तिच्या मृतदेहाला तिन, किंवा पाच किंवा गरज भासल्यास अधिक वेळा स्नान करावे,पाणी व बेरीच्या पाना सोबत आणी शेवटच्या…

तिच्या मृतदेहाला तिन, किंवा पाच किंवा गरज भासल्यास अधिक वेळा स्नान करावे,पाणी व बेरीच्या पाना सोबत आणी शेवटच्या स्नानावेळी काफुर किंवा - मात्र काफुर- जरुर टाकावे, आणी हे सर्व पार पडल्यावर मला बोलवावे

हजरत उम्मे अतिया रजिअल्लाहु अनहा कथन करतात की: प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर एका मुलीचा अंत झाला, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर बाहेर आले व म्हणाले:<<तिच्या मृतदेहाला तिन, किंवा पाच किंवा गरज भासल्यास अधिक वेळा स्नान करावे,पाणी व बेरीच्या पाना सोबत आणी शेवटच्या स्नानावेळी काफुर किंवा - मात्र काफुर- जरुर टाकावे, आणी हे सर्व पार पडल्यावर मला बोलवावे>>, हजरत उम्मे अतिया सांगते की:जेव्हा आम्ही स्नान वगैरे पुर्ण केल्यावर प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर बोलाविले, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपला अंगावरील कपडा (शाल]) आम्हाला दिला,व सांगितले की:<<तिला यात गुंडाळा>> (म्हणजे तिच्या शरीराला या कपड्याने गुंडाळून घ्या) आणी उम्मे अतिया सांगते की: तिच्या केसाला तिन वेण्या घातल्या.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर मुलगी जैनब चा मृत्यु झाला, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर महिला कडे आले, ज्या तिला स्नान देणार होत्या व म्हणाले:तिला पाणी व बेरिच्या पाना सोबत विषम संख्येत स्नान करावे, तिन, किंवा पाच, किंवा गरज भासल्यास अधिक जास्त वेळा द्यावे, आणी शेवटच्या स्नानावेळी मात्र काफुर टाकावे, आणी सर्व उरकल्यावर मला कळवावे. जेव्हा महिलांनी स्नान पुर्ण केले, त्यांनी प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर कळविले, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपला तहबंद (कपडा) दिला आणी सांगितले की:तिला या कपड्यात गुंडाळा,व‌ हा कपडा शरीराला चिटकुन ठेवा, मग तिच्या केसाला आम्ही तिन वेण्यांनी गुंफले.

فوائد الحديث

मुसलमान मृतदेहाला स्नान (गुस्ल) देणे अनिवार्य आहे, व ते फर्ज किफाया आहे, (कुणी अदा केले तरी चालते).

स्त्रीयांना स्त्रीयांद्वारेच स्नान दिल्या जाईल,व पुरुषांना पुरुषांद्वारे, फक्त काही अपवादात्मक परिस्थितीत पति आपल्या पत्नीला व पत्नि आपल्या पतिला आंघोळ देऊ शकते, तसेच मालक आपल्या लौंडीला (दासीला) गुस्ल देऊ शकतो.

आंघोळ कमीत कमी तिन वेळा, किंवा पाच वेळा किंवा गरज भासल्यास अधिक जास्त वेळा सुद्धा स्नान घालु शकता, त्यानंतर जर शरीरातून काही नजासत (अपवित्रता) बाहेर येत असेल, तर ज्या ठिकाणाहून घाण बाहेर येते ते ठिकाण बंद केले जाईल.

मृताला स्नान नेहमी विषम संख्येतच समाप्त करावे, तिन,पाच, किंवा सात.

सिनदी रहमतुल्लाह म्हणतात की:मृतदेहाला स्नानाची संख्या ठराविक नाही, तर मुळ उद्देश साफ सफाई आहे, परंतु विषम संख्येचे ध्यान ठेवणे जरुरी आहे.

पाण्यासोबत बोरीचे पानं मिसळावे, कारण त्याद्वारे शरीर साफ व सुरक्षित राहते.

शेवटच्या स्नानावेळी मात्र मृतदेहाला [खुश्बु अत्तर] सुगंध लावण्यात यावा, विशेषकरुन काफुर ज्याचा सुगंध दरवळतो, व शरीराला सुरक्षीत ठेवतो.

आदरणीय अवयव धुण्यापासून सुरुवात केली जाईल, म्हणजे उजव्या बाजूचे अवयव आणि वुजूचे अवयव.

मृतदेहाच्या (महिला) केसाला तिन वेणी मध्ये गुंफावे, व वेणी मागच्या दिशेने ठेवावे.

मृतदेहाला स्नान घालतांना मदत करणे जरुरी आहे, परंतु ठराविक लोकांनाच उपस्थीत ठेवावे.

प्रेषितांच्या अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर पांघरुण किंवा कपड्यांनी (तबर्रूक) प्रसाद लाभ उचलणे फक्त प्रेषितांसोबतच विशेष आहे, अन्य कुणालाच हा दर्जा दिल्या जाऊ शकत नाही, मग ते मौलवी ,ज्ञानी असो की अन्य सदाचारी मंडळी असो, कारण या बाबीं अल्लाह कडुन विशेष आहेत, आणी साहाबांनी तसे आचरण अन्य कुणासोबतच केले नाही, तसेच इतरांच्या बाबतीत असे करणे हे शिर्ककडे नेणारे साधन ठरू शकते आणि ज्याच्यासाठी बरकत घेतली जाते त्याच्यासाठीही ते एक फितना (परीक्षा) ठरते.

विश्वासु मनुष्या कडे, हि जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

التصنيفات

Washing the Dead