जेव्हा मला मेअराज [साक्षात नरक व स्वर्गाचं दर्शन] झाली तेव्हा मला काही असे लोक दिसले ज्यांचे नखे तांब्याचे व ते…

जेव्हा मला मेअराज [साक्षात नरक व स्वर्गाचं दर्शन] झाली तेव्हा मला काही असे लोक दिसले ज्यांचे नखे तांब्याचे व ते स्वतःचे तोंड व छाती

अनस बिन मालीक रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<जेव्हा मला मेअराज [साक्षात नरक व स्वर्गाचं दर्शन] झाली तेव्हा मला काही असे लोक दिसले ज्यांचे नखे तांब्याचे व ते स्वतःचे तोंड व छाती ला फाडत होते, मी विचारले:हे जिब्राईल, हे कोण लोक आहेत? हे ते लोकं आहेत, जे माणसाचं मांस [इतरांची निंदा करतात]खातात, व त्यांच्या सन्मानाची खेळत असत>>.

[حسن] [رواه أبو داود]

الشرح

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी सांगितले की: जेव्हा त्यांना मेअराज [स्वर्ग व नरका चे साक्षात दर्शन करण्यात आले] तेव्हा त्यांचा सामना अशा लोकांशी झाला, ज्यांची नखे तांब्याचे, ते त्या नखांनी आपलेच चेहरा व छाती अक्षरश लचक्याने तोडत होते, प्रेषितांनी जिब्राईल ला विचारले की हे कोण लोक आहेत व त्यांच्या सोबत ही वर्तणुक का होत आहे? जीब्राईल अलैसलाम उत्तरले की:हे लोकं दुसऱ्यांची निंदा नालस्ती करीत व लोकांचे मान सन्मानाची चेष्टा करीत असत.

فوائد الحديث

निंदा नालस्ती करण्यापासुन सक्तीने मनाई करण्यात आली आहे, निंदा करणाऱ्याची तुलना माणसाचे मांस खाणाऱ्या सोबत करण्यात आली आहे.

लोकांच्या पाठीमागे त्यांच्या सन्मानावर व प्रतिष्ठेवर हल्ला व निंदा करणे, हे सर्व मोठ्या पापांमधे मोडते.

तीबी रहमतुल्लाह सांगतात की:सदर हदिस मधे "यखमिशुन", चा अर्थ आहे, "लचका तोडणे".

यावर स्पष्टीकरण देताना म्हणतात की:

स्वतःच्या चेहऱ्यावर व छातीवर आपल्या हाताने मारणे व लचका तोडणे, हे क्रुत्य महिलांचे आहे, पुरुषांनी असले क्रुत्य करण्याची प्रथा नाही, म्हणुनच निंदा करणे व मुसलमानांची सन्मान व प्रतिष्ठेवर हल्ला करणे, या गुनाह व पाप करीता अशी सजा देण्यात आली आहे, याद्वारे सिद्ध होते की असे आचरण पुरुषांचे असु शकत नाही, ते फक्त महिलांनाच शोभनीय क्रुत्य आहे.

अद्रुष्य गोष्टी वर विश्वास ठेवणे व त्या सर्व गोष्टी वर विश्वास ठेवणे जे अल्लाह व प्रेषित मुहम्मद [ अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर]नी सांगितली आहेत, अनिवार्य बाबी आहेत.

التصنيفات

Condemning Sins