जेव्हा तुमच्या पैकी कुणी मस्जीद मधे दाखल होत असतांना प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर दरुद व सलाम पाठवावे व ही …

जेव्हा तुमच्या पैकी कुणी मस्जीद मधे दाखल होत असतांना प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर दरुद व सलाम पाठवावे व ही दुआ करावी:हे अल्लाह! माझ्या करिता तुझ्या दया व क्रॄपेचे दार उघड

हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की: <<जेव्हा तुमच्या पैकी कुणी मस्जीद मधे दाखल होत असतांना प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर दरुद व सलाम पाठवावे व ही दुआ करावी:हे अल्लाह! माझ्या करिता तुझ्या दया व क्रॄपेचे दार उघड, आणी मस्जीद मधुन बाहेर पडतांना प्रेषितांवर सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर दरुद व सलाम पाठवावा, व हि प्रार्थना करावी: हे अल्लाह! माझे शापीत शैतान पासुन रक्षण कर>>, अन्य ग्रंथ हाकीम मध्ये नमुद आहे की<<बाहेर पडतांना प्रेषितांवर सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर सलाम पाठवावा व हे म्हणावे:हे अल्लाह मी शापित शैताना पासुन तुझा आश्रय मागतो>>.

[حسن] [رواه ابن ماجه والحاكم]

الشرح

पैगंबरांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी मुस्लीमांना शीकवण दिली आहे की, ज्या वेळी ते मस्जीद मध्ये दाखल होतील त्या वेळी प्रेषितांवर सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर दरुद व सलाम पाठवावा, अर्थात:अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम अला मुहम्मद, त्यांनंतर हि दुआ म्हणावी:(हे अल्लाह! माझ्याकरिता तुझ्या दयेचे चे दार उघड). आणी जेव्हा मस्जीद मधुन बाहेर पडतांना प्रेषितांवर सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर दरुद व सलाम पाठवावा, आणी हि प्रार्थना करावी:( हे अल्लाह! मी शापीत शैतान पासुन तुझा आश्रय घेतो) अन्य ग्रंथ हाकीम मध्ये नमुद आहे की, बाहेर पडतांना प्रेषितांवर सल्लल्लाहु अलैही व सल्लम वर सलाम पाठवावा व हे म्हणावे:(हे अल्लाह! मी शापित शैताना पासुन तुझा आश्रय मागतो).

فوائد الحديث

मस्जीद मधे दाखल होतांना व बाहेर पडतांना सदर प्रार्थना करणे मान्यताप्राप्त व आवश्यक आहे.

सदर दुआ सर्वच मस्जीद करिता आहे, तसेच मस्जीद हराम करिता सुद्धा.

दाखल होतांना दयेचा चा उल्लेख तर बाहेर पडतांना शैतान पासुन रक्षणाची विनवणी,

दुआ करण्याची तालीम आहे कारण मस्जीद मध्ये दाखल होणारा सर्वोच्च अल्लाह च्या एकदम निकष व (जन्नत) नंदनवनाच्या कार्यात व्यस्त होतो, म्हणुन दयेचा उल्लेख करणे योग्य आहे,

आणी जेव्हा तो मस्जीद मधुन बाहेर पडतो तेव्हा तो जगाच्या व्यस्ततेत व निष्काळजी पणेत गुंततो म्हणुन शैतान पासुन रक्षणाचा* व अल्लाह जवळ आश्रय मागणे उचित आहे.

التصنيفات

The rulings of mosques