व्यक्ती जो नमाजी समोरुन जात असेल त्याने जर जाणले की त्याच्यावर किती मोठे पाप आहे, …

व्यक्ती जो नमाजी समोरुन जात असेल त्याने जर जाणले की त्याच्यावर किती मोठे पाप आहे, तर तो चाळीस पर्यंत उभे राहणे पसंत करेन, त्यापेक्षा बेहतर आहे की कुणा नमाजी समोरुन जावे

बुसर बिन सईद वर्णन करतात की, जैद बिन खालीद जुहनी रजिअल्लाहु अनहु नी त्यांना अबु जहम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर जवळ पाठविले, यासाठी त्यांना विचारावे, की नमाजी समोरुन जाणाऱ्या बाबत प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर कडुन काय ऐकलेस? अबु जहम [अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर] म्हणाले की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<व्यक्ती जो नमाजी समोरुन जात असेल त्याने जर जाणले की त्याच्यावर किती मोठे पाप आहे, तर तो चाळीस पर्यंत उभे राहणे पसंत करेन, त्यापेक्षा बेहतर आहे की कुणा नमाजी समोरुन जावे>> अबु नजर हदिस चे वर्णन कर्ता सांगतात की: मला माहित नाही की प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर चाळीस दिवस सांगीतले की चाळीस महिने की चाळीस वर्षे?

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर कडक ईशारा दिला आहे की, नमाज पठण करत असतांना कुणीच समोरुन जावु नये, मग ती नमाज अनिवार्य असो की ऐच्छिक असो, जर त्या व्यक्तीला याची सत्यता माहीत झाली की किती मोठं पाप व त्याची प्रचंडता किती आहे; तर तो कितीही वेळ उभे राहणे पसंद करेन [चाळीस पर्यंत] परंतु समोरुन जाणार नाही. अबु नजर म्हणतात की मला निश्चित माहीत नाही,ते चाळीस म्हणजे दिवस आहेत, की महिने, की वर्षं.

فوائد الحديث

नमाजी समोरुन जाणे हराम आहे, जर त्याच्या समोर त्याने सुतरा ठेवला नसेल तर, आती जर सुतरा ठेवला असेल तर नमाजी व सुतरा‌ दरम्यान जाणे हराम आहे.

इब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की: याच्या मर्यादेत मतभेद आहेत,

कुणाचे मत आहे की जर कुणी नमाजी च्या सजदा [नतमस्तक होण्याची जागा] च्या ठिकाणी जाणे हराम आहे,

काहींचं मत आहे की तिन‌हाताच्या आतुन जाण्यास मनाई आहे, आणी काहिंचं म्हणनं आहे की, एवढ्या अंतरापर्यंत जाण्यास मनाई आहे, जेवढी एका दगड फेकण्याची मर्यादा आहे.

ईमाम सुयूती रहमतुल्लाह सांगतात की:इथं समोरुन जाण्याचा अर्थ आहे ,नमाजी समोरुन आडवे जाणे, जर कुणी व्यक्ती किब्लाच्या दिशेने गेला तर तो या प्रकोपात सामील होत नाही.

नमाजी करता बेहतर आहे की, त्याने अशा ठिकाणी नमाज अदा करु नये, जिथे लोकांची सारखी ये जा चालु असते,

उदाहरणार्थ: रस्त्यामध्ये, दरवाजा जवळ, किंवा बाजारात यासाठी की ना आपल्या नमाज मधे व्यत्यय येतो ना ईतराना पाप लागते, आणि त्याने आपल्या आणि जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या मधे एक आडोसा किंवा अडथळा ठेवावा.

या हदिस वरुन स्पष्ट होते की [ आखीरत] परलोकाची यातना व पापाचे फळ, हे या जगातील कोणत्याही परेशानी पेक्षा भयानक मोठे व कठिण आहे,

एकंदरीत अर्थ असा आहे की, जर आचरण करतांना थोडीशी परेशानी झाली, परंतु त्यामुळे पापांपासून वाचत असेल तर ती परेशानी स्वीकारणे बेहतर आहे.

التصنيفات

Recommended Acts of Prayer