कोणत्याही स्त्रीला आप्तेष्टांच्या मरणावर तिन दिवसांपेक्षा जास्त शोक करू नये परंतु फक्त आपल्या पति च्या…

कोणत्याही स्त्रीला आप्तेष्टांच्या मरणावर तिन दिवसांपेक्षा जास्त शोक करू नये परंतु फक्त आपल्या पति च्या निधनानंतर तिने [पत्नी] चार महिने दहा दिवस

उम्मे अतिया अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<कोणत्याही स्त्रीला आप्तेष्टांच्या मरणावर तिन दिवसांपेक्षा जास्त शोक करू नये परंतु फक्त आपल्या पति च्या निधनानंतर तिने [पत्नी] चार महिने दहा दिवस शोक पाळावा, सोबतच तिने रंगीत कपडे व डोळ्यात सुरमा घालु नये, तसेच सुगंधाचा वापर करु नये,परंतु मासीक पाळी संपल्यावर थोडंसं किस्त व अजफार वापरु शकते>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर महिलांनी आपल्या वडील, औमुलबाळ किंवा भाऊबंद च्या निधनावर तिन दिवसा पेक्षा जास्त शोक करण्यास मनाई केली आहे, शोक चा अर्थ आहे, बनाव सिंगार करु नये, सुगंधाचा वापर करु नये, सुंदर कपडे परिधान करू नये, दाग दागीने घालु नये, जर तिच्या पतिचे निधन झाल्यास तिच्यावर अनिवार्य आहे की चार महिने दहा दिवस शोक पाळावा, शोक पाळत असतांना रंगीत व विशेष कपडे परिधान करू नये, परंतु असब चे कपडे घालु शकते, जो एक यमनी कपडा आहे, जो पहिलेच रंगल्या जातो व नंतर बुनल्या जातो, तिने डोळ्यात सुंदरते करता सुरमा घालु नये, सुगंध वापरु नये, फक्त मुभा आहे पाळी च्या शुद्धतेनंतर लगेच काही ठराविक वापर करु शकते, त्यात थोडंसं किस्त किंवा अजफार [बखुर चे सुगंध] वापरु शकते जेणेकरून दुर्गंध दुर करावा.

فوائد الحديث

ईहदाद चा अर्थ आहे:अलंकार घालणे व लग्नाच्या उद्देशाने दुसऱ्याला आकर्षित करण्यापासुन दुर राहणे, तिने सर्व प्रकारच्या दागिन्यांपासून, सुगंधी पदार्थांपासून, काजळापासून आणि शोभेच्या वस्त्रांपासून दूर राहावे.

स्त्रीला तिच्या पति व्यतिरिक्त कुणाच्याच निधनावर तिन दिवसा पेक्षा जास्त शोक करण्यास मनाई केली आहे.

यावरुन पतिचे महत्व व उच्चता सिद्ध होते, शोक व्यक्त करण्याच्या कालावधी वरुन.

तीन दिवस किंवा त्यापेक्षा कमी परवानगी दुःख कमी करण्यासाठी असते.

पत्नीला आपल्या पतिच्या निधनावर चार महिने दहा दिवस शोक अनिवार्य आहे परंतु जर पत्नी गरोदर असेल तर तिच्या बाळंतपणा नंतरच तिचा शोकाचा कालावधी [ईद्दत] समाप्त होतो.

महिलांना असे कपडे परिधान करण्याची परवानगी आहे, ज्यामध्ये शोभेचा हेतु नसेल, व तिचे कपडे चलनातील असल्यास हरकत नाही

التصنيفات

Waiting Period