यापासुन दुर राहा, हे फार घाणेरडे क्रॄत्य आहे

यापासुन दुर राहा, हे फार घाणेरडे क्रॄत्य आहे

हजरत जाबिर बिन अब्दुल्ला रजिअल्लाहु अनहु कथन करतात की: आम्ही एका चढाईवर असतांना मुहाजीरा (मुळ चे मक्का रहिवासी) पैकी एका व्यक्तीने अंसार (मुळ मदिना रहिवासी) च्या एका व्यक्तीला मागुन हात मारला, अंसारी व्यक्ती ने हाक दिली: अंसारी माझी मदत करा, मुहाजीराने सुद्धा आरडाओरड केली:मुहाजीरांनो माझी मदत करा, हा सगळा प्रकार प्रेषितांपर्यंत सल्लल्लाहु अलैही व सल्लम पोहचला, तेव्हा त्यांनी विचारपुस केली :<<काय घडले आहे?>> लोकांनी सांगितले की:मुहाजिरा्‌पैकी एका ने अंसारातील एका व्यक्तीला मारले, त्यावर अंसारीने अंसारी लोकांना बोलाविले तर दुसरीकडे मुहाजिराने मुहाजिरींना जमा केले, त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<< यापासुन दुर राहा, हे फार घाणेरडे क्रॄत्य आहे>> जाबिर अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की: जेव्हा प्रेषित सलामती असो त्यांच्यावर मदिना ला आले, त्यावेळी अंसार ची संख्या जास्त होती, परंतु नंतर मुहाजिरिंच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली, या परिस्थितीवर अब्दुल्ला बिन उबई (दांभिकांचा सरदार) म्हणाला:इथपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली ? अल्लाह ची शपथ! आम्ही जर मदिना परतलो तर उच्च ( ते आणी त्याचे सोबती), निच (प्रेषित सलामती असो त्यांच्यावर आणी त्यांचे सोबती) हाकलुन देणार, हे ऐकुन ऊमर बिन खत्ताब अल्लाह राजी असो त्यांच्याशी म्हणाले:हे प्रेषिता! मला परवानगी द्या, मी या दांभीकाची मान‌ धडा पासुन वेगळी करतो, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<< याला सोडुन द्या, लोकांनी असा आरोप करु नये की मुहम्मद आपल्या सोबत्यांनाच ठार करतो >>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर एका चढाई वर असतांना, सोबत मुहाजिर व अंसार या दोन्ही समुहातील लोकं शामील होते, मुहाजिरापैकी एका व्यक्तीने अंसारी पैकी एका व्यक्तीला पाठीमागुन हाताने मारले. त्यावर त्या अंसारी व्यक्ती ने आपल्या समुहाला हाक दिली, आणी मुहाजीराने आपल्या समुदायाला हाक दिली, सदर प्रकरण प्रेषितां सलामती असो त्यांच्यावर पर्यंत पोहचले असता, त्यावर प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी विचारले की: हे सर्व काय चाललंय? त्यांनी सांगितले: एका मुहाजिर व्यक्तीने एका अन्सारी व्यक्तीच्या पाठीवर हाताने मारले, तेव्हा अन्सारी म्हणाला: अन्सार हो, मला मदत करा, आणि मुहाजिर म्हणाला: मुहाजिर हो, मला मदत करा. जेव्हा परिस्थिती त्यांनी समजुन घेतली, तेव्हा त्यांनी फरमावीले:या अंधकालीन प्रथेला थारा देऊ नका, कारण ही फार वाईट प्रथा व नापसंत आणी फार वेदनादायक आहे; खरोखर ही प्रथा अज्ञान कालीन रित होती की मनुष्य सत्य व असत्य न बघता, फक्त आपल्या समुदायाला हाक देतो, मग कुणावर जुलुम जबरदस्ती करो किंवा अत्याचाराने पिडित का असेना. हजरत जाबिर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: सुरुवातीच्या काळात अंसार ची संख्या जास्त होती, परंतु काळांतराने मुआजिरांची संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. अशा वेळी अब्दुल्ला बिन उबै बिन सलुल ने अहंकाराने व दांभिकतेचे प्रदर्शन केले, तो म्हणाला की: आम्ही मदिना पोहचल्यावर उच्च वर्गीय, निच्च लोकांना हाकलुन देऊ, यावरुन त्याची दांभीकता स्पष्ट झाली. या घोषणेवर उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु फार रागावले: त्यांनी प्रेषितांकडे चक्क त्याची मान धडावेगळी करण्याची परवानगी मागीतली, परंतु प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी यावर दुरगामी परिणाम बघता यावर अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली नाही, कारण आम जनमानस ईस्लाम व मुसलमाना बाबत चुकीचा संदेश जाता कामा नये.

فوائد الحديث

अज्ञान काळातील प्रथां किंवा रितीरिवाज पासुन मग त्या तोंडी असो की क्रॄतीतुन असो त्या सर्वांपासुन सक्तीने रोकण्यात आले आहे, कारण ईस्लाम चे आगमनच अशा रिवाजापासुन वाचवणे व त्यांना चांगले व शुद्ध मार्ग दाखवण्यासाठी झाला आहे.

अज्ञानी टोळी बनविण्या पासुन (अंधभक्ती व द्वेष) खबरदार करण्यात आले आहे, त्यापासुन वाचण्याची सक्तीने आदेश देण्यात आले आहे, ज्याप्रमाणे एखाद्या खतरनाक व भयावह वस्तु पासुन स्वतःला वाचण्याचा हूकुम दिला जातो.

त्या प्रत्येक कारणा पासुन दुर राहणे आवश्यक आहे, ज्यामुळे दुश्मनी व द्वेष किंवा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर

या सर्व प्रकाराला अंधःकालीन पुकार यामुळे संबोधले, कारण यावरुन सिद्ध होते की अशाप्रकारचे विचार प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर नामंजुर होते, कारण अशा अज्ञानी प्रथांमुळे लोकं एकमेकांना फक्त आंधळे बनुन मदत करत होते,

अज्ञानी काळात लोकं आपले हक्क टोळी द्वारे व अंधभक्तीद्वारेच घेत होते, नंतर ईस्लाम चे आगमन झाले, आणी या सर्व रितीरिवाजांना वाईट व चुकीचे मानण्यात आले, त्याजागी ईस्लाम ने निर्णय ईस्लामी शरियत नुसारच करण्याची जबरदस्त शिकवण दिली, आणी जर एकमेकांवर अन्याय अत्याचार झाला तर त्याचा फैसला काजी द्वारा करण्याची पद्धत सांगितली, आणी जुलुम व अत्याचारीला त्याच्या जुलुम व अत्याचारानुसार शिक्षा देण्यात येईल, जी ईस्लाम ने स्पष्ट केली आहे.

अल्लामा सिनदी सनदी रहमहुल्लाह सांगतात की: हि गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की कुणाचेही समर्थन फक्त त्याच्या नाते गोत्यावरुन किंवा कबिल्यावरुन करणे पुर्णत चुकीचे व अज्ञानी क्रॄत्य आहे, म्हणुन फक्त आपल्या समुहाला किंवा टोळीला हाक देणे चुकीचे आहे, परंतु सत्याची साथ देणे हे प्रत्येक ईमानधारकाचे प्रथम कर्तव्य आहे, मग संबंधित व्यक्ती आपल्या समुदायाचा असो की दुसऱ्या समुदायाचा असो.

दांभीक लोकांचे लक्षण असे होते की, ते बदजबान म्हणजे चबरट व तोंडसुख घेणारे, तसेच प्रेषित सलामती असो त्यांच्यावर व सहाबांविषयी जहरी टिका घ्रॄणा व विष बाळगणारे होते.

प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर जिवन परिचयात तुम्हाला दुरदृष्टी व संयमाचे उच्चतम उदाहरण मिळते, विशेषकरुन त्यावेळी ज्यावेळी दांभिकांनी भयानक वेतनादायी त्रास त्यांना दिला.

अशा प्रत्येक क्रॄत्यांबाबत स्पष्टपणे खबरदार करण्यात आले आहे, जे लोकांना ईस्लाम मध्ये प्रवेशापासुन भटकवु शकतात,

याच दुरगामी परिणामाचा विचार करून प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर दांभीकांना ठार केलें नाहीं, कारण लोकांनी असे म्हणु नाही की मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या सोबत्यांनाच ठार करतात.

التصنيفات

Blameworthy Morals