,<<बिसमील्लाहि अरकीक, मिन कुल्ली शययीन युजीक, मिन शर्रि कुल्लि नफ्सीन, अव अयनीन हासीद, अल्लाहु यशफीक, बिसमील्लाह…

,<<बिसमील्लाहि अरकीक, मिन कुल्ली शययीन युजीक, मिन शर्रि कुल्लि नफ्सीन, अव अयनीन हासीद, अल्लाहु यशफीक, बिसमील्लाह अरकीक

अबु सईद खुदरी रजिअल्लाहु अनहु सांगतात की: जिब्राईल अलैसलाम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ आले, म्हणाले:काय तुम्हाला काही आजार आहे? प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले: <<होय>> जिब्राईल अलैसलाम म्हणले:,<<बिसमील्लाहि अरकीक, मिन कुल्ली शययीन युजीक, मिन शर्रि कुल्लि नफ्सीन, अव अयनीन हासीद, अल्लाहु यशफीक, बिसमील्लाह अरकीक>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

जिब्राईल अलैसलाम प्रेषितांजवळ आले, व म्हणाले: हे मुहम्मद, काय तुम्ही आजारी पडले? प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की:होय. नंतर जिब्राईल अलैसलाम नी प्रेषितांवर दम केला, ते म्हणाले: <<अल्लाह च्या नावाने>> <<मी तुमच्या करता दम दुआ करतो>> रक्षण व्हावे तुमचे त्या प्रत्येक <<त्रासापासुन>> मग तो लहान असो की मोठा, <<प्रत्येक वाईट आत्म्या च्या>> प्रभावापासुन व <<जळणाऱ्या डोळ्यांच्या>> मत्सरा पासुन, अल्लाह << तुम्हाला तंदुरुस्ती प्रदान करो>> तुमचे पुर्णतः रक्षण करो प्रत्येक आजारापासून तुमचे रक्षण करो, <<अल्लाह च्या नावाने मी तुमच्या वर [ दम] दुआ करतो>> या दुआ मधे जिब्राईल अलैसलाम नी प्रथम व शेवटी अल्लाह चे नाव घेतले, हे प्रमाण आहे की अंतिम आजारापासून मुक्ती फक्त अल्लाह कडुनच मिळते, शिफा म्हणजे तंदुरुस्ती देणारा एकमेव अल्लाह च आहे.

فوائد الحديث

तक्रार न करता किंवा कुणावर दोष न ठेवता आपल्या आजाराबद्दल सांगणे योग्य आहे.

खालील अटी पूर्ण झाल्यास रुकिया (प्रार्थना) परवानगी आहे:

१-दम करणे फक्त कुरआन व प्रमाणीत हदिस मधे आलेल्या दुआ पैकीच असणे जरुरी आहे.

२-आजारी माणसावर केलेली दूआ अरबी भाषेत असावी, अन्यथा ईतर भाषेत असल्यास त्याचा अर्थ माहित असावा, व तो शास्त्रानुरुप असावा.

३-दम किंवा दुआ करतांना असी श्रद्धा असावी की आजारतुन मुक्ती देणारा फक्त एकमेव अल्लाह आहे, अल्लाह व्यतिरिक्त कुणीच नाही.

४. रुकीया [दम करणे] करतांना, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, ते करतांना शिर्क [अल्लाह व्यतिरिक्त ईतरांना त्याच्यासमान समजणे] पासुन वाचणे अत्यंत जरुरी आहे, तसेच हराम [अमान्य] ठरविलेल्या पदार्थांनी करु नये, कुरआन व हदिस नुसारच दम करावा, त्यात कसलीही भेसळ करणे सक्त मना आहे, अन्य कोणत्याही बाबींने करु नये ज्याचा मार्ग शिर्क किंवा बिदत कडे जात असेल.

नजर लागणे सत्य आहे, म्हणुन असा प्रकार असल्यास रुकिया करावा.

हदीसमध्ये आलेल्या दुआ आणि शब्दांद्वारे रुक़्या करणे योग्य आहे.

सदर हदिस वरुन सिद्ध होते की, प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर]सुद्धा ईतरांसारखेच आजारी पडु शकतात.

सर्वोच्च अल्लाह आपल्या प्रेषितांची [सल्लल्लाहु अलैही व सल्लम] सुरक्षा व सलामती ची निगा राखतो, व त्याकरीता जिब्राईल अलैसलाम सारख्या फरिश्ताला नियुक्त करणे.

التصنيفات

Ruqyah (Healing and Protective Supplications)