तुमच्या कुरआन मध्ये एक आयत अशी आहे, जर तशी आयत आम्हा यहुद्यांकडे अवतरली असती तर आम्ही त्या दिवसाला ईद चा दिवस…

तुमच्या कुरआन मध्ये एक आयत अशी आहे, जर तशी आयत आम्हा यहुद्यांकडे अवतरली असती तर आम्ही त्या दिवसाला ईद चा दिवस म्हणुन साजरा केला असता

उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की: एकदिवस एक यहुदी व्यक्ती त्यांना म्हणाला: हे ईमानधारकांचे ईमाम, तुमच्या कुरआन मध्ये एक आयत अशी आहे, जर तशी आयत आम्हा यहुद्यांकडे अवतरली असती तर आम्ही त्या दिवसाला ईद चा दिवस म्हणुन साजरा केला असता, उमर रजिअल्लाहु अनहु नि विचारले की कोणती आयत? तो म्हणाला:{अलयवमाअकमलतु लकुम दिनकुम व अतममतु अलैकुम नियमती व रजितु लकुमुल ईस्लामा दिना} [अल माऐदा:3] आज मी तुमच्या धर्माला नेहमीसाठी परिपुर्ण केले आहे, आणी असे करुन तुमच्यावर क्रॄपा केली, आणी तुमच्यासाठी धर्म म्हणुन ईस्लाम ची निवड केली आहे, हजरत उमर रजिअल्लाहु अनहु फरमावितात की:मी तो दिवस सुद्धा जाणतो व आणी ती जागा सुद्धा जाणतो, जिथे सदर आयत प्रेषित मुहम्मदांवर सलामती असो त्यांच्यावर अवतरली, हि आयत जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर अराफात च्या मैदानात उभे असतांना अवतरली, आणी त्या दिवसी शुक्रवार होता.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

एक यहुदी व्यक्ती उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कडे येउन म्हणाला की:कुरआन मध्ये एक अप्रतिम आयत आहे, जर तशी तौरात मध्ये अवतरली असती तर आम्ही त्या दिवसाला ईद साजरी केली असती,आणी त्या देणगी प्रति क्रॄतघ्नता म्हणुन हर्षोल्लास साजरा केला असता, उमर रजिअल्लाहु अनहु नि विचारले की:कोणती आयत? तो म्हणाला:{अलयवमाअकमलतु लकुम दिनकुम व अतममतु अलैकुम नियमती व रजितु लकुमुल ईस्लामा दिना}. त्यावर हजरत उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर म्हणाले:सदर आयत ज्या दिवसी अवतरली तो मुसलमाना करिता ईद चा दिवस होता, कारण तो शुक्रवार चा दिवस होता, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर त्या वेळी अराफत मैदानात होते, आणी हे दोन्ही दिवस मुस्लीमांसाठी फार पवित्र व बरकतीने भरलेले आहेत.

فوائد الحديث

सदर हदिस वरुन सिद्ध होते की, उमर बिन खत्ताब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कुरआन च्या अवतरण व ठिकाण चे ते जाणकार होते.

वरील आयत अल्लाह च्या क्रॄपावर्षाव ला प्रकटित करते, जी मुस्लीम उम्मा ला साक्षात अल्लाह ने भेट दिली आहे, त्याने त्यांचा धर्म पुर्णत्वास केला, आपली अतुल्य दया पुर्ण केली, आता धर्मात कुठलाही फेरबदल शक्य नाही, धर्म पुर्ण झाल्यावर जो कुणी नवनवीन पद्धत सामील करील, ज्यांचे ठोस प्रमाण उपलब्ध नसेल तर अशी पद्धत भटकलेली (बिदअत) मार्गभ्रष्टता आहे,

जसे प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट केले आहे:"ज्याने आमच्या धर्मात नवीन पद्धत काढली, जे धर्मात नव्हती तर ती पद्धत मरदुद अस्वीकार्य आहे".

अजुन एक गोष्ट स्पष्ट होते की, ईदोत्सव मानवी इच्छेने किंवा मानवनिर्मित सण नाहीत, जशी पुर्वीच्या उम्मतांकडुन घोडचुक झाली होती; किंबहुना ईदोत्सव शरियत द्वारा ठरवुन दिलेली असते,

कारण सदर आयत धर्म पुर्ण असल्याची व क्रॄपावर्षाव सुद्धा पुर्ण झाल्याचे स्पष्ट प्रमाण आहे, म्हणुनच सर्वोच्च अल्लाह ने सदर आयत करता याच दिवसाची निवड केली, या उम्मत समुदाया करिता दोन कारणाने हा दिवस ईद बनवला गेला,

१] साप्ताहिक ईद म्हणजे जुमा शुक्रवार चा दिवस,

२] हज्ज ची ईद अराफत चा दिवस जो‌ हज्ज यात्रेकरुंचा सर्वात मोठा मेळावा व पवित्रमय ठिकाण आहे.

अल्लामा साअदी रहमहुल्लाह या आयत बद्दल स्पष्ट करतात की:

{अलयवमा अकमलतु लकुम दिनकुम}

अर्थात पुर्ण विजय, तसेच बाह्य व आंतरीक शरियत ची परिपुर्णता, नियम व कायदे सर्वांनाच पुर्णत्वास नेण्याचे कार्य शरियत ने केले आहे, एकंदरीत सार हा आहे की, कुरआन व हदिस च संपुर्ण विषयात सखोल मार्गदर्शन करिता पुरेसे आहेत, जो व्यक्ती असा अंदाज करत असेल की, लोकांना धार्मिक ज्ञान संपादन करण्या करिता कुरान व हदिस च्या व्यतिरिक्त अन्य ज्ञानाची सुद्धा गरज आहे, तर असा व्यक्ती अज्ञानी व त्याचा अनुमान चुकीचा आहे, त्याचा एक अर्थ असा होतो की, धर्म त्या विना अधुरा आहे, आणी असे समजणे म्हणजे अल्लाह व प्रेषितांवर सलामती असो त्यांच्यावर मोठे जुलुम आहे,

{व अतममतु अलैकुम नियमती}

म्हणजे बाह्य व आंतरीक देणग्या पुर्ण केल्या,

{व रजितु लकुमुल ईस्लामा दिना}

आणी मी तुमच्या करिता ईस्लाम ला धर्म म्हणुन पसंद केले, आणी तुम्हाला त्याच्या करिता पसंद केले, बस्स तुम्ही तुमच्या पालनकर्ता ची क्रॄतघ्नता व्यक्त करा, आणी त्याची स्तुती करा, ज्याने तुम्हाला उच्चतम व सर्वोपरी तसेच सर्वच बाबतीत परिपुर्ण धर्म प्रदान केला.

التصنيفات

Virtues of Surahs and Verses