मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना बघितले, त्यांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी लघवी केली त्यानंतर वुजु…

मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना बघितले, त्यांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी लघवी केली त्यानंतर वुजु पुर्ण केला, आणी आपल्या मोजांवर मसा (ओला हात मोजा वरुन फिरविणे) केला

हजरत इब्राहिम नखई रहमहुल्लाह हम्माम बिन हारीस रहमहुल्लाह कडुन वर्णन करतात की: हजरत जरीर रजिअल्लाहु अनहु नी लघवी केली, त्यानंतर वुजु पुर्ण केला व आपल्या मोजावर मसा केला, लोकांनी त्यांना विचारले की:काय तुम्ही असे करता? ते म्हणाले:होय, मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना बघितले, त्यांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी लघवी केली त्यानंतर वुजु पुर्ण केला, आणी आपल्या मोजांवर मसा (ओला हात मोजा वरुन फिरविणे) केला. आमश रहमहुल्लाह सांगतात की: इब्राहिम रहमहुल्लाह नि सांगितले की:लोकांना हि हदिस फार आवडत असे, कारण हजरत जरीर रजिअल्लाहु अनहु यांनी ईस्लाम चा स्वीकार सुरह मायदा च्या अवतरणा नंतर केले होते.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

हजरत जरीर बिन अब्दुल्ला रजिअल्लाहु अनहु नि लघवी केली मग वुजु पुर्ण केला, त्यानंतर पाय धुण्या ऐवजी आपल्या मोजांवर मसाअ (ओला हात फिरविला) केला, त्यावर तिथे उपस्थित लोकांनी आश्चर्याने विचारले:तुम्ही असे करत आहात?! त्यावर हजरत जरीर रजिअल्लाहु अनहु म्हणाले:मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना असे करतांना बघितले आहे, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी लघवी केली, मग वुजु पुर्ण केला, त्यानंतर मोजांवर मसाअ केला. हजरत जरीर रजिअल्लाहु अनहु चा ईस्लाम हा सुरह मायदा अवतरणा नंतर चा आहे, ज्यामध्ये वुजुबाबत सखोल माहिती देण्यात आली आहे, यावरुन माहित होते की, मोजांवर मसाअ या आयत मुळे रद्दबातल झाला नाही ‌.

فوائد الحديث

सहाबांची (सोबत्यांची) व ताबयींची प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या पद्धतींचे अनुकरण करण्याची तिव्र तळमळ या हदिस मध्ये झळकते.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:ज्या विद्वान मंडळी चा ईज्मा विश्वासपात्र आहे, त्या सर्वांचे यावर एकमत आहे की, प्रवासात वा मुक्कामी अवस्थेत मोजांवर मसाअ योग्य आहे, मग काही कारणाने असो की विनाकारण असो, इथपर्यंत घरगुती महिला असो किंवा अपंग किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो, जो चालु फिरु शकत नाही , त्याला मसाअ करणे योग्य आहे.

हजरत जरीर रजिअल्लाहु अनहु ची महानता सिद्ध होते की, ते खुफ हिम्मतवान व जिगरबाज होते, शीष्यांकडुन उठणाऱ्या मारक प्रश्नांना ते सहन करत होते.

त्या लोकांची चुक स्पष्ट होते, जे लोकं मोजांवर मसाअ ला रद्दबातल समजतात; कारण जरीर रजि.ची हदिस वुजु बाबत आयती पुढील काळातली आहे.

हे सुध्दा सिद्ध होते की जर कुणावर एखाद्या कर्माबाबत आक्षेप घेतला गेला, आणी तो व्यक्ती त्या कर्माला दुरुस्त समजत असेल, तर त्याने रागावु नये, त्याउलट सुंदर पद्धतीने प्रमाणासहित उत्तर दिले पाहिजे.

वेळप्रसंगी ऐतिहासिक क्रमवारीने प्रमाण देण्याचे महत्त्व स्पष्ट होते.

التصنيفات

Wiping Over Leather Socks and the like