निःसंशय हि मस्जीद आहे, व मस्जीद अशा लघवी व घाण करण्यासाठी नसतात, मस्जीद तर एकमेव अल्लाह चे स्मरण,नमाज व कुरआन पठण…

निःसंशय हि मस्जीद आहे, व मस्जीद अशा लघवी व घाण करण्यासाठी नसतात, मस्जीद तर एकमेव अल्लाह चे स्मरण,नमाज व कुरआन पठण करता असते

अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: आम्ही प्रेषितां समवेत मस्जीद मधे उपस्थित होतो तेवढ्यात एक खेड्यागावचा मनुष्य आला, व कोपऱ्यात उभा राहुन लघवी करु लागला, प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर सोबत्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:<<त्याला नका थांबवु, त्याला सोडून द्या>> मग काय सहाबांनी त्याला सोडुन दिले, तोपर्यंत त्याने लघवी पुर्ण केली, तद्नंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्या व्यक्तीला बोलावुन सांगितले की:<<निःसंशय हि मस्जीद आहे, व मस्जीद अशा लघवी व घाण करण्यासाठी नसतात, मस्जीद तर एकमेव अल्लाह चे स्मरण,नमाज व कुरआन पठण करता असते>> त्यानंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एका व्यक्तीला बोलावुन त्या लघवी वर पाणी टाकायला लावले.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहकाऱ्यां समवेत मस्जीद मधे बसले असतांना, मस्जीद मधे त्या गावच्या व्यक्ती ने कोपऱ्यात लघवी करुन टाकली. सहाबांनी त्याला दमदाटी करून थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:त्याला सोडून द्या,त्याची लघवी मधात नका थांबवु, म्हणुन सहाबांनी त्याला सोडुन दिले,त्याने लघवी पुर्ण केली. त्यानंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर त्याला जवळ बोलाविले व मोठ्या प्रेमाने त्याला समजावले की: मस्जीदी अशाप्रकारे लघवी किंवा घाण पसरविण्या करता नसतात, त्याउलट मस्जीदी अल्लाह चे नामस्मरण, व नमाज पठण तसेच कुरआन पठणा करता असतात. नंतर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर एका साहाबीला बोलावुन त्यावर पाणी ओतण्यास सांगितले, ति अशुद्धी दुर व्हावी.

فوائد الحديث

मस्जीद ची पवित्रता व आदर आवश्यक आहे, तिथे कोणत्याच प्रकारची घाण व अनावश्यक वस्तु अमान्य आहे.

.ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: या हदिस वरुन सिद्ध झाले आहे की, मस्जीद मधे थुंकणे व आरडाओरडा व भांडण करणे, तसेच खरेदी विक्री या सर्व बाबी मना करण्यात आल्या आहेत.

अडाणी माणसाला मोठ्या प्रेमाने व नरमाईने समजावणे जरुरी आहे, जोपर्यंत ती व्यक्ती हट्टाने व जाणुन बुजुन करत नाही.

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर एक कोमळ मनाचे व मेहेरबान व आदर्श शिक्षक होते, त्यांनी दमदाटी न करता किती प्रेमाने समजावीले.

मस्जीदांचा अल्लाह ची भक्ती व उपासना तसेच कुरआन पठणा करता व अल्लाह च्या स्मरणा करताच उपयोग करावा.

التصنيفات

The rulings of mosques