إعدادات العرض
हे अल्लाह मी एक सामान्य मनुष्य आहे, ज्या मुस्लीमाला माझ्या मुळे काही त्रास झाला, किंवा एखाद्या व्यक्तीवर मी…
हे अल्लाह मी एक सामान्य मनुष्य आहे, ज्या मुस्लीमाला माझ्या मुळे काही त्रास झाला, किंवा एखाद्या व्यक्तीवर मी रागावलो असेल, किंवा शाप दिला असेल, किंवा कुणाला ईजा पोहचवली असेल, तर त्याच्या करिता शुद्धता व पवित्रता तसेच त्याबदल्यात त्याच्यावर क्रॄपावर्षाव कर
अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की: <<हे अल्लाह मी एक सामान्य मनुष्य आहे, ज्या मुस्लीमाला माझ्या मुळे काही त्रास झाला, किंवा एखाद्या व्यक्तीवर मी रागावलो असेल, किंवा शाप दिला असेल, किंवा कुणाला ईजा पोहचवली असेल, तर त्याच्या करिता शुद्धता व पवित्रता तसेच त्याबदल्यात त्याच्यावर क्रॄपावर्षाव कर>>.
الترجمة
العربية Português دری Македонски Magyar Tiếng Việt ქართული বাংলা Kurdî ไทย অসমীয়া Nederlands ਪੰਜਾਬੀ Indonesia Kiswahili Hausa ភាសាខ្មែរ English ગુજરાતી Tagalog Русскийالشرح
पैगंबरांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी सर्वोच्च अल्लाह कडे दुआ याचना केली आहे की, हे अल्लाह! मी सुद्धा एक मनुष्य आहे, जसा राग सगळयांना येतो, तसाच मला सुद्धा राग येतो, बस्स ज्या कुण्या ईमानधारकाला माझ्याकडुन ईजा पोहचली असेल, किंवा त्याला बरेवाईट बोललो असेल, किंवा शीवीगाळ केली असेल किंवा एखाद्याला शाप दिला असेल, (अर्थात तुझ्या क्रॄपेपासुन वंचित होण्याचा शाप दिला असेल) किंवा त्याला मारहाण केली असेल तर हे अल्लाह! त्याच्या मोबदल्यात त्याला (जकात) दानधर्म, जवळीकता, तसेच शुद्धता व पापापासुन मुक्ती चे साधन बनव, व क्रॄपा बनवुन दे, अशी क्रॄपा ज्यामुळे तु क्रॄपा करतोस.فوائد الحديث
प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम उच्चतम चारित्र्याचे सुंदर उदाहरण मिळते.
हाफिज ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की: सदर हदिस मध्ये प्रेषितांचे सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या उम्मत वर विराट प्रेमाचे दर्शन होते, उत्तम चारित्र्य, व मनाचा मोठेपणा दिसतो, कारण प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आपल्या कडुन घडलेल्या कोणत्याही क्रॄतीच्या बदल्यात क्षमा, व उच्चतम मोबदल्याची मागणी केली आहे.
ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: जर एक प्रश्न निर्माण झाला की: प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम कुणाला शाप का बरे देतील? जर तो त्याच्या लायक नसेल तर, किंवा एखाद्या व्यक्तीला बरेवाईट बोलले असतील किंवा शाप दिला असेल?
तर या प्रश्नांची उत्तरे विद्वानांनी दोन प्रकारे दिली आहेत:
पहिला प्रकार:जर तो व्यक्ती अल्लाह च्या नजरेत सजे करता पात्र नसेल परंतु वर पाहता तसे दिसत असेल, प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना बाह्य स्वरूपा वरुनच न्याय करण्याचा आदेश देण्यात आला होता, दुसरीकडे आंतरीक बाजु पुर्णतः अल्लाह च्या हवाली असते.
दुसरा प्रकार: प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या मनोमनी कधिच अशाप्रकारचे शब्द काढण्याचा मुळीच हेतु नव्हता, परंतु अरबांच्या बोलीभाषेमध्ये असे शब्द वापरात होते, जे बोलणे एक भाषेचा भाग होता, परंतु त्यामागे कोणताही वाईट हेतु कधिच नव्हता, उदाहरणार्थ:तुझे दोन्ही हात मातीने भरावे,
तुझा गळा कापल्या जावा,
अशा प्रकारच्या शब्दप्रयोग हदिस मध्ये मिळतात परंतु त्यांचा उद्देश शाप कदापिही नव्हता,
प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम ना शंका आली कि यापैकी एकही गोष्ट स्वीकारल्या गेली तर, त्यामुळे प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी अल्लाह कडे दुआ याचना केली, अशा प्रकारच्या शब्द उलट त्या व्यक्तीसाठी रहमत, दया, पापे नष्ट होण्याचे माध्यम बनावे, शुद्धता व पुण्य बनविले जावे,
अशाप्रकारचे शब्दोच्चार प्रेषितां सल्लल्लाहु अलैही व सल्लम कडुन नकळत फार कमी वेळा झाला, अन्यथा प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम कधिच शिवीगाळ करणारे किंवा वात्रट भाषी किंवा शाप देणारे किंवा व्यक्तीश: बदला घेणारे नव्हते.
التصنيفات
Moral Attributes