प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर मला उद्देशून सांगितले की:<<माझ्या समक्ष कुरआन पठण करा

प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर मला उद्देशून सांगितले की:<<माझ्या समक्ष कुरआन पठण करा

अब्दुल्ला बिन मसुद अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषित मुहम्मद सलामती असो त्यांच्यावर मला उद्देशून सांगितले की:<<माझ्या समक्ष कुरआन पठण करा>> मी म्हणालो: हे प्रेषिता, काय मी तुमच्या समक्ष पठण करु, सत्य हे आहे की, तुमच्यावर तर [वही] आसमानी संदेश चे अवतरण झाले? प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:<<होय>> बस्स मग काय मी सुरह निसा चे पठण सुरू केले, ईथपावेतो की मी सदर आयती पर्यंत पोहचलो असता:{फकयफा ईजा जिअना मिन कुल्ली ऊम्मतिन बिशहिद व जिअना बिका अला हावउलाइ शहिदा} [निसा: ४१], तेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर ईशारा केला की:<<बस्स करा एवढे पुरेसे आहे>> मग जेव्हा मी बघितलं तेव्हा प्रेषितांचे सलामती असो त्यांच्यावर डोळे पाणावले होते.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर अब्दुल्ला बिन मसुद अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला म्हणाले की:तुम्ही कुरआन चा काही भाग माझ्या समक्ष पठण करावा, ईब्ने मसुद नम्रतेने म्हणाले:हे प्रेषिता, मी का बरे पठण करु शकतो, कुरआन तर साक्षात तुम्हावर अवतरीत झाला आहे?! प्रेषितांनी सलामती त्यांच्यावर फरमाविले:माझी तिव्र ईच्छा आहे की, मी दुसऱ्या कडुन कुरआन ऐकावे, मग ईब्ने मसुदांनी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर सुरह निसा चे पठण सुरू केले, जेव्हा ते या आयतीवर पोहचले:{फकयफा ईजा जिअना मिन कुल्ली ऊम्मतिन बिशहिद व जिअना बिका अला हावउलाइ शहिदा}. अर्थात त्या दिवशी काय अवस्था होईल? जेव्हा आम्ही तुम्हाला त्या लोकांवर साक्षीदार बनवु की तुम्ही आपल्या (उम्मत) जनसमुहा समोर अल्लाह चा संदेश पोहचविला, तेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:आता बस्स पठण थांबवा, ईब्ने मसुद अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर सांगतात की: मी जेव्हा प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर बघितले, तेव्हा पैगंबरांचे डोळे अल्लाह च्या भितीने व उम्मत च्या प्रेमापोटी व दयालुतेमुळे पाणावले होते.

فوائد الحديث

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:कुरआन चे पठण ऐकणे त्यावर चिंतन व मनन करणे, तसेच रडणे सुद्धा अगत्याचे आहे, आणी हे सुद्धा गरजेचे आहे की दुसरा कुरआन चे पठण करत असेल तर त्यावर कान‌ धरुन ऐकावे कारण दुसऱ्या कडुन ऐकणे, स्वतः वाचण्यापेक्षा जास्त समजणे व चिंतन करणे सोयीस्कर असते.

कुरआन ऐकण्यात सुद्धा तेवढेच पुण्य आहे जेवढे त्याला वाचण्यात आहे.

अब्दुल्ला बिन मसुद अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर ची महानत यावरुन सिद्ध होते की, स्वतः प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर त्यांचे कुरआन वाचन आवडायचे, हे याचे स्पष्ट उदाहरण आहे की ईब्ने मसुद अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कुरआन ला मुखपाठ तसेच त्यावर प्रभुत्व राखण्यात प्राविण्य प्राप्त होते.

कुरआन चे पठण ऐकुन सर्वोच्च अल्लाह च्या भितीने रडणे गरजेचे आहे, सोबतच कुरआन ऐकतांना एकाग्रता व शांतीमय वातावरण बनविने तसेच आरडाओरडा पासुन दुर राहणे अत्यावश्यक आहे.

التصنيفات

Manners of Reading and Memorizing the Qur'an