हे ,अल्लाह ! वास्तविक जिवन तर फक्त आखीरत [परलोकाचे]चे जिवन आहे

हे ,अल्लाह ! वास्तविक जिवन तर फक्त आखीरत [परलोकाचे]चे जिवन आहे

अनस रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रैषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<हे ,अल्लाह ! वास्तविक जिवन तर फक्त आखीरत [परलोकाचे]चे जिवन आहे>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की वास्तविक जिवन फक्त [आखीरत] परलोकाचे चे जिवन आहे ;ज्यामधे अल्लाह ची रजा व क्रुपा [जन्नत]स्वर्गातच असेल, कारण या जगातील जिवन नश्वर आहे, त्याऊलट [आखीरत ]परलोकाचे जिवन हमेशा व सदैव राहणारं आहे, तदनंतर प्रेषितांनी [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] अंसार [मदिना वासी] साठी अल्लाह जवळ दुआ याचना केली, ज्यांनी प्रेषितांना [सलामती असो त्यांच्यावर] आश्रय दिला, मदत केली, व आपल्या संपत्तीत वाटा दिला, सोबतच मुहाजीरीन [मक्का वरुन मदिना स्थलांतर झालेले] साठी सुद्धा दुआ याचना केली, ज्यांनी फक्त अल्लाह खातर आपले घरदार व मालमत्ता सोडली.

فوائد الحديث

पहिला मुद्दा हा सिद्ध होतो की, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम ची या जगाप्रती उदासीनता व परलोकां प्रति आतुरता झळकते.

प्रेषित सल्लल्लाहु अलैही व सल्लम चं आपल्या उम्मत ला नाशवंत जगापासून जाग्रुत करणे.

मुहाजीरीन व अंसार चे महत्व, स्वतः प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी या दोघांकरता मोक्षप्राप्ती ची अल्लाह जवळ दुआ याचना केली.

या जगात मिळणाऱ्या आनंदातुन हरवुन जाऊ नये कारण या जगातला प्रत्येक आनंद एक दिवस नष्ट होणारच, तसेच ईथं संकटं सोबतच आहेत, हमेशाचं ठिकाण व कायम राहण्याची जागा [आखीरत]परलोक आहे.

التصنيفات

Condemning Love of the World