إعدادات العرض
वुजु पद्धतशीर पणे करावा, बोटांच्या दरम्यान [खीलाल] ओलावा करावा, व नाक च्या आत चांगलं पाणी ओळावे,परंतु रोजा उपवास…
वुजु पद्धतशीर पणे करावा, बोटांच्या दरम्यान [खीलाल] ओलावा करावा, व नाक च्या आत चांगलं पाणी ओळावे,परंतु रोजा उपवास असल्यास थोडं जपुन पाणी वापरावे
हजरत लकीत बिन सबरा [अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर] वर्णन करतात की: मी बनी अलमुन्तफीक च्या शिष्टमंडळा सोबत प्रेषितां कडे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यवर हजर झालो, जेव्हा आम्ही प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर घरी पोहचलो, तेव्हा ते घरी नव्हते, परंतु आम्हाला ईमानधारकांच्या मातोश्री आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी भेटल्या, त्यांनी आम्हा करता खजीरा[ एक पदार्थ जो मांस व पिठापासुन बनवितात] बनविला, एक थाली आणल्या गेली, ज्यामध्ये खजुरी होत्या, नंतर प्रेषितांचे[सलामती असो त्यांच्यावर] आगमन झाले, त्यांनी फरमाविले:<<तुम्हाला काहितरी खायला दिलं? किंवा भोजन तय्यार करु?>> आम्ही म्हणालो:होय, अल्लाह च्या प्रेषिता, त्यादरम्यान जेव्हा आम्ही प्रेषितांसोबत [अल्लाहची सलामती असो त्यांच्यावर] बसलो होतो, तेवढ्यात त्यांचा चरवाहा संध्याकाळी बकऱ्या हाकत आला, त्याच्यासोबत एक बकरीचं पिल्लु होतं, जो म्याम्या करत होता, प्रेषितांनी [ सलामती असो त्यांच्यावर] त्याला विचारले:<<हे चरवाहा,बकरीने काय दिले? >> तो म्हणाला:एक पिल्लु प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] त्याला सांगितले की:<<या बदल्यात एक मोठी बकरी कापा>> मग प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<तुम्ही कदापिही असं समजु नका कि, आम्ही हि बकरी फक्त तुमच्यासाठी जिब्हा केली खरी गोष्ट अशी आहे की आमच्या कडे १०० बकऱ्या आहेत, व आम्हाला नाही वाटत की ति संख्या १०० हुन अधिक व्हावी, त्यामुळे ज्यावेळी नवा पिल्लु जणते, आम्ही त्याबदल्यात एक मोठी बकरी जिब्हा करतो>> मी प्रश्न केला:हे अल्लाह च्या प्रेषिता [सलामती असो त्यांच्यावर] माझी एक पत्नि आहे व ति फार चबरट आहे, तिच्याबाबत मी काय निर्णय घेऊ? प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] सांगितले की:<<तु तिला घटस्फोट दे>> त्यावर मी म्हणालो:हे अल्लाह च्या प्रेषिता! तिच्या सोबत खुप काळ झाला,व तिच्या पासुन मुलंबाळं सुद्धा आहेत, प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<तिला समजावुन सांगा,जर तिच्या अंतरंगात भलाई असेल तर ती जरुर सुधारेल, व आपल्या पत्नि ला एखाद्या गुलामासारखे मारु नका>> मी म्हणालो:हे अल्लाह च्या प्रेषिता! मला वुजु बाबत सांगा, प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<वुजु पद्धतशीर पणे करावा, बोटांच्या दरम्यान [खीलाल] ओलावा करावा, व नाक च्या आत चांगलं पाणी ओळावे,परंतु रोजा उपवास असल्यास थोडं जपुन पाणी वापरावे>>.
الترجمة
العربية Bosanski English فارسی Français Bahasa Indonesia Русский Türkçe اردو 中文 हिन्दी Tiếng Việt Español Kurdî Magyar ქართული සිංහල Kiswahili Română অসমীয়া ไทย Hausa Português دری አማርኛ বাংলা ភាសាខ្មែរ Nederlands Македонски ગુજરાતી ਪੰਜਾਬੀ Tagalog മലയാളംالشرح
हजरत लकित [अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर] वर्णन करतात की ते एका समुहाच्या शिष्टमंडळासोबत प्रेषितांकडे [सलामती असो त्यांच्यावर] आलो, तेव्हा प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] घरि हजर नव्हते, परंतु आई आईशा [अल्लाह राजी असो]ने आमचा पाहुणचार केला व त्यांना भोजनाची व्यवस्था केली. त्यानंतर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] आलेल्या पाहुण्यांची विचारपुस केली, भोजनांविषयी विचारले ? तेवढ्यात तिथे बकऱ्या चारणारा बकऱ्या घेउन आला,त्याच्यासोबत एक बकरीचं पिल्लु होतं,जो आवाज करत होता, प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] विचारले की: बकरीने काय दिले? तो म्हणाला:एक बकरीची पिल्ले. त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] आदेश दिला कि:त्याबदल्यात एक मोठी बकरी जिब्हा करा, आवर्जुन हे सुध्दा सांगितले की: हे पाहुण्यांकरता नाही तर एका नियमामुळे आहे की बकऱ्यांची संख्या १०० हुन अधिक नसावी, मग लकित [अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर] नी आपल्या पत्नि् च्या चबरट पणाचा उल्लेख केला, प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] प्रथमतः घटस्फोट चा सल्ला दिला. परंतु जेव्हा त्यांनी लांब सहवास व मुलाबाळांचा उल्लेख केला. त्यावर प्रेषितांनी [ सलामती असो त्यांच्यावर] सल्ला दिला की, पहिले तिला समजावुन सांगा, जर तिच्या अंतरंगात भलाई असेल तर ती सुधरुन जाईल, व महिलांना भयंकर मारण्यास मनाई केली. नंतर त्यांनी वुजु बाबत विचारले. त्यावर प्रेषित [ सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:वुजु संपुर्णपणे व पद्धतशीरपणे करावा, बोटांच्या दरम्यान सुद्धा पाणी पोहोचवावे, आणी नाकच्या आत सुद्धा पाणी निटपणे पोहोचवावे, परंतु ऊपवास असतांंना मात्र थोडी काळजी घ्यावी, की पाणी आत जाता कामा नये.فوائد الحديث
पाहुणचार करणे सुन्नत पैगंबरीय शीकवण आहे.
हे इसबाग (पूर्णपणे धुणे) दोन प्रकारचे असतात:
१. इसबाग वाजिब: ज्याशिवाय वजू पूर्ण होत नाही,यामध्ये अवयव चांगल्या प्रकारे धुणे आणि संपूर्ण भाग पाण्याने भिजवणे आवश्यक असते.
२.इसबाग मुस्तहब: ज्याशिवायही वजू पूर्ण होते,म्हणजे फर्जपेक्षा अधिक — दुसऱ्या व तिसऱ्या वेळचे धुणे. हे कृत्य मुस्तहब (पसंत केलेले) आहे.
हाताची बोटं व पायाची बोटां दरम्यान खिलाल [ओलावा] करणे मुस्तहब आहे.
तीबी रहमतुल्लाह म्हणतात: वुजुबाबत पुर्वी पासुन माहिती असल्यामुळे प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] फक्त उरलेली बाबीं [सुन्नत]कडेच फक्त इशारा दिला.
प्रेषितांची [सलामती असो त्यांच्यावर] उच्च चारित्र्य झळकते, व इतरांच्या भावनांचा किती आदर करत होते ते स्पष्ट होते.
या हदिस मधे वुजु मधे गुळणा करणे अनिवार्य असण्याचं प्रमाण आहे.
हा हदीस या गोष्टीचा पुरावा आहे की ऊपवास असतांंना नाक मधे पाणी टाकत असतांना थोडी काळजी घ्यावी की पाणी आत जाऊ नये.
प्रत्येक मुस्लीमावर हिजरत [प्रदेश बदलणे] जरुरी नाही, हे यासाठी की बनी अल-मुन्तफिक आणि इतर लोकांनी हिजरत केली नाही, तर त्यांनी आपली प्रतिनिधीमंडळे पाठवली, आणि हाच नियम त्या व्यक्तीस लागू होतो जो अशा ठिकाणी असतो जिथे तो आपल्या धर्माची मोकळेपणाने अभिव्यक्ती करू शकतो, जर त्याला धर्मावर आचरण करणे सोपे असेल.
