नमाज मध्ये प्रथम रांगेला पुर्ण करा, तदनंतर त्यालगत च्या, जर कुण्या रांगेत पोकळी राहत असेल तर अंतिम रांगेत असावी

नमाज मध्ये प्रथम रांगेला पुर्ण करा, तदनंतर त्यालगत च्या, जर कुण्या रांगेत पोकळी राहत असेल तर अंतिम रांगेत असावी

हजरत अनस बिन मालीक रजि.वर्णन करतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की: <<नमाज मध्ये प्रथम रांगेला पुर्ण करा, तदनंतर त्यालगत च्या, जर कुण्या रांगेत पोकळी राहत असेल तर अंतिम रांगेत असावी>>.

[صحيح] [رواه أبو داود والنسائي]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सामुहिक नमाज अदा करणाऱ्या पुरुषांना हुकुम दिला आहे की, सर्वप्रथम पहिल्या रांगेला पुर्ण करावे, त्यानंतर त्यालगतच्या रांगेला पुर्ण करावे, अशा पद्धतीने क्रमानुसार, जर कोणती रांग अपुर्ण राहत असेल तर ती शेवटची रांगच असावी.

فوائد الحديث

नमाज मध्ये सरळ रांगेतच उभे राहणे व रांगाना पुर्ण करणे पैगंबरांची सलामती असो त्यांच्यावर शिकवणी पैकी आहे.

नमाजी मंडळींनी सर्वप्रथम पहिल्या रांगेला पुर्ण करावे व त्यात रिकामी जागा सोडु नये,

जर शील्लक जागा उरत असल्यास, ती शेवटच्या रांगेत उरली पाहिजे, पहिल्या किंवा मधातल्या रांगेत कदापिही पोकळी ठेऊ नये.

التصنيفات

Virtue and Rulings of Congregational Prayer