प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज ची सुरुवात तकबिर ए तहरिमा अर्थात अल्लाहु अकबरच्या घोषाने करत असत,…

प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज ची सुरुवात तकबिर ए तहरिमा अर्थात अल्लाहु अकबरच्या घोषाने करत असत, आणी किराअत चा शब्दशःप्रारंभ कुरआन च्या पठणाने अलहम्दुलील्लाही रब्बिल आलमीन

मा आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज ची सुरुवात तकबिर ए तहरिमा अर्थात अल्लाहु अकबरच्या घोषाने करत असत, आणी किराअत चा शब्दशःप्रारंभ कुरआन च्या पठणाने अलहम्दुलील्लाही रब्बिल आलमीन या सुरह ने करत होते, जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर रुकु म्हणजे वाकुन अल्लाह ची स्तुतीगाण करत तेव्हा आपले डोके खुप वर किंवा खुप खाली करत नव्हते तर मध्यंतरी ठेवत असत, रुकु मधुन उठल्यावर तोपर्यंत जमीनीवर नतमस्तक होत नव्हते, जोपर्यंत पुर्णतःताट व सरळ उभे राहत नव्हते, तद्नंतर सज्दातुन डोकं उचलल्यावर दुसरा सज्दा तोपर्यंत करत नव्हते जोपर्यंत पुर्णतः बसत नव्हते, प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर दर दोन रकाअत नंतर तशहुद (ज्यामध्ये अल्लाह ची प्रशंसा व प्रेषितांवर द्रुपद व सलाम चे पठण करत) प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या डाव्या पायाला आथरुन त्यावर बसत होते व उजवा पाय ताट जमीनीवर गाडुन उभा ठेवत होते, आणी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शैतान सारखे बसण्यास मनाई करत होते, सज्दा [नतमस्तक] अवस्थेत आपले दोन्ही हाताची बाजु जमीनीवर आथरणे जसे हिंसक प्राणी आथरतात याला प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मनाई केली, तसेच प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज चा शेवट सलाम ने करत होते.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

श्रद्धावंताची आई मा आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर नमाज चे सविस्तर वर्णन करतांना सांगतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या नमाज ची सुरुवात तकबिर ए तहरिमा द्वारा करत, म्हणजे अल्लाहु अकबर म्हणत, तसेच किराअत कुरआन पठणाची सुरुवात सुरह फातीहा ने करत होते <<अलहम्दुलील्लाही रब्बिल आलमीन... >>. नंतर जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर कयाम नंतर रुकु मध्ये प्रवेश करत असत तेव्हा डोकं वर ना खाली झुकवत बल्की सरळ व दरम्यान अवस्थेत ठेवत, आणी जेव्हा रुकु मधुन आपली मान उचलत तेव्हा पुर्णतःसरळ उभे राहत असत, व‌ नंतर सज्दा करता झुकत होते, आणी जेव्हा पहिला सज्दा पुर्ण करत होते तेव्हा तोपर्यंत दुसरा सज्दा मध्ये दाखल होत नव्हते जोपर्यंत पुर्णतःथांबत नव्हते. प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर दर दोन रकाअत नंतर बसुन तशहुद म्हणत असत: <<अत्ताहिय्यातु लिल्लाही वस्सलवातु व तय्यबातु... >>, आणी दोन सज्दा दरम्यान व तशहुद मध्ये बसत तेव्हा आपला डावा पाय आथरुन त्यावर बसत होते, व‌ उजवा पाय उभा ठेवत. आणी प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर शैतान सारखे बसण्यास मनाई करत होते, उदाहरणार्थ एकतर मनुष्य आपले दोन्ही पाय जमीनीवर आथरुण पायाच्या टाका वर बसतो, किंवा तो आपले नितंब जमिनीला लावतो, पाय सरळ पसरतो आणि हात जमिनीवर ठेवतो, जसे कुत्रा पसरून पडतो, तसेच सज्दा च्या अवस्थेत आपली बाजु जमीनीवर चिटकवण्यास मनाई केली, जी हिस्त्रक प्राण्यांची सवय आहे. प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आपल्या नमाज चा शेवट सलाम द्वारा करत होते, <<अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह>> उजवी कडे एकदा व डावीकडे एकदा.

فوائد الحديث

तकबिर ए तहरिमा चा उच्चार अनिवार्य आहे, जे अन्य कोणत्याही शब्दाला किंवा क्रियेला हराम म्हणजे अमान्य करते, अर्थात नमाज मध्ये दाखल होण्याकरता या विशेष शब्द घोषा व्यतिरिक्त ( अल्लाहुअकबर) अन्य कोणताच शब्दघोष पुरेसा नाही.

सुरह फातीहा चे पठण अत्यावश्यक असणे सिद्ध होते.

रुकु अनिवार्य आहे, आणि रुकू मध्ये वाकुन पाठ सरळ ठेवणे, ज्यामध्ये पाठ जास्त झुकलेली किंवा जास्त वर उठलेली नसावी.

रुकु नंतर ताट उभे राहणे सुद्धा अनिवार्य आहे, आणखी रुकु नंतर कयाम म्हणजे ताट न्यायसंगत उभे राहणे अत्यावश्यक आहे.

जमीनीवर सज्दा करणे सुद्धा अनिवार्य आहे, व त्यांनंतर बसुन पुर्ण समाधान प्राप्त करणे जरुरी आहे.

नमाज च्या अवस्थेत बसतांना नमाजी करता पसंदप्राप्त पद्धत हि आहे की, डावा पाय आथरुन त्यावर बसावे व उजवा पाय ताटपणे उभा करणे मान्य आहे, परंतु ज्या नमाज मध्ये दोन तशहुद असतात उदा मगरिब व ईशा (संध्याकाळच्या नमाज मध्ये) यांच्या शेवटच्या तशहुद मध्ये तवर्रुक (डावा पाय पुर्णतः आथरुण तो उजव्या पाया खालुन बाहेर निघावा, व त्यावर बसावे व‌ उजवा पाय सरळ उभा ठेवावा) पद्धतीने बसण्याला शरियत ने पसंद केले आहे, जसे अनेक हदिस मध्ये यावर सविस्तर वर्णन आले आहे.

शैतानासारख्या बसण्यापासून मनाई करण्यात आली आहे; म्हणजे टाचांवर बसणे आणि पाय जमिनीवर पसरवणे, किंवा दोन्ही पाय उभे करून त्यांच्या मध्ये जमिनीवर बसणे.

हिंस्त्रक प्राण्या प्रमाणे दोन्ही हाताच्या बाजु पसरवण्यास मनाई आहे, अर्थात सज्दा अवस्थेत आपले दोन्ही हात जमीनीवर चिटकुन पसरविणे, हे आळस व कमजोरी चे लक्षण आहे.

नमाज मध्ये शैतान व‌ जनावरां सारखी साम्यता अंगीकारण्यास मनाई आहे.

नमाज चा शेवट सलाम द्वारा करणे जरुरी आहे, आणी हा सलाम नमाज मध्ये हजर लोकांवर तसेच सदाचारी परंतु गैरहजर वाईट लोकांवर प्रत्येक वाईट गोष्टीपासून सलामतीची दुआ आहे.

नमाज मध्ये शांती व समाधान लाभणे अत्यावश्यक आहे.

التصنيفات

Method of Prayer, Mistakes during Prayer