अल्लाह तआला त्या लोकांना जरुर यातना देईल जे या जगात ईतरांना त्रास देतात

अल्लाह तआला त्या लोकांना जरुर यातना देईल जे या जगात ईतरांना त्रास देतात

हजरत हिश्शाम बिन हकिम बिन हिजाम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की श्याम मध्ये काही अजमी शेतकऱ्यां जवळुन गेलो असता, त्यांना उन्हात उभे करण्यात आले होते, त्यांनी विचारले:या लोकांना काय झाले? लोकांनी सांगितले की: यांनी जिझीया न भरल्यामुळे हि सजा देण्यात आली आहे, हिश्शाम अल्लाह राजी असो त्यांच्यावर नि फरमाविले की:मी ग्वाही देतो की मी स्वतः प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट सांगताना ऐकले: <<अल्लाह तआला त्या लोकांना जरुर यातना देईल जे या जगात ईतरांना त्रास देतात>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

हजरत हिश्शाम बिन हकिम बिन हिजाम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर त्यांनी श्याम मध्ये काहि शेतकऱ्यांना रस्त्यावर बघितले, ज्यांना उन्हात उभे राहण्याची सजा देण्यात येत होती, विचारल्यावर? सांगण्यात आले की, हे लोकं जिझीया भरत नाहीत, मात्र ते भरु शकतात. त्यावर पैगंबरांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम सोबत्याने प्रतिक्रिया देतांना म्हटले की:मी प्रेषितांकडुन सलामती असो त्यांच्यावर] ऐकले की: जे या जगात लोकांवर जुलुम अत्याचार करतात, त्यांना हिशेबाच्या दिवसी नरक यातना दिल्या जातील.

فوائد الحديث

जिझीया: ती रक्कम आहे,जी अहले किताब च्या मालकी व हैसीयत असलेल्या पुरुषाकडुन सुरक्षा व नागरीकते च्या बदल्यात वसुल करण्यात येते.

लोकांना नाहक त्रास देणे, मग ते कोणत्याही धर्माचे असो विना कारण परेशान करणे हराम आहे.

जुलमी लोकांना संदेश आहे की, अत्याचाराचा परिणाम फार वाईट आहे.

साहाबा रजिअल्लाहु अनहु भलाई चे संदेष्ट्ये व बुराई च्या विरोधात अत्यंत कठोर भुमिका घेत होते.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:ही कठोरता व निषेध ज्या मध्ये विनाकारण त्रास दिला असेल, मात्र जिथे शरीयत चा स्पष्ट आदेश असेल जसे किसास,हुदुद,वगैरे तशा बाबी यात समाविष्ट नाही.

التصنيفات

Blameworthy Morals