{काय तुम्ही हज्ज यात्रेकरुंना पाणी पाजणे व काबा अर्थात मस्जीद हराम ची देखभाल करणे, त्यासमान समजता काय जो अल्लाह वर…

{काय तुम्ही हज्ज यात्रेकरुंना पाणी पाजणे व काबा अर्थात मस्जीद हराम ची देखभाल करणे, त्यासमान समजता काय जो अल्लाह वर आणी अंतिम दिवसावर द्रॄढ विश्वास ठेवतो आणी अल्लाह च्या कार्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, अल्लाह च्या नजरेत त्यांचे स्थान फार मोठे आहे} [तौबा:१९]

हजरत नुमान बिन‌ बशीर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: मी प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेम्बर जवळ बसलो असतांना, एक व्यक्ती उदगारला: ईस्लाम स्वीकारल्यानंतर अधिक सत्कर्म करण्याची मला परवा नाही, याशीवाय की फक्त हज यात्रेकरुंना पाणी पाजावे, दुसरा व्यक्ती उदगारला:मला सुद्धा ईस्लाम स्वीकारल्यानंतर अधिक सत्कर्माची परवा नाही, याशीवाय की मी मस्जीद हराम चा बंदोबस्त व देखरेख करावे, एक तिसरा व्यक्ती म्हणाला:अल्लाह च्या मार्गात (जिहाद) संघर्ष, तुम्हा सर्वांच्या मतांपेक्षा अधिक बेहत्तर आहे, त्यावर हजरत उमर रजिअल्लाहु अनहु त्या लोकांवर रागावले, आणी त्यांना उद्देशून म्हणाले:प्रेषितांच्या सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेंम्बर जवळ आपला आवाज ऊंच करु नका, आज तर (जुमा) शुक्रवार चा दिवस आहे, जुमा शुक्रवार च्या नमाज पठणा नंतर मी प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम या प्रश्नांचे उत्तर विचारतो, ज्यामध्ये तुम्ही मतभेद करत आहात, तदनंतर सर्वोच्च अल्लाह ने फरमाविले आहे की:{काय तुम्ही हज्ज यात्रेकरुंना पाणी पाजणे व काबा अर्थात मस्जीद हराम ची देखभाल करणे, त्यासमान समजता काय जो अल्लाह वर आणी अंतिम दिवसावर द्रॄढ विश्वास ठेवतो आणी अल्लाह च्या कार्यात प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, अल्लाह च्या नजरेत त्यांचे स्थान फार मोठे आहे} [तौबा:१९].

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

हजरत नुमान बिन‌ बशीर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: ते प्रेषितांच्या मेंम्बर जवळ बसले असतांना, एका व्यक्तीला असे बोलतांना ऐकले की:ईस्लाम स्वीकारल्यानंतर अधिक सत्कर्म करण्याची मला परवा नाही, त्याशीवाय की मी फक्त हाजी लोकांना पाणी पाजावे. दसरा व्यक्ती म्हणाला:मला ईस्लाम स्वीकारल्यानंतर अधिक सत्कर्म करण्याची गरज नाही, याशिवाय की मी मस्जीद हराम ची देखभाल व दुरुस्ती करावी, अजुन एक व्यक्ती म्हणाला:अल्लाह च्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, तुम्हा दोघांच्या बेतांपेक्षा जास्त बेहत्तर आहे. त्यावर हजरत उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु त्यांना समज दिली कि प्रेषितांच्या मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेंम्बर जवळ आपला आवाज वाढवु नका, आणी ती वेळ शुक्रवार च्या सकाळची होती, नंतर फरमाविले:मी (जुमा) शुक्रवार च्या नमाज नंतर प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम याबाबत विचारणा करतो, ज्यामध्ये तुम्ही मतभेद करत आहात, तदनंतर सर्वोच्च अल्लाह ने स्पष्ट केले: {काय तुम्ही हज्ज यात्रेकरुंना पाणी पाजणे व काबा अर्थात मस्जीद हराम ची देखभाल दुरुस्ती करणे, त्यासमान आहे, जो फक्त अल्लाह आणी अंतिम दिवसावर विश्वास ठेवतो, आणी अल्लाह च्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, हे अल्लाह च्या नजरेत बरोबर नाही, आणी अल्लाह अत्याचारी लोकांना सन्मार्ग दाखवत नाही} [तौबा:१९].

فوائد الحديث

कर्म पुण्यप्राप्ती मध्ये सुद्धा वेगवेगळ्या दर्जाची असतात.

सत्कर्म तपासण्याची कसोटी शरियत ईस्लामी आहे, लोकांचे वैयक्तिक मत कसोटी बनुच शकत नाही.

अल्लाह च्या मार्गात जिहाद संघर्ष चे महत्व जास्त आहे, परंतु अल्लाह वर व अंतिम दिवसावर (ईमान) गाढ श्रध्दा असावी.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:सदर हदिस मध्ये जुमा शुक्रवारी किंवा ईतर कोणत्याही वेळी मस्जीद मधे आरडाओरडा किंवा आवाज वाढविणे निशीद्ध आहे, आणी विशेष करुन नमाज साठी लोकं जमले असतांना ज्ञानार्जन किवा अन्य कारणांसाठी आवाज उंच केल्या जात नाही, कारण त्यामुळे नमाजी व नामस्मरण करणाऱ्यांना अडचण व‌ परेशानी होतो.

التصنيفات

Occasions of Revelation, Rulings of Jumu‘ah Sermon