अल्लाह च्या दासींना मस्जीद मधे येण्यापासुन रोकु नका, परंतु त्यांनी खुश्बु किंवा सुगंध लावुन घरुन निघु नये

अल्लाह च्या दासींना मस्जीद मधे येण्यापासुन रोकु नका, परंतु त्यांनी खुश्बु किंवा सुगंध लावुन घरुन निघु नये

हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की: <<अल्लाह च्या दासींना मस्जीद मधे येण्यापासुन रोकु नका, परंतु त्यांनी खुश्बु किंवा सुगंध लावुन घरुन निघु नये>>.

[حسن] [رواه أبو داود]

الشرح

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी घरधनीला आदेश दिला आहे की, त्याने महिलांना मस्जीद मध्ये जाण्यापासुन रोकु नये, आणी महिलांना आदेश दिला की त्यांनी बाहेर पडतांना कोणताही सुगंध किंवा अत्तर आणी नटुन थटुन निघु नये, त्यापायी त्या पुरुषांसाठी आकर्षणाचे कारण बनु नये.

فوائد الحديث

महिलांना मस्जीद मधे नमाज अदा करण्याची परवानगी आहे, फक्त त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, आणी विना (खुश्बु) सुगंधाचे व नटुन थटुन निघु नये.

सदर हदिस वरुन सिद्ध होते की महिलांनी घरा बाहेर पडतांना, आपल्या पतिची परवानगी घ्यायला हवी, कारण पुरुषांना परवानगी देण्यासाठी संबोधित करण्यात आले आहे.

ईस्लाम ने महिलांची भरपुर काळजी घेतली आहे, त्यांना अशा कोणत्याही कामापासून रोकले नाही, ज्यामध्ये त्यांचा फायदा आहे, उदा ज्ञान संपादन करण्यासाठी घरा बाहेर पडणे.

पुरुषांवर महिलांची देखरेख व पालनपोषण करण्याची जबाबदारी सिद्ध होते.

التصنيفات

Clothing and Adornment, Jurisprudence for Muslim Women, The rulings of mosques