अल्लाह च्या शिक्षेने कुणालाही शिक्षा देऊ नका

अल्लाह च्या शिक्षेने कुणालाही शिक्षा देऊ नका

हजरत इक्रमा कथन करतात की: हजरत अली अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर नि काही लोकांना सजा म्हणुन आगीत जाळले, सदर बातमी हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पर्यंत पोहचली, त्यावर त्यांनी सांगितले की:जर त्यांच्या जागी मी असतो तर कदापिही अग्नीची सजा देत नव्हतो, कारण प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:<<अल्लाह च्या शिक्षेने कुणालाही शिक्षा देऊ नका>>, परंतु मी त्यांना जरुर ठार मारत होतो, ज्याप्रमाणे प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<< जो आपला धर्म बदलतो, त्याला ठार करा>>.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

हजरत अली बिन अबी तालीब अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर यांनी काही जिंदीक म्हणजे धर्मद्रोही लोकांना, आपल्या ईज्तेहाद (तर्काने) आगीत जाळले, ही बातमी अब्दुल्ला बिन अब्बास अल्लाह राजी असो त्यांच्याशी कळाली असता, त्यांनी त्या लोकांना ठार मारण्याचे समर्थन केले, परंतु त्यांना जाळण्याचा तिव्र विरोध केला. त्यांनी सांगितले की: जर मी त्यांच्या जागी असतो तर कदापिही अग्नीची सजा दिली नसती;कारण प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे आगीने कुणाला सजा देणे हे फक्त एकमेव अल्लाह करिता शोभनिय आहे, परंतु त्यांना ठार मारणे पुरेसे आहे, कारण प्रेषितांचं सलामती असो त्यांच्यावर फरमान आहे की:जो ईस्लाम ला सोडचिठ्ठी देऊन आपला धर्म बदलतो, त्याला ठार करा.

فوائد الحديث

विद्वानांच्या तर्कानुसार जो व्यक्ती ईस्लाम ला सोडचिठ्ठी देतो, त्याला शर्तीनुसार कत्ल करणे आवश्यक आहे, परंतु यांची अंमलबजावणी फक्त ईमाम किंवा शासक करु शकतो.

प्रेषितांचा सलामती असो त्यांच्यावर आदेश:"जो आपला धर्म बदलतो त्याला ठार करावे" म्हणजे जो इस्लामपासून फिरतो (मुरतद्द होतो): हा आदेश पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही सर्वसाधारण आहे.

धर्मद्रोही ला त्याच्या द्रोहावर कायम ठेवल्या जाणार नाही, तर त्याला ईस्लाम कडे निमंत्रण दिले जाईल, जर त्याने अस्वीकार केल्यास त्याला ठार करण्यात येईल.

या हदीसमध्ये आगद्वारे छळ करण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच हद (ठराविक शरीअत शिक्षा) आगद्वारे अंमलात आणल्या जात नाहीत, हे स्पष्ट केले आहे.

हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रजिअल्लाहु अनहु चे महत्ता सिद्ध होते, गहन ज्ञान व पैगंबरांच्या शिकवणीवर प्रभुत्व दर्शविते.

मतभेदात सुद्धा आपली बाजु भक्कम पणे मांडण्याची पद्धत सिद्ध होते.

التصنيفات

Prescribed Punishment for Apostasy