खुशखबरी असो तुम्हाला दोन नुर ची जे तुम्हाला प्रदान करण्यात आले आहे तसे यापुर्वी कोणत्याच पैगंबराला देण्यात आले…

खुशखबरी असो तुम्हाला दोन नुर ची जे तुम्हाला प्रदान करण्यात आले आहे तसे यापुर्वी कोणत्याच पैगंबराला देण्यात आले नव्हते: १} सुरस फातीहा. २}सुरह बकरा ची शेवटची दोन आयात, तुम्ही या दोन प्रकाशां पैकी कोणतेही [ शब्द] हुरुफ तिलावत [वाचन] केल्याने वाचणाऱ्याला खुप नेकी व पुण्य मिळेल तसेच ते सुद्धा मिळेल ज्याची तुम्ही दुआ [याचना] केली असेल

अब्दुल्ला बिन अब्बास यांच्या अधिकारावर एक हदीस आहे, अल्लाह त्याच्यावर प्रसन्न होऊ, जो म्हणतो: << जिब्राईल अलैसलाम प्रेषितां [सलामती असो त्यांच्यावर]सोबत बसलेले होते, त्यांना वरुन एक आवाज ऐकु आला, जसे दरवाजा उघडतांना आवाज येतो, जिब्राईल अलैसलाम नि आपल्या डोकं उंचाऊन बघितले व म्हणाले, आकाशाचा दरवाजा उघडला गेला, व हा दरवाजा या पहिले कधिच उघडला गेला नव्हता, मग या दरवाजातून एक फरिश्ता [दुत]अवतरला, जिब्राईल अलैसलाम म्हणाले की हा एक फरिश्ता दुत आहे, जो जमीनीवर आला आहे, तो या पुर्वी कधीच पाठविण्यात आला नाही, तो फरिश्ता [दुत] प्रेषितां[ सलामती असो त्यांच्यावर] जवळ आला, सलाम करुन म्हणाला:खुशखबरी असो तुम्हाला दोन नुर ची जे तुम्हाला प्रदान करण्यात आले आहे तसे यापुर्वी कोणत्याच पैगंबराला देण्यात आले नव्हते: १} सुरस फातीहा. २}सुरह बकरा ची शेवटची दोन आयात, तुम्ही या दोन प्रकाशां पैकी कोणतेही [ शब्द] हुरुफ तिलावत [वाचन] केल्याने वाचणाऱ्याला खुप नेकी व पुण्य मिळेल तसेच ते सुद्धा मिळेल ज्याची तुम्ही दुआ [याचना] केली असेल>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

जिब्राईल अलैसलाम प्रेषितांसोबत [सलामती असो त्यांच्यावर]बसले असतांना, आकाशातुन एक आवाज ऐकु आला, जसे कुणी दरवाजा उघडतांना आवाज ऐकु येतो, हा दरवाजा पहिल्यांदा उघडल्या गेला नव्हता, या दरवाजातून एक फरिश्ता दुत आला, जो पहिले कधिच जमीनीवर उतरला नव्हता, त्याने सर्वप्रथम प्रेषितांना[ अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] सलाम सादर केला, तदनंतर त्याने प्रेषितांना [अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] शुभवार्ता दिली की साक्षात अल्लाह ने तुम्हाला दोन अप्रतिम [ भेट] देणग्या प्रदान केल्या, आणी या दोन ची तिलावत [वाचनावर] नेहमीच भलाई व दुआ चा स्वीकार होतो.

فوائد الحديث

सदर हदिस मधे सुरह फातीहा व सुरह बकरा ची शेवटची दोन आयात चे महत्व विषद केले आहे, यांचे [वाचन] पठण व त्यावर आचरणाकडे इशारा करण्यात आला आहे.

आकाशाचे दार फक्त आणी फक्त अल्लाह च्या आदेशानेच उघडल्या जातात, व त्याच्याच आदेशाने बंद राहतात, आणी इथुनच अल्लाह चा आदेश येतो.

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम चे उच्च स्थान व दर्जा दिसतो, कुण्याच पैगंबराला अशी महान देणगी देण्यात आली नव्हती, सुरह फातीहा व सुरह बकरा ची शेवटची दोन आयात.

धार्मिक शीकवणी बाबतीत शुभवार्ता देणे व [उम्मीद] आशेची किरण दाखविणे एक सुंदर पद्धत आहे.

التصنيفات

Virtues of Surahs and Verses, The Angels