إعدادات العرض
गुपित रहस्य च्या पाच चाब्या आहेत
गुपित रहस्य च्या पाच चाब्या आहेत
हजरत ईब्ने उमर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की: <<गुपित रहस्य च्या पाच चाब्या आहेत, {निसंकोच एकमेव अल्लाह कडे कयामत चे ज्ञान आहे, आभाळातुन पाणी पाळणारा तोच आहे, तोच जाणतो जे काही गर्भात दडलेले आहे, उद्या काय कमावणार, हे कोणताच जिव जाणत नाही उद्या कोण कुठे मरण पावणार, हे कुणालाच ठाऊक नाही, निसंशय एकमेव अल्लाह सर्व काही जाणणारा आहे, सुक्ष्म खबर ठेवणारा आहे} >>.
الترجمة
العربية Português دری Македонски Tiếng Việt Magyar ქართული বাংলা Kurdî Indonesia ไทย অসমীয়া Nederlands ਪੰਜਾਬੀ Kiswahili Tagalog Hausa ភាសាខ្មែរ English ગુજરાતી Русскийالشرح
पडद्याआड असणारे गुपित ज्ञान केवळ एकमेव अल्लाह कडेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुणीच त्याबाबतीत काहीच जाणत नाही, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले आहे की, गुपितांच्या चाब्या आणी त्याचे खजीने पाच आहेत: १:कयामत कधी येईल, त्याचे ज्ञान फक्त एकमेव अल्लाह कडेच आहे, याचा ईशारा परलोकाच्या ज्ञाना कडे आहे, कारण कयामत चा दिवस म्हणजे परलोकाची सुरुवात असेल, जेव्हा सुरुवाती च्या ज्ञानापासुनच जणमानस अनभिज्ञ असेल तर मग नंतरच्या ज्ञाना वर प्रभुत्व असण्याचा प्रश्नच येत नाही. २:पाउस कधि पडेल, त्याचे संपुर्ण ज्ञान सुद्धा फक्त एकमेव अल्लाह कडेच आहे, हे ज्ञान आकाशामधील विषयाकडे लक्ष्य वेधते, कधि कधि पावसाचा अंदाज लावता येतो, परंतु तरिही पावसा बाबत स्पष्ट आणी अचुक अंदाज लावणे अशक्यच. ३:गर्भाशयात काय आहे; मुलगा किंवा मुलगी, काळा किंवा गोरा, परिपूर्ण आहे कि अपुर्ण, सदाचारी असेल की दुराचारी वगैरे, गर्भाशयाचा उल्लेख या साठी आला आहे, कारण लोकं याबाबत सुद्धा अंदाज लावतात, परंतु सखोल परोक्षाचे ज्ञान कुणालाच नसते, यावरुन सिद्ध होते की गुपित रहस्या चे ज्ञान तर अशक्यच आहे. ४:कोणतीच व्यक्तिं जाणत नाही की उद्या तो काय करणार, किंवा काय कमावणार आहे, जगामधील घडामोडी बाबत यात स्पष्ट इशारा आहे, उद्या शब्द याकरता वापरला गेला आहे, कारण तो अत्यंत जवळचा काळ प्रदर्शित करतो, जर एवढ्या जवळच्या दिवसावर मानवाची कोणतीच पकड नाही तर दुरच्या भविष्याचे ज्ञान कदापिही शक्यच नाही. ५-कोणत्याच सजिवाला माहित नाही की तो कोणत्या जमीनीवर मरण पावणार आहे, हा भुगर्भातील ज्ञानाकडे इशारा आहे, हालाकी अनेक लोकं आपल्या जन्मभुमितच मरण पावतात, परंतु तरी कुणीच अचुक सांगु शकत नाही की, कोणत्या ठिकाणी त्याला मृत्यु येईल, व त्याला कुठे दफन करण्यात येईल, मग त्याच्या पुर्वजांच्या कबरी तिथेच का असोनात, {निसंशय अल्लाह ज्ञानी व सर्व काही जाणणारा आहे} म्हणजे तो बाह्य व आंतरीक, लपलेले व उघड असलेले सर्व अवस्थेचे सखोल ज्ञान ठेवतो, या आयत मध्ये सर्व गुपित रहस्या च्या ज्ञानावर प्रकाश टाकला आहे, प्रत्येक खोट्या दाव्यांना खोडुन काढण्यात आले आहे.فوائد الحديث
गुपित पाच रहस्या वर प्रकाश, ज्याचे परिपूर्ण ज्ञान अल्लाह व्यतिरिक्त कुणालाच नाही.
प्रख्यात विद्वान अल्लामा सिनदी रहमतुल्लाह सांगतात की:या पाच रहस्यांना मफातिहुल गैब यावरुन म्हटले आहे; कारण ज्याच्या जवळ या पाच वस्तुंचे पुर्ण ज्ञान असेल, म्हणजे त्याच्याजवळ पुर्ण गुपितांचे ज्ञान एकवटले, अर्थात हे ज्ञान असणे गुपित खजाणाच्या चाब्या बनल्या सारखे आहे.
विद्वान अल्लामा इब्ने हजर रहमतुल्लाह वर्णन करतात की: इब्ने अबि जमरा रहमहुल्लाह सांगतात की: चाबी हा शब्द आम श्रोत्यांना गोष्ट अगदी निकट करण्यासाठी वापरण्यात आला आहे; कारण ति प्रत्येक वस्तु जिच्यात व तुमच्यात पडदा ति वस्तु तुमच्या करिता गैब म्हणजे गुपित च असते, एरवी अशा वस्तुंपर्यंत पोहचण्यासाठी दार असते, जेव्हा दारच बंद असेल तर त्याला उघडण्यासाठी चाबी ची आवश्यकता लागते, ज्याद्वारे गुपितां पर्यंत पोहचता येते, तेच माहित नसेल तर खुद्द (गैब) रहस्य कसे जाणता येईल.
ईब्ने अबि जमरा रहमहुल्लाह फरमावितात की:त्यांची संख्या पाच असणे, यावरुन सिद्ध होते की संपुर्ण ज्ञानाचे स्त्रोत यामध्येच समाविष्ट होतात.
एकमेव अल्लाह आपल्या दिव्यद्रॄष्टिद्वारे काही रहस्या बाबत आपल्या प्रेषितांवर सल्लल्लाहु अलैही व सल्लम त्या रहस्यांची हकिकत उघड करतो.
यावरुन जादुगर व भविष्य सांगणाऱ्यांचे दावे प्रतिदावे सपशेल खोटे असल्याचे सिद्ध होतात, आणी जो कुणी असा गोष्टीचा दावा करत असेल, जो फक्त आणी फक्त एकमेव अल्लाह चा विशेष अधिकार आहे, तसा व्यक्ती एकमेव अल्लाह व त्याच्या प्रेषितांचा सल्लल्लाहु अलैही व सल्लम व पवित्र कुरआन च्या विशेष अधिकाराला सपशेल नकारतो.
