إعدادات العرض
जर ते त्या अग्नी मध्ये दाखल झाले असते तर कयामतच्या दिवसा पर्यंत त्यामधुन निघाले नसते; आज्ञापालन फक्त सत्कर्मातच…
जर ते त्या अग्नी मध्ये दाखल झाले असते तर कयामतच्या दिवसा पर्यंत त्यामधुन निघाले नसते; आज्ञापालन फक्त सत्कर्मातच आहे
हजरत अली अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एक लष्कर रवाना केले आणी त्यावर एका अंसारी सहाबीला प्रमुख नेमले, व त्या प्रमुखाचे आज्ञापालन करण्याचा आदेश पण दिला, तो प्रमुख रागाच्या भरात आपल्या सोबत्यांना उद्देशुन म्हणाला की:काय प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर माझ्या आज्ञापालनाचा तुम्हाला आदेश दिला नाही? सोबती म्हणाले:होय का नाही, तो म्हणाला:तर लाकडं जमा करा, लाकडं जमा करण्यात आली, मग तो म्हणाला:आता त्यामध्ये आग लावा, त्या सर्वांनी त्या लाकडात आग लावली, मग तो प्रमुख म्हणाला:आता या आगीत तुम्ही उडी मारा, ते त्या आगीत उडी घेणारच होते, की ते एकमेकांना आलिंगन देऊ लागले, व म्हणाले: आम्ही सर्व प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर अग्नी पासुन वाचण्याकरता आलो होतो, तर मग त्यात का बरे जाऊ? परंतु थोड्या वेळात ति आग विझली, व त्या प्रमुखाचा राग सुद्धा शांत झाला, हा सर्व प्रकार प्रेषितांसमोर अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मांडण्यात आला, त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<जर ते त्या अग्नी मध्ये दाखल झाले असते तर कयामतच्या दिवसा पर्यंत त्यामधुन निघाले नसते; आज्ञापालन फक्त सत्कर्मातच आहे>>.
الترجمة
العربية বাংলা دری Português Македонски Tiếng Việt Magyar ქართული ไทย Bahasa Indonesia Kurdî Hausa অসমীয়া English ગુજરાતી Nederlands Kiswahili ਪੰਜਾਬੀ Tagalog ភាសាខ្មែរ සිංහල Русскийالشرح
प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एक लष्कर पाठवले व एका अंसारी सहाबीला प्रमुख नेमले, आणी ईतर साहाबांना आपल्या प्रमुखांचे आज्ञापालन करण्याचा आदेश दिला, परंतु त्या प्रमुखाला कुण्या कारणाने राग आला, व तो म्हणाला:काय प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर तुम्हाला माझे आज्ञापालन करण्याचा आदेश दिला नाही? ते सर्व म्हणाले:का नाही, तर त्याने हुकुम सोडला की:लाकडं जमा करावी, व त्यात आग लावा, मग त्या अग्नीत तुम्ही सर्व उडी मारा, नंतर ते अग्नी मध्ये उडी घेणारच होते की ते एकमेकांना बघु लागले. आणि म्हणाले: आम्ही तर प्रेषितांचे सलामती असो त्यांच्यावर अनुसरण अग्नी पासुन वाचवण्याकरता केले होते, मग आम्हीच अग्नी मध्ये का बरे दाखल व्हावे? त्यादरम्यान आग विझली, व प्रमुखाचा राग हि थमला. हा सर्व किस्सा प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर सांगण्यात आला, त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:जर ते अग्नी मध्ये दाखल झाले असते तर जगमिटेपर्यंत त्याच प्रकोपात झुंजले असते, व त्यातुन बाहेर निघाले नसते, कोणत्याही व्यक्ती चे अनुसरण निर्माणकर्त्याच्या आज्ञेविरुद्ध अमान्य आहे, आज्ञापालन फक्त नेकी व सदाचारातच आहे, दुष्कार्यात कदापिही नाही.فوائد الحديث
सदर हदिस वरुन स्पष्ट होते की, आज्ञापालन फक्त सदाचारातच मान्य आहे, दुराचारात नाही, मग आदेश देणारा तोच का असेना ज्याचे आज्ञापालन अनिवार्य असेल.
गन्हेगार मग तो एकेश्वरवादी मुसलमान असला तरी त्याला अग्नी ची धमकी देण्यात आली आहे, परंतु सर्वोच्च अल्लाह च्या मर्जीनुसार त्याला माफी सुद्धा मिळु शकते.
युद्धात प्रमुख नेमणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे प्रवासात सुद्धा प्रमुख नेमणे हा धर्मादेश आहे.
