मुहम्मद च्या घरच्यांजवळ अनेक महिला तक्रार करत आल्या,व ते पुरुष पुरुषोत्तम नाहीत

मुहम्मद च्या घरच्यांजवळ अनेक महिला तक्रार करत आल्या,व ते पुरुष पुरुषोत्तम नाहीत

इयास बिन अब्दुल्ला बिन अबी जुबाबा सांगतात की प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<अल्लाह च्या दासींना [महिलांना] मारु नका>> मग उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु प्रेषितांजवळ तक्रार करत म्हणाले की:महिला आपल्या पतिंवर वरचढ ठरत आहेत व अवज्ञा करत आहेत, त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] त्यांना समज देण्याकरता हलका मार मारण्याची परवानगी दिली, तद्नंतर प्रेषितांच्या [सलामती असो त्यांच्यावर] घरी अनेक महिला तक्रार करत दाखल झाल्या, त्यावर प्रेषितांनी [ सल्लल्लाहु अलैही व सल्लम] फरमाविले की:<<मुहम्मद च्या घरच्यांजवळ अनेक महिला तक्रार करत आल्या,व ते पुरुष पुरुषोत्तम नाहीत>>.

[صحيح] [رواه أبو داود وابن ماجه]

الشرح

सुरुवातीला प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] स्त्रीयांना मारण्यास मनाई केली होती, नंतर उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु प्रेषितांजवळ तक्रार करत म्हणाले की: महिला आपल्या पतिंची अवहेलना व उद्धटपणे वागत आहेत. त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] अशा उद्धट वर्तणुक करणाऱ्या साठी, त्यांना सौम्य मारण्याची परवानगी दिली, परंतु जबर मार नसावा. त्यानंतर पुष्कळ महिला प्रेषितांच्या [सलामती असो त्यांच्यावर] पत्नी जवळ तक्रार घेऊन आल्या, की त्यांना त्यांचे पती नाहक जबर मारत आहेत, त्यावर प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] फरमाविले की: जे पुरुष आपल्या पत्नीला मारतात ते आदर्श [चांगले]पुरुष नाहीत.

فوائد الحديث

महिलांसोबत सदव्यवहार करावा व नम्रतेने वागावे, हे उत्तम आचरण आहे,

पत्नी बाबत संयमाने व लहान सहान गोष्टींना टाळावे.

सर्वोच्च अल्लाह ने स्पष्ट केले आहे की:(ज्या महिलांबाबत तुम्हाला अवहेलना व अवज्ञा ची भीती वाटते, त्यांना समजावुन सांगा किंवा झोपणे वेगळे करावे व जरुरी वाटल्यास हल्का मार मारावा जर त्या तुमचं ऐकत असल्यास अन्याय व जुलुम चे मार्ग शोधु नका निश्चितच अल्लाह सर्वश्रेष्ठ आणि महान आहे) [निसा:३४],

याचा अर्थ आहे,

पहिले समजावून सांगावे,

जर यश‌ न मिळाल्यास झोपणे वेगळे करावे,

अजुनही सुधारणा झाली नाही तर हलका व सौम्य मार मारावा ज्यात ईजा न व्हावी,

हे तिन टप्पे मरहलेवार आहेत, एकाचवेळी यावर अमल करणे शक्य नाही.

पुरुष घराचा प्रमुख व जबाबदार आहे, त्याने आपल्या घरच्या मंडळींना संस्कारीत करावे, प्रेमाने व नरमाईने.

जर एखादा निर्णय फतवा चुकीचा सिद्ध होत असल्यास, प्रमुखांना कळवणे जरुरी आहे.

जर कुणावर जुलुम अन्याय झाल्यास त्याने प्रमुखां समोर आपली फिर्याद मांडावी.

التصنيفات

Virtues and Manners, Marital Relations