अल्लाह शपथ! तुमच्यापैकी जो कुणी सत्या शीवाय गोळा करील, तो अल्लाह ला अशा परिस्थितीत भेटील की, त्याने त्या वस्तुंना…

अल्लाह शपथ! तुमच्यापैकी जो कुणी सत्या शीवाय गोळा करील, तो अल्लाह ला अशा परिस्थितीत भेटील की, त्याने त्या वस्तुंना उचललेलं असेल

अबु हुमैद साअदी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी कबिला अजद चा एक व्यक्ती लुतबीया ला बनी सुलेमची जकात च्या वसुली करता नियुक्त केले, जेव्हा तो वसुली करुन परतला तेव्हा म्हणाला:हा माल तुमचा [सार्वजनिक ]आहे, व ह्या माझ्या वैयक्तिक भेटवस्तु आहेत. त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले:<< मग तू तुझ्या आईवडिलांच्या घरीच बसला होतास ना, जोपर्यंत तुझी भेटवस्तू तुला आली नसती, जर तू खरा असतास>>मग मेंम्बरवर उभे राहिले, व सर्वांना संबोधित केले:अल्लाह ची स्तुती वर्णन केली, व तद्नंतर म्हणाले की:<<मी तुमच्यापैकी कुणाला नियुक्त करतो, ज्याची अल्लाह ने मला जबाबदारी दिली आहे, मग तो येतो व म्हणतो, हा तुमचा माल आहे, व या माझ्या भेटवस्तु आहेत, ज्या मला देण्यात आल्या आहेत! जर तो खरा असेल तर मग का नाही,तो आपल्या माय बापाच्या घरी बसुन पहा, मग पाहा भेटवस्तु मिळतात की नाही, अल्लाह शपथ! तुमच्यापैकी जो कुणी सत्या शीवाय गोळा करील, तो अल्लाह ला अशा परिस्थितीत भेटील की, त्याने त्या वस्तुंना उचललेलं असेल, मी तुमच्यापैकी प्रत्येकाला ओळखतो, जो तशा अवस्थेत अल्लाह ची भेट घेईल, कुणी त्या दिवसी उंट उचलुन आणेल जो ओरडत असेल, गाय उचलुन आणणारा बघेल की ती हंबरडा फोडत आहे, कुणी बकरी उचलुन आणतो तर ती मेह मेह करत असेल>> सरतेशेवटी प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आपले हात उचलले, इथपर्यंत की त्यांच्या दोन्ही बगली चा पांढरेपणा झळकु लागला, त्यांनी फरमाविले:<<हे अल्लाह! काय मी तुझा संदेश पोहचविला>> अबू हुमैद म्हणतात की ही गोष्ट माझ्या कानांनी ऐकली आणि माझ्या डोळ्यांनी पाहिली.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

अबु हुमैद साअदी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद [सलामती असो त्यांच्यावर]नी बनु सलेम ची जकात वसुली करता ईब्ने लुतबीया नावाच्या माणसाला नियुक्त केले, जेव्हा तो व्यक्ती वसुली करुन परतला, तेव्हा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी त्याला हिशेब मागीतला, तो व्यक्ती म्हणाला की: हा माल तुमचा आहे, व हे मला भेटरुपी वस्तु मिळाल्या ‌आहेत. त्यावर प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: जर तुम्ही खरे आहात तर तुमच्या माय बापाच्या घरी बसले असते व बघले असते की तुम्हाला विना नियुक्ती चे कोण भेटवस्तु देतो बरं; ज्या हक्कांसाठी तू परिश्रम केलेस तेच तुला हे भेट देण्याचे कारण आहेत, आणि जर तू घरीच बसून राहिलास तर तुला काहीही भेट मिळाली नसती, त्यामुळे केवळ ती भेट म्हणून तुझ्याकडे आली आहे म्हणूनच ती स्वतःसाठी योग्य किंवा वैध समजणे योग्य नाही. मग तो व्यासपीठावर बसला आणि उपदेश करू लागला, आणि तो रागावला. त्याने अल्लाहची स्तुती केली आणि नंतर म्हणाला: यानंतर तुमच्यापैकी मी कुण्या एकाला एका कार्यावर नियुक्त करतो, ज्याचा अधिकार मला साक्षात अल्लाह ने प्रदान केला आहे, मग तो व्यक्ती वसुली करुन परतल्यावर म्हणतो की: हा माल तुमचा आहे.व हे मला भेटवस्तु मिळाल्या आहेत! काय त्याने आपल्या माय बापाच्या घरी बसुन बघावं, की कोण त्याला आयत्या भेटवस्तु देतो, अल्लाह शपथ! तुमच्यापैकी जो कुणी नाहक मालकी नसतांना माल हडपेल तर तो कयामत च्या दिवसी अल्लाह समोर त्या नाहक मालाला आपल्या मानेवर उचलुन आणेल, मग ते उंट असेल तर तो उंट बोंबलत असेल, जर ते गाय असेल तर ती होंबारडा फोडत असेल, जर ति बकरी असेल तर ती बकरी ओरडत असेल. मग प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आपले दोन्ही हात ईतके उंचावले की त्यांच्या बगलीची पांढुरकी दिसुन आली, त्यांनी फरमावीले की:हे अल्लाह मी तुझा संदेश पोहचविला. अबु हमीद रजिअल्लाहु अनहु सांगतात की:हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघितलं व माझ्या कानानी ऐकलं.

فوائد الحديث

सदर हदिस वरुन सिद्ध होते की, शासकाची जबाबदारी आहे की त्याने आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्ट केले पाहिजे की त्यांच्या कडुन काय अपेक्षित आहे, व त्यांनी कोणते काम करु नये.

जो इतरांची संपत्ती अन्याय व जुलुम करुन हडपतो तर त्याला भयानक मोबदल्याची चेतावणी आहे.

प्रत्येक अत्याचारी त्याने केलेल्या अत्याचार सहित कयामतच्या दिवसी उपस्थित केला जाईल.

सरकारी नोकरी करतांना, ईमान इतबारे करावी, ते कार्य करत असतांना त्याच्या मोबदल्यात भेटवस्तु स्वीकारणे अयोग्य आहे, जर भेटवस्तु मिळाल्या तर त्या सरकारी तिजोरीत {बैतुलमाल}जमा करावी,

आपल्या जवळ ठेवणे अमान्य आहे ,कारण असे करणे अमानत नसुन खयानत म्हणजे एकप्रकारे विश्वासघात आहे.

इब्न बत्तल म्हणाले:भेटवस्तु देताना हेतु एकतर ऊपकाराची परतफेड असु शकते, किवा समोरच्या व्यक्तीच्या मनात जागा स्वच्छ करण्यासाठी असु शकते, किवा फायदा उचलण्या करता असते, प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] फरमावितात की:भेटवस्तु बाबत घेणारा अंमलदार ची तुलना सामान्य मुस्लीम बरोबर आहे, म्हणुन भेटवस्तु स्वीकारण्यात त्याचा एकट्याचा हिस्सा नाही.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: या हदिस वरुन स्पष्ट होते की: कर्मचाऱ्यांना दिली जाणारी भेटवस्तु हराम व विश्वासघात धोकाधडी आहे;कारण त्याने आपल्या कार्यात विश्वासघात केला, या हदिस मधे कयामत च्या दिवसी त्या भेटवस्तु सह त्याला सजा देण्यात येईल, ज्याप्रमाणे माल ए गनीमत मधे विश्वास घात करणाऱ्याला नरकात टाकलें जाईल, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी स्पष्टपणे सांगितले की या भेटवस्तु त्याला त्याच्या पदा मुळे देण्यात येतात, अन्यथा आम माणसाला भेटवस्तु स्वीकारण्यात हरकत नाही.

इब्न अल-मुनीर म्हणाले: 'प्रेषितांचे[सलामती असो त्यांच्यावर] शब्द:''काय तो आपल्या माय बापाच्या घरी बसुन बघावं" चा अर्थ आहे की, जर कुणी नियमीत पणे भेटवस्तु देत व घेत असल्यास हरकत नाही, त्यावर ईब्ने हजर म्हणतात की:अट अशी आहे की भेट देण्यात अतिरेक होऊ नये.

समज देण्यात प्रेषितांचा [ सलामती असो त्यांच्यावर ]अंदाज असा होता की सर्वसामान्य पणे उद्देशुन सांगत असत, कुणाचे नाव घेउन संबोधन करत नसत.

ईब्ने हजर म्हणतात की: या हदिस मधे अमलदार चे परिक्षण करायला हवे.

ईब्ने हजर हे सुद्धा आवर्जून सांगतात की:जर जबाबदार व्यक्ती चुकत असेल तर त्याला हटकणे, दुरुस्त करणे, किंवा त्याला चुक दाखवणे जरुरी आहे.

दुआ करतांना हात उंचावणे योग्य आहे.

التصنيفات

Gift, Duties of the Imam