إعدادات العرض
हकीम,हा पैसा व संपत्ती आकर्षक व गोड
हकीम,हा पैसा व संपत्ती आकर्षक व गोड
हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु स्वतः विषयी सांगतात की: मी प्रेषितांजवळ पैसाचा सवाल केला, प्रेषितांनी [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]मला पैसे दिले, मी पुन्हा मागीतले, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी मला पुन्हा दिले, मी अजुन सवाल केला, प्रेषितांनी मला पुन्हा दिलं, तद्नंतर मला समजाविले की, अरे!<< हकीम,हा पैसा व संपत्ती आकर्षक व गोड आहे,बस्स ज्याने याला उदार व भरलेल्या त्रुप्त मनाने घेतले, त्याच्या करता त्यात बरकत टाकली जाते, व ज्याने या मालमत्तेला हवास्यापोटी व लालसेने घेतले त्याची बरकत समाप्त करण्यात येते, व तो व्यक्ती असा बनतो,जसे जेवण तर करतो पण पोट भरत नाही, देणारा हात घेणाऱ्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे>>, हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु सांगतात की:यावर मी म्हणालो की:हे प्रेषिता ! [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] त्या अल्लाह ची शपथ ज्याने तुम्हाला सत्यधर्मानिशी पाठविले, यापुढे मी मरण येईपर्यंत कुणालाही काहीच मागणार नाही, तद्नंतर अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु नी हकीम बिन हजाम ला काही भेट देण्यासाठी बोलाविले परंतु ते नकार देत असत, नंतर उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु नी सर्वांसमोर घोषणा केली बाबतीत की, मुस्लीम बांधवांनो;मी हकीम च्या बाबतीत तुम्हाला साक्षीदार ठरवतो, माल फै मधे अल्लाह कडुन ठरविलेला हक्क आहे, मी यांना सादर केला परंतु ते याला घेण्यास नकार देतात, त्याच्या मरणापर्यंत हकीम बिन हिजाम रजिअल्लाहु अनहु नी प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नंतर ईतर कुणाकडेच हात पसरविला नाही.
الترجمة
العربية বাংলা Bosanski English Español فارسی Français Bahasa Indonesia Русский Tagalog Türkçe اردو 中文 हिन्दी Tiếng Việt සිංහල ئۇيغۇرچە Hausa Kurdî தமிழ் Magyar ქართული Kiswahili Română অসমীয়া ไทย Português دری አማርኛ ភាសាខ្មែរ ગુજરાતી Nederlands Македонски ਪੰਜਾਬੀ മലയാളംالشرح
हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु नी प्रेषितांना पैसे किंवा तत्संबंधी वस्तु मागीतली, पैगंबरांनी [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] त्यांना भरभरुन दिले, पुन्हा मागीतले प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी पुन्हा दिले, त्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी समजाविले की: अरे हकीम, हि मोहमाया व संपत्ती ची आशा फार गोड व आकर्षक आहे, जो व्यक्ती या मालमत्तेला कुणाकडुन न मागता व लोभ न बाळगता स्वीकारतो, तेव्हा त्यात बरकत टाकली जाते, जो व्यक्ती या मालमत्तेला हवास्यापोटी व लालसेने स्वीकारतो त्याच्याकरता त्यात बरकत समाप्त केली जाते, त्या व्यक्तीचे उदाहरण आहे, जो जेवण तर करतो परंतु त्याचे पोट भरत नाही, व देणारा हात घेणाऱ्या हातापेक्षा श्रेष्ठ आहे, हकीम म्हणतात: हे प्रेषिता, अल्लाह ची शपथ ज्याने तुम्हाला सत्यनिशी पाठविले, मी यापुढे कुणालाही काहीच मागणार नाही, ईथपर्यंत की मी जग सोडुन जाईल. मग प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम मरण पावले, नंतर खलीफा अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु नी हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु ला बोलावले, की त्यांना माल द्यावी, परंतु त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला, दुसरे खलीफा उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु नी हकीम बिन हिजाम रजिअल्लाहु अनहु ना परत बोलाविले की त्यांना त्यांचा हिस्सा देण्यात यावा, परत त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला, त्यावर हजरत उमर रजिअल्लाहु अनहु नी सर्वांसमोर घोषणा केली की: मुस्लीम बांधवांनो, मी यांना तो हक्क सादर करतो जो साक्षात अल्लाह ने यांना माल फै जो अविश्वासु कडुन विना युद्ध प्राप्त होतो पैकी ठरवुन दिला आहे, परंतु हे घेण्यास नकार देत आहेत, हकीम बिन हिजाम रजिअल्लाहु अनहु प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नंतर कुणाकडुन काहीच मागीतले नाही, ते ठाम राहिले शेवटी त्यांचा मृत्यू झाला.فوائد الحديث
वैध मार्गाने संपत्ती कमवणे गैर नाही, फक्त मन लालसेपासुन दुर राहायला हवे, हे ईशभिरुतेच्या उलट नाही.
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे उदार मन यात झळकते, ईतरांना देतांना कधीच कंजुषी करत नव्हते.
भलाई व सुधारणा करता प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी पहिले दिले व नंतर समजावून सांगितले, आपली बाजु मनात ऊतरावी.
लोकांना विनाकारण प्रश्न करणे नापसंत आहे.
लालसी व्रुत्तीचा धिक्कार, मालमत्तेच्या लालसेत बरकत राहत नाही, उलट मन अशांत बनवते.
जर एखादा भिकारी वारंवार मागत असेल खूप आग्रह करत असेल, तर त्याला नकार देणे, निराश करणे आणि त्याला समज देणे यात काहीच गैर नाही, तसेच त्याला संयम बाळगण्याचा आणि मागण्याची लालसा सोडण्याचा सल्ला द्यावा.
कोणालाही बैतुलमालमधून (सार्वजनिक खजिन्यातून) काही घेण्याचा अधिकार नाही, जोपर्यंत इमाम (शासक) स्वतः त्याला ते देत नाही. आणि मालमत्तेचे वाटप होण्यापूर्वी तर त्याला त्यावर काहीही हक्क नाही.
गरज असताना, तुम्ही मागणी करु शकता, जर अत्यावश्यक असेल तर मागणी करण्यात गैर नाही.
इब्न हजार म्हणाले की: सुधारण्याची पद्धत, इमाम किंवा सुधारवादीला जरुरी आहे की त्याने पहिले समोरच्या व्यक्तीची गरज पुर्ण करावी नंतरच समज द्यावी ,ज्याचा प्रभाव जास्त असतो.
हजरत हकीम बिन हजाम रजिअल्लाहु अनहु ची वचन बद्धता, ज्यांनी प्रेषितांना दिलेले वचनावर मरेपर्यंत ठाम राहिले.
इशाक बिन रहवेह म्हणाले की हकीम (अल्लाह त्याच्यावर प्रसन्न असो) यांच्या मृत्युच्या वेळी ते कुरैशांमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
التصنيفات
Condemning Love of the World