प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना…

प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना दासी, ना मालमत्ता सोडली, शिवाय पांढऱ्या खच्चर ज्याच्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सवारी करत होते, व तुरळक अवजारे आणी एक शेत, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दान केले होते

अम्र बिन हारीस रजिअल्लाहु अनहु जे प्रेषीतांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेहुणे होते, आई हजरत जवेरीया बिन्त हारीस रजिअल्लाहु अनहा चे भाऊ ते वर्णन करतात की: प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या मृत्यु वेळी ना चांदिचे दिरहम, आणी ना सोन्याचे दिनार, ना गुलाम,ना दासी, ना मालमत्ता सोडली, शिवाय पांढऱ्या खच्चर ज्याच्यावर प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम सवारी करत होते, व तुरळक अवजारे आणी एक शेत, ज्याला प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दान केले होते.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे मरण अशा अवस्थेत झाले, त्यांनी चांदी चे दिरहम, किंवा सोन्याचे दिनार, ना पुरुष किंवा गुलाम स्त्रीया, किंवा बकऱ्या, किंवा उंट, किंवा कोणत्याही प्रकारची संपत्ती मागे ठेवली नाही, फक्त प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी एक पांढरा खच्चर, अवजारे, आणी शेती तेवढी शिल्लक होती, जी प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आपल्या हयातीतच वाटसरु करता दान दिली होती.

فوائد الحديث

पैगंबरांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम उरलेल्या मालमत्ते चा कुणीच वारस नसतो.

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी मरणोपरांत काय शिल्लक ठेवले, त्यावर सखोल माहिती मिळते.

प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्रॄत्युपश्चात कोणतीच धनसंपत्ती शिल्लक नसणे, यावरुन प्रेषितांची सल्लल्लाहु अलैही व सल्लम उदारता व दयाळुता, गरजुवर उपकार, मोह माये पासुन मुक्त मन असण्याचे स्पष्ट संकेत आहे.

ईमाम करमानी रहमहुल्लाह सांगतात की:सदर हदिस मधे ( वजाअलाहा) शब्दाचा ईशारा तिन बाबींकडे लक्ष वेधतो खच्चर, अवजारे, तसेच शेती फक्त शेतीकडेच नव्हे.

अलखतन चा अर्थ पत्नि चा भाऊ, आणी अलखतान पत्नी कडील नातेवाईकांना म्हटल्या जाते.

التصنيفات

Asceticism and Piety, Prophet's Guidance