إعدادات العرض
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा फज्र सकाळची नमाज अदा केल्यावर त्याच जागेवर बसुन राहत, तोपर्यंत…
प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा फज्र सकाळची नमाज अदा केल्यावर त्याच जागेवर बसुन राहत, तोपर्यंत जोपर्यंत सुर्य पुर्णपणे उगवत नाही
हजरत जाबीर बिन सुमराअ रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जेव्हा फज्र सकाळची नमाज अदा केल्यावर त्याच जागेवर बसुन राहत, तोपर्यंत जोपर्यंत सुर्य पुर्णपणे उगवत नाही, आणी फरमाविले:प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम जिथे फज्र ची नमाज अदा करत होते, सुर्य उगवे पर्यंत तिथेच बसुन राहत होते, मग जेव्हा सुर्य उजाडत असे, तेव्हा प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम उभे राहत, आणी सहाबा सुद्धा आपसात हसी मजाक व चर्चा करत होते, तसेच पुर्वीच्या काळातील आठवणींना उजाळा देत होते,हसत हसत थट्टा मस्करी सुद्धा करत होते, सोबत प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सुद्धा स्मीत हास्य करत होते.
الترجمة
العربية Português دری Македонски Magyar ქართული Tiếng Việt বাংলা Kurdî ไทย অসমীয়া Indonesia Nederlands ਪੰਜਾਬੀ Kiswahili Hausa ភាសាខ្មែរ English Tagalog ગુજરાતી Русскийالشرح
प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या पद्धतींपैकी एक आहे की, ते फज्र च्या नमाज नंतर आपल्या जागी बसत होते, इथपर्यंत सुर्य पुर्णपणे उगवत असे, जेव्हा सुर्य निघत असे तेव्हा प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम उभे राहत असत. सहाबा आपसात गप्पा गोष्टी करत होते, आणी इस्लाम पुर्वीच्या किस्स्यांना उजाडा देत, प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सर्व गप्पा गुपचूप ऐकत असत व हसत चेहऱ्याने त्यांना प्रतिसाद देत होते.فوائد الحديث
फज्र नमाज नंतर सुर्य उगवे पर्यंत अल्लाह चे नामस्मरण व जप करण्यात मग्न होणे, आणी सामुहिक पणे बसणे पसंदिचे आहे, अट एवढी आहे की आजार नसावा.
प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे उच्चतम चारित्र्य व नम्र स्वभाव, सोबत्यांसोबत बसत असत, त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत होते, व हसत सुद्धा होते.
मस्जीद मधे गप्पा करणे, व पुर्वी काळातील आठवणींना उजाळा देण्यास हरकत नाही.
हसणे बोलणे मान्य आहे, मनाई फक्त जोरजोरात तोंड फाडुन हसण्यात आहे.
