अल्लाहुम्मा किनी अजाबका यौमा तजमवु अव तबअसु इबादका>>.…

अल्लाहुम्मा किनी अजाबका यौमा तजमवु अव तबअसु इबादका>>. अर्थात: हे प्रभु ज्या दिवसी तु आपल्या समस्त दासांना जमा करशील, किंवा पुन्हा जिवंत करशील, त्या दिवसी नरकाग्नी पासुन माझी सुटका कर

हुजैफा बिन यमान रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर जेव्हा झोपण्याची तयारी करत असत, तेव्हा आपला उजवा हात आपल्या डोक्या खाली ठेवत व दुआ करत की:<<अल्लाहुम्मा किनी अजाबका यौमा तजमवु अव तबअसु इबादका>>. अर्थात: हे प्रभु ज्या दिवसी तु आपल्या समस्त दासांना जमा करशील, किंवा पुन्हा जिवंत करशील, त्या दिवसी नरकाग्नी पासुन माझी सुटका कर.

[صحيح] [رواه الترمذي]

الشرح

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर जेव्हा झोपत असत तेव्हा आपला उजवा हात उस्ती सारखा उजव्या गाला खाली ठेवत, मग दुआ करत की: <<अल्लाहुम्मा>> रब्बी <<किनी>> माझ्या पालनकर्त्या! मला तुझ्या <<अजाबका >>प्रकोपा पासुन दुर ठेव, <<यौमा तजमाऊ औ तब'असु इबादका >> ज्या दिवसी तु आपल्या दासांना एकत्र जमा करशील किवा पुन्हा जिवंत करशील.

فوائد الحديث

या दुआ चे फायदे:

ही दुआ फार बरकत ची दुआ आहे, ज्याप्रमाणे प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] यावर आचरण करत होते, म्हणुन यावर आचरण करणे पुण्याचे प्रतिक आहे.

झोपताना उजव्या कुशीवर झोपणे.

म्रुत्यु ची आठवण

ईमाम सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की:(अल्लाहुम्मा किनी अजाबका) वरुन सिद्ध होते की बुद्धीवान माणसाने झोपेला म्रुत्यु व आखीरतच्या परलोकाचे आठवणीचे साधन बनवावे.

अल्लाहच्या कृपेने आणि दयेने त्या व्यक्तीला न्यायाच्या दिवशी अल्लाहच्या शिक्षेपासून वाचवले जाते, त्या व्यक्तीला चांगले कर्म करण्याची क्षमता मिळते आणि अल्लाह त्याच्या पापांची क्षमा करतो.

प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर तळमळ सदर दुआ मधे प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर अल्लाह खातर कमालीची नम्रता व तळमळ झळकते.

न्यायाच्या दिवसा वर अतुट विश्वास,

सदर हदिस मधे कयामत च्या न्यायनिवाड्याच्या दिवसावर ठाम विश्वास आढळतो, ज्यादिवसी एकमेव अल्लाह आपल्या दासां कडुन त्यांच्या कर्माचा हिशेब घेईल,

ज्याचा हिशेब चांगला असेल तो अल्लाह ची स्तुतीगाण करील, व ज्याचा हिशेब बरोबर नसेल तो स्वतःला च दोषी ठरवेल,

निश्चितच अल्लाह आपल्या दासांच्या कर्मांचे जरुर मोजमाप करणार आहे.

साहाबांचे प्रेषितांवर सलामती असो त्यांच्यावर अतुट प्रेम झळकते,

प्रेषितांच्या साहाबांनी [सहंगड्यांनी] अत्यंत काटेकोरपणे मोठ्या प्रेमाने व आत्मीयतेने प्रेषितांच्या [सलामती असो त्यांच्यावर] एक- एक आचरण कलमबद्ध केले, इथपर्यंत झोपण्याची पद्धत सुद्धा कलमबद्ध केली.

उजव्या हाताचा उपयोग:

'प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] आपले प्रत्येक काम उजव्या बाजुनेच सुरू करणे आवडत असे, त्या कामा शीवाय जे काम फक्त डाव्या बाजुने करायचे असते.

शारीरिक फायदे:

उजव्या कुशीवर झोपणे शरीराला फायद्याचे ठरते, कारण मानवी ह्रदय उजव्या बाजुने असते, जर डाव्या कुशीवर झोपले तर ह्रदयावर दबाव पडतो, त्याउलट उजव्या बाजुने झोपल्यास ह्रदयाला आरामदायक व लवकर उठण्यात मदत मिळते.

التصنيفات

Manners of Sleeping and Waking Up