्धा नको, पाण्याचा वापर कमी किंवा जास्त परिस्थिती नुसार ठरवणे आवश्यक आहे.

जनाबत त्या अवस्थेला म्हणतात ज्यामध्ये विर्य पतन झाले किंवा लैंगिक संबंध पुर्ण झाले असल्यास, या परिस्थितीला जनाबत (अशुद्ध) यामुळे म्हणतात कारण अशा अवस्थेत तो व्यक्ती नमाज किंवा ईतर उपासना बजावण्यापासुन दुर राहतो, जोपर्यंत शुद्धता प्राप्त करत नाही.

साअ एक मोजमापाचे प्रसिद्ध साधन आहे, अर्थात साअ ए पैगंबरी आहे, उत्तम प्रतिच्या गहु च्या हिशेबाने ४८० मिश्काल बरोबर आहे, आणी लिटर च्या हिशेबाने ३ लिटर च्या जवळपास असते.

तसेच मुद एक शरियत चे मोजमाप आहे, जे एका सर्वसामान्य माणसाच्या दोन्ही तळहाता मध्ये जेवढे पाणी जमा होऊ शकते,

विद्वानांच्या मते एक मुद साअ च्या चतुर्थांश एवढा असतो, त्याचे वजन जवळपास ७५० मिली लिटर एवढे असते.

التصنيفات

Recommended Acts and Manners of Ablution, Recommended Manners of the Ritual Bath