काय तुमच्या पैकी कुणाची ऐपत आहे की दर दिवसी एक हजार सत्कर्म करावे व तेवढेच पुण्य प्राप्त करावे?

काय तुमच्या पैकी कुणाची ऐपत आहे की दर दिवसी एक हजार सत्कर्म करावे व तेवढेच पुण्य प्राप्त करावे?

साअद बिन‌ वकास रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: आम्ही प्रेषितां अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर समवेत बसलो असतांना, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की:<<काय तुमच्या पैकी कुणाची ऐपत आहे की दर दिवसी एक हजार सत्कर्म करावे व तेवढेच पुण्य प्राप्त करावे?>>प्रैषितां सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ बसलेल्या पैकी एकाने विचारले की:एक माणुस एका दिवसात एक हजार सत्कर्म कसे बरे करु शकेल? प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की:<<शंभर वेळा सुबहानल्लाह उच्चारावे,जो ते उच्चारतो त्याच्या खात्यात एक हजार सत्कर्म नोंदल्या जातात, किवा एक हजार पापं नष्ट केल्या जातात>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

पैगंबर सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबी समोर प्रश्न करतात की: तुमच्यापैकी कुणी एवढी ताकत ठेवतो की दररोज एक हजार सत्कर्म करावे?! त्यावर एका सोबत्याने प्रतिप्रश्न केला की हे, प्रेषिता!एक व्यक्ती दररोज एक हजार सत्कर्म कसे करू शकतो? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:शंभर वेळा "सुबहानल्लाह"म्हणावे ;त्या मोबदल्यात त्याच्या खात्यात एक हजार सत्कर्म नोंदल्या जातील, कारण एक नेकी च्या बदल्यात दहा नेकी एकढं पुण्य मिळते, व एक हजार पापं पुसल्या जातात.

فوائد الحديث

सत्कर्म करण्यास उत्तेजन देणे, कारण सत्कर्म च भक्ती ची पहिली पायरी आहे.

अल्लाह चे स्मरण व चिंतन हे एकदम सोपे कर्म आहे, त्यामधे कोणतीच मुश्कील नाही, परंतु या छोट्याशा सत्कर्माच्या मोबदल्यात फार मोठी नेकी व पुण्य मिळते.

सहाबा (प्रेषितांचे सहकारी) चांगली कामे करण्यास कधीही विलंब करत नसत, तर तत्काळ ती करत असत.

प्रत्येक नेकी चा बदला दहा पटीने अधिक मिळतो, जसं कुरआन मधे आहे की:(जो मनुष्य सत्कर्म करील तर त्याला त्याच्या दहा पटीने मोबदला मिळेल) [अन्आम :१६०]

ही कमीत कमी सत्कर्माची मर्यादा आहे, अन्यथा इतर सत्कर्माचे फळ तर सातशे पटीने वाढतात.

काही पुराव्यात तर "व "या च्या जागेवर आले आहे, याचा अर्थ आहे की एक हजार सत्कर्म दप्तरी नोंदल्या जातील व एक हजार दुष्कर्म पुसल्या जातील, अल्लाह ची उदारता यापेक्षा मोठी आहे.

التصنيفات

Benefits of Remembering Allah