“कबर ही परलोकातील पहिली पायरी आहे, म्हणून जर एखाद्याला त्यातून वाचवले गेले, तर त्याच्या नंतरचे जे येते ते…

“कबर ही परलोकातील पहिली पायरी आहे, म्हणून जर एखाद्याला त्यातून वाचवले गेले, तर त्याच्या नंतरचे जे येते ते त्याच्यापेक्षा सोपे आहे आणि जर कोणी त्यातून सुटले नाही तर नंतर जे येते ते त्याहून अधिक गंभीर आहे. .”

हानी, जो उस्मान रजिअल्लाहु अन्हु यांचे सेवक होते, ते सांगतात: जेव्हा उस्मान रजिअल्लाहु अन्हु एखाद्या कबरीजवळ उभे राहत, तेव्हा इतके रडत की त्यांची दाढी ओलसर होई. त्यांना विचारले गेले: “तुमच्या समोर जेव्हा जन्नत आणि जहन्नमचा उल्लेख होतो, तेव्हा तुम्ही रडत नाही, पण कबरीसमोर इतके का रडता?” ते म्हणाले: “मी अल्लाहचे रसूल ﷺ यांना असं म्हणताना ऐकलं आहे —” “कबर ही परलोकातील पहिली पायरी आहे, म्हणून जर एखाद्याला त्यातून वाचवले गेले, तर त्याच्या नंतरचे जे येते ते त्याच्यापेक्षा सोपे आहे आणि जर कोणी त्यातून सुटले नाही तर नंतर जे येते ते त्याहून अधिक गंभीर आहे. .”

[حسن] [رواه الترمذي وابن ماجه]

الشرح

अमीरुल-मोमिनीन उस्मान बिन अफ्फान रजिअल्लाहु अन्हु जेव्हा एखाद्या कबरीजवळ उभे राहत, तेव्हा इतके रडत की त्यांच्या अश्रूंनी दाढी पूर्ण भिजत असे. त्यांना विचारले गेले: तुम्ही जन्नत आणि जहन्नमचा उल्लेख ऐकता, पण ना जन्नतीची ओढ वाटते म्हणून रडता, ना नरकाच्या भीतीने! पण कबरीसमोर मात्र रडता? ते म्हणाले: पैगंबर मुहम्मद ﷺ यांनी सांगितले आहे की, कबर ही परलोकातील पहिली थांबण्याची जागा आहे. जर मनुष्य त्यातून सुरक्षित आणि मुक्त झाला, तर त्यानंतरची सर्व ठिकाणे त्याच्यासाठी सोपी असतील. पण जर तो कबरीच्या शिक्षेतून वाचला नाही, तर त्यानंतरचा प्रत्येक टप्पा त्याहून अधिक कठीण आणि भयंकर असेल.

فوائد الحديث

हजरत उस्मान रजिअल्लाहु अन्हु यांच्या जीवनातून हे स्पष्ट होते की, जरी पैगंबर मुहम्मद ﷺ यांनी त्यांना जन्नतची खुशखबर दिली होती, तरीही त्यांच्या मनात अल्लाहची भीती आणि परलोकाचा भय खूप खोल होता.

कबरेची आणि पुनरुत्थानाची भयानकता लक्षात ठेवून रडण्याची परवानगी आहे.

कब्रच्या सुख-सुविधा आणि तिच्या शिक्षेचा अस्तित्व:

थडग्याच्या यातनाची भीती.

التصنيفات

Terrors of the Graves