जेव्हा साक्षात अल्लाह कुण्या दासा वर प्रेम करतो, तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो:मी त्या दासांवर प्रेम…

जेव्हा साक्षात अल्लाह कुण्या दासा वर प्रेम करतो, तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो:मी त्या दासांवर प्रेम करतो, तु सुध्दा त्याच्याशी प्रेम कर, जिब्राइल त्या व्यक्ती वर प्रेम करतात

अबू हुरैरा अल्लाह त्याच्यावर प्रसन्न होऊ म्हनतात: मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<जेव्हा साक्षात अल्लाह कुण्या दासा वर प्रेम करतो, तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो:मी त्या दासांवर प्रेम करतो, तु सुध्दा त्याच्याशी प्रेम कर, जिब्राइल त्या व्यक्ती वर प्रेम करतात, मग आकाशात घोषणा केली जाते की, निसंकोच अल्लाह फला दासा वर प्रेम करतो, तुम्ही सुद्धा त्याच्या वर प्रेम करा, मग काय, समस्त आकाशातील वसणारे त्या व्यक्ती वर प्रेम करु लागतात, मग त्याच्या करता जमीनीवर जनमाणसात प्रेमभाव व आपुलकी निर्माण होते, लोकाच्या ह्रदयात त्याच्यावर प्रेम व आपुलकी निर्माण होते, जर अल्लाह कुण्या व्यक्ती वर नाराज होतो, तर जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो:मी फला दासा वर नाराज आहे, तु पण त्याचा राग कर, मग जिब्राईल त्याचा राग करतात, मग आकाशात घोषणा करण्यात येते की अल्लाह या दासा शी नफरत करत आहे, तुम्ही पण याच्याशी [तिरस्कार]नफरत करा, मग समस्त आकाशातील वसणारे त्या व्यक्ती शी नफरत करु लागतात, मग त्या व्यक्ती वर जमीनीवर वसणारे सर्वच नफरत करु लागतात, मग त्याच्या करता सर्वत्र नफरत म्हणजे लोकांच्या ह्रदयात तिरस्कार ठेवल्या जातो>>.

[صحيح] [صحيح مسلم]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सांगीतले की जेव्हा साक्षात अल्लाह कुणा श्रद्धावान व सत्कर्मी तसेच आज्ञापालन दासावर प्रेम करतो;तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो की: मी फला दासा वर प्रेम करतो,तु सुध्दा त्याच्याशी प्रेम कर. मग जिब्राईल सुद्धा त्या दासा वर प्रेम करु लागतात, मग ते आकाशातील समस्त फरिश्तांना आवाहन करतात की: अल्लाह फला दासा वर प्रेम करतो आहे, तुम्ही सुद्धा त्याच्याशी प्रेम करावे, मग समस्त आकाशातील वसणारे समस्त निर्मीती त्या व्यक्ती शी प्रेम करु लागतात, जमीनीवर श्रद्धावान लोकांच्या ह्रदयात प्रेम व‌ आपुलकी टाकल्या जाते. जेव्हा अल्लाह कुण्या व्यक्ती वर नाराज असतो, तेव्हा जिब्राईल ला बोलावितो व फरमावितो की: मी फला व्यक्ती वर नाराज आहे, तु सुध्दा त्याचा तिरस्कार कर, मग जिब्राईल त्याच्या वर नाराज होतात, मग आकाशात घोषणा केली जाते की: अल्लाह फला दासा वर नाराज आहे, तुम्ही सर्व त्याचा तिरस्कार करा मग समस्त आकाशातील वसणारे त्या व्यक्ती वर नाराज होतात व जमीनीवर लोकांच्या ह्रदयात त्या व्यक्ती साठी नफरत टाकल्या जाते.

فوائد الحديث

इब्ने अबी जमरा सांगतात की: जिब्राईल ला सर्व प्रथम माहिती देणे, याचं प्रमाण आहे की जिब्राईल अलैस्लाम चा दर्जा फरिश्ता मध्ये सर्वात मोठा आहे.

अल्लाह ज्याच्याशी प्रेम करतो, जमीन व‌ आकाशवाले सुद्धा त्याच्याशी प्रेम करतात, व ज्याच्याशी अल्लाह नाराज होतो त्याच्याशी जमीन व‌ आसमानवाले सुद्धा नाराज होतात.

सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की:(जमीनीवर त्याच्या करता आपुलकी निर्माण केल्या जाते) यांचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणुस त्याला पसंद करतो, तर जेवढं अल्लाह इच्छीतो तेवढीच माया लोकांच्या ह्रदयात टाकतो, कारण वाईट लोकं नेहमीच भल्या लोकांचे दुश्मन असतात.

सदर हदिस नेकी कडे झुकण्यावर उत्तेजीत करते, मग ते सत्कर्म अनिवार्य असो की ऐच्छिक असो, तसेच ही हदिस वाईट काम व पापी कर्मा पासुन वाचण्याची शिकवण देते,कारण तसे क्रुत्य अल्लाह च्या नाराजीचे कारण बनते.

ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की: लोकांच्या ह्रदयात कुणासाठी प्रेम असणे अल्लाह च्या प्रेमाचे प्रतीक आहे, याची ग्वाही हि हदिस देते: "तुम्ही भुतलावर अल्लाह चे साक्षीदार आहात."

इब्न अल-अरबी मलिकी म्हणतात: जमीनीवरील लोकं म्हणजे ते लोकं जे या व्यक्तीला ओळखतात, ते नाही जे याला ओळखतच नाहीत.

التصنيفات

Oneness of Allah's Names and Attributes