तुमच्यापैकी कुणीही तिनपेक्षा कमी दगडाने स्वच्छता करु नये

तुमच्यापैकी कुणीही तिनपेक्षा कमी दगडाने स्वच्छता करु नये

सलमान फारसी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की: अनेकेश्वरवाद्यांनी एकदा थट्टा करत म्हटले की:आम्ही बघतो तुमचे पैगंबर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शीकवितात, इथपर्यंत शौच करण्याची पद्धत सुद्धा शिकवतात, सलमान फारसी नी उत्तर दिले की,होय, त्यांनी आम्हाला शौच बद्दल माहिती दिली, आम्हाला मना करण्यात आले आहे की कुणीही स्वच्छते करता उजव्या हाताचा उपयोग करु नये, तसेच काबा कडे तोंड किंवा पाठ करून लघवी किंवा शौच‌‌‌ करु नये, तसेच शेण [सुकलेल्या गौऱ्या] किंवा हाडाने लघवी नंतर कोरडी स्वच्छता करण्यास मनाई आहे, आणी हे सुद्धा फरमाविले आहे की:<<तुमच्यापैकी कुणीही तिनपेक्षा कमी दगडाने स्वच्छता करु नये>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

सलमान फारसी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की:अनेकेश्वरवाद्यांनी थट्टा ऊडवितांना म्हटले की: तुमचा पैगंबर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शीकवितो, ईथपर्यंत शौच चे संपुर्ण शिष्टाचार सुद्धा! सलमान फारसी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर म्हणतात की:होय, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आम्हाला शौच व तत्संबंधी संपूर्ण तपशील शिकविले; उदाहरणार्थ: उजव्या हाताने स्वच्छता करु नये,कारण तो हात पवित्र व उच्चतम राहावा, लघवी व शौच करतांना काबा कडे तोंड करु नये, हड्डी व शेणा द्वारे स्वच्छता करु नये, कारण ते बरोबर नाही,व शुद्ध पण करत नाही, आणी हे सुद्धा शिकविले तिन‌पेक्षा कमी दगडाने स्वच्छता करु नये,कारण कमी दगडाने स्वच्छता पुर्णच होत नाही.

فوائد الحديث

ईस्लाम ची परिपुर्णता व व्यापकता झळकते की ईस्लाम मानवी जिवनातिल प्रत्येक बाबींवर प्रकाश टाकतो.

या हदिस मध्ये शौचा बद्दल व‌ लघवी बाबत माहिती देण्यात आली आहे.

काबा कडे चेहरा किंवा पाठ करुन शौच करणे हराम आहे, कारण प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे मनाई केली आहे.

उजव्या हाताने स्वच्छता करणे मना आहे, उजव्या हाताची पवित्रता व महत्तामुळे.

उजव्या हाताला डाव्या हातावर प्राधान्य देणे; कारण डावा हात मलमूत्र आणि घाण दूर करण्यासाठी वापरला जातो, तर उजवा हात इतर सर्व कामांसाठी वापरला जातो.

अशुद्धता लहान असो वा मोठी पाणी किंवा दगडाने साफ करणे आवश्यक आहे.

तिन पेक्षा कमी दगडाने स्वच्छता करु नये,कारण कमी दगडाने अशुद्धता बाकी राहते.

स्वच्छता जर अन्य पदार्थाने केल्यास हरकत नाही,दगडाचा उल्लेख यासाठी आला,कारण दगड त्याकाळी सर्वत्र उपलब्ध होते.

साफसफाई ला विषम अंकावर समाप्त करणे चांगले आहे,जसे जर चार दगडाने सफाई पुर्ण झाली तर पाचव्याचा उपयोग घेणे गरजेचे आहे, हदीस मध्ये आहे :(ज्याने खड्यांनी इस्तिंजा केले, त्याने ते विषम करावे).

शेणा द्वारा सफाई करणे मना आहे, कारण ते स्वतः अपवित्र आहे, जीन्नांच्या जनावरांचे खाद्य आहे.

हड्डीने सफाई करणे अमान्य आहे, कारण स्वतःअशुद्ध आहे, किंवा हड्डी सुद्धा जीन्नांचं खाद्यपदार्थ आहे.

التصنيفات

Toilet Manners