जेवण एकत्रीतपणे करा, व अल्लाहचे नाव घ्या, यामुळे तुमच्या अन्नात बरकत टाकली जाईल

जेवण एकत्रीतपणे करा, व अल्लाहचे नाव घ्या, यामुळे तुमच्या अन्नात बरकत टाकली जाईल

वहशी बिन हरब रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या सोबत्यांनी सवाल केला की,हे, अल्लाह च्या प्रेषिता [सलामती असो त्यांच्यावर] ! आम्ही जेवण तर करतो पण पोट भरत नाही? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की:<<काय तुम्ही एकटे एकटे जेवता?>> ते ऊत्तरले:होय. प्रेषित म्हणाले की:<<जेवण एकत्रीतपणे करा, व अल्लाहचे नाव घ्या, यामुळे तुमच्या अन्नात बरकत टाकली जाईल>>.

[حسن] [رواه أبو داود وابن ماجه وأحمد]

الشرح

काही साहाबांनी प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर प्रश्न केला की: आम्ही जेवण भरपुर करतो, परंतु आम्हाला पोट भरण्याचा भास होत नाही. म्हणून पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याला म्हणाले: काय तुम्ही जेवतांना वेगवेगळे बसता?व प्रत्येक जण वेगवेगळं जेवण करतो? त्यांनी उत्तर दिले की:होय आम्ही वेगवेगळे जेवतो. प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर म्हणाले की :सर्वजण मिळुन भोजन करा, व अल्लाह चे नाव घ्या म्हणजे बिस्मिल्लाह म्हणा, तुमच्या अन्नात बरकत राहील, तसेच तुम्हाला पोट भरल्याचा आनंद सुद्धा होईल.

فوائد الحديث

जेवतांना एकत्रित जमा होणे जरुरी आहे, व जेवणापुर्वी अल्लाह चे नाव घ्यावे, बिस्मिल्लाह म्हणने जेवणात बरकत व समाधानाचे निमीत्त आहे.

फुटाफुट [वेगवेगळे] मुळे आपलेच नुकसान आहे, त्याउलट एकत्र*जमणे भलाई चे कारण आहे.

या हदिस मधे जेवतांना एकत्रित जमा होणे व जेवणापुर्वी अल्लाह चे नामस्मरण करण्याची शीकवण देण्यात आली आहे.

सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की: एकत्र जमल्याने जेवणात बरकत उतरते व अल्लाह चे नामस्मरण केल्याने शैतानचा जेवणापर्यंत पोहचण्याचा मार्ग रोकल्या जातो.

التصنيفات

Manners of Eating and Drinking