अग्नी द्वारे सजा देणे कुणालाही वैध नाही, फक्त जो अग्नीचा [ रब ]पालनकर्ता आहे तोच ती सजा देऊ शकतो

अग्नी द्वारे सजा देणे कुणालाही वैध नाही, फक्त जो अग्नीचा [ रब ]पालनकर्ता आहे तोच ती सजा देऊ शकतो

हजरत अब्दुल्ला बिन मसुद रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: आम्ही प्रेषितां समवेत प्रवासात असतांना, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर शौचाला गेले असतांना, आम्ही एक चिमणी बघितली जिच्या सोबत दोन पिल्लं होती, आम्ही त्या चिमणीच्या पिल्लांना पकडले, चिमणी ने बघितले व ती तडफडु लागली, तेवढ्यात प्रेषित सलामती असो त्यांच्यावर परत आले, व फरमाविले की:<<कुणी या चिमणी ला तिच्या पिलांमुळे त्रास दिला? तिच्या पिलांना परत करा>> नंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एक मुंग्यांचं जळालेलं घरटं बघितलं ज्याला आम्ही जाळलं होतं, त्यावर दयाळु क्रुपाळु प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<कुणी जाळलं?>> आम्ही म्हणालो: हे प्रेषिता आम्ही. त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<< अग्नी द्वारे सजा देणे कुणालाही वैध नाही, फक्त जो अग्नीचा [ रब ]पालनकर्ता आहे तोच ती सजा देऊ शकतो>>.

[صحيح] [رواه أبو داود]

الشرح

अब्दुल्ला बिन मसुद अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर सांगतात की ते प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर समवेत प्रवासात होतो, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर शौचाला बाहेर गेले असतांना, सहाबांनी [सोबत्यांनी] एक चिमणी बघितली, जिला दोन पिल्लं सुद्धा होती, त्यांनी त्या पिल्लांना पकडुन ठेवलं, चिमणी आपल्या पिल्लां करता घाबरली व आकांडतांडव करत होती, पंख जमीनीवर पसरवुन नैराश्य व‌ भितीपोटी चिंतेचं प्रदर्शन करत होती, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर परत आले व म्हणाले: कुणी या चिमणीला तिच्या पिल्लामुळे चिंतेत टाकले?! मग प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आदेश दिला की, पिल्लांना ताबडतोब परत करा. त्यानंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर जळालेलं मुंग्याचं घरटं बघितलं, विचारले की कुणी जाळलं? सोबती म्हणाले की: आम्ही. त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:कोणत्याही जिवंत जिवाला जाळण्याचा अधिकार कुणालाच नाही,कुणाला प्रकोप देणे, हा फक्त एकमेव अल्लाह चा अधिकार आहे.

فوائد الحديث

शौचा वेळी पडदा करणे आवश्यक व जरुरी आहे.

मुक्या जनावरांच्या पिल्लांना त्यांच्यापासून वेगळे करुन त्रास देणे अमान्य आहे.

किडे मुंग्यांना आगीने जाळणे हराम व अवैध क्रुत्य आहे.

ईस्लाम ने जनावरांवर सुद्धा दया व क्रुपा करण्याची शिकवण दिली व त्यावर अंमलबजावणी करुन दाखवली.

प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर जनावरांवर दया व माया दाखवते की ते रहमत पैगंबर आहेत.

अग्नी द्वारे सजा देणे फक्त अल्लाह चा विशेष अधिकार आहे, अन्य कुण्याच मनुष्याला तसा अधिकार नाहीच.

التصنيفات

Manners of Jihad, Animal Rights in Islam