जो ज्ञान संपादन करतो, त्याचा स्वच्छ हेतु फक्त अल्लाह ची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असला पाहिजे, आणी जर त्याने…

जो ज्ञान संपादन करतो, त्याचा स्वच्छ हेतु फक्त अल्लाह ची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असला पाहिजे, आणी जर त्याने ज्ञान भौतीक फायदा करता प्राप्त केले तर कयामतच्या अंतिम दिवसी तो [जन्नत ] स्वर्गाच्या सुगंधा पासुन तो वंचित केला जाईल

अबुहुरैरा अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की:प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<जो ज्ञान संपादन करतो, त्याचा स्वच्छ हेतु फक्त अल्लाह ची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असला पाहिजे, आणी जर त्याने ज्ञान भौतीक फायदा करता प्राप्त केले तर कयामतच्या अंतिम दिवसी तो [जन्नत ] स्वर्गाच्या सुगंधा पासुन तो वंचित केला जाईल>> म्हणजे त्याला स्वर्गाचा गंध पण मिळणार नाही.

[صحيح] [رواه أبو داود وابن ماجه وأحمد]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर या हदिस मधे स्पष्ट केले आहे की एखादी व्यक्ती जर धर्माचं ज्ञान अल्लाह ची प्रसन्नता व परलोकाचे च्या सफलतेसाठी प्राप्त करायला हवे, परंतु जर कुणी जगाचा फायदा किंवा वैयक्तिक फायद्या करता, पैसा कमावण्याकरता, किंवा नाम नमुद करता संपादन करत असेल तर न्यायाच्या दिवसी त्या व्यक्तीला स्वर्गाचा गंध पण मिळणार नाही, हा इतका गंभीर ईशारा आहे की प्रत्येक व्यक्तीने धार्मीक ज्ञान फक्त अल्लाह च्या रजे करताच प्राप्त करावे.

فوائد الحديث

ज्ञान प्राप्त करत असतांना, निस्वार्थ भावना जरुरी आहे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

देखावा, किंवा जगाच्या फायद्या साठी धार्मिक ज्ञान संपादन करणे एक गुन्हा व मोठे पाप आहे.

जर कुणी फक्त अल्लाह खातर ज्ञान संपादन केले परंतु काळांतराने त्याला भौतीक फायदा सुद्धा आपोआप मिळाला तर त्यात काही गैर नाही.

ईमाम सिनदी रहमाउल्लाह म्हणतात की:शब्द (अरफल जन्नत) चा अर्थ आहे, जन्नत चा सुगंध होतो, वरील हदिस मधे आहे की तो व्यक्ती स्वर्गा पासुन खुप लांब असेल, तर तो स्वर्गाला पुर्णपणे मुकेल, कारण ज्याला संबंधित वस्तुचा सुगंध पण मिळत नसेल तर तो संबंधित वस्तु पर्यंत पोहोचुच शकत नाही.

जो व्यक्ती धार्मिक ज्ञान फक्त नौकरी किंवा पदाकरता, किंवा इतर फायद्या करता प्राप्त करतो, त्याला लवकर अल्लाह जवळ क्षमा मागायला हवी, सर्वोच्च अल्लाह मोठ्या क्रुपा व दयाळु आहे, तो क्षमा मागणाऱ्या ला क्षमा करतो व त्याचा हेतू पण दुरुस्त करतो.

हा गंभीर ईशारा धार्मिक ज्ञान संपादन करणे बाबत आहे, जर कुणी इंजीनियर किंवा विज्ञान शीकत असेल व त्याचा हेतु त्याद्वारे जगाचे फायदे उचलणे असेल तर त्याचा विषय त्याच्या नियत व हेतुवर अवलंबुन असेल, अशा व्यक्तींवर सदर हदिस लागु होत नाही.

التصنيفات

Blameworthy Morals, Manners of Scholars and Learners