तुमच्या पैकी कुणी व्यक्ती आपल्या सोबत दोरी घेउन उंच टेकडीवर जाऊन, तिथुन ईंधनाचा भारा पाठीवर आणत असेल व तो भारा…

तुमच्या पैकी कुणी व्यक्ती आपल्या सोबत दोरी घेउन उंच टेकडीवर जाऊन, तिथुन ईंधनाचा भारा पाठीवर आणत असेल व तो भारा विकत असेल व त्यामुळे अल्लाह त्याला लोकांसमोर हात पसरवण्यापासुन वाचवत असेल तर हे, त्याच्या साठी बेहत्तर आहे की लोकांना मागत फिरावे लोकांची ईच्छा असेल तर देतील अन्यथा हात वर करतील

जुबैर बिन‌ अव्वाम रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<तुमच्या पैकी कुणी व्यक्ती आपल्या सोबत दोरी घेउन उंच टेकडीवर जाऊन, तिथुन ईंधनाचा भारा पाठीवर आणत असेल व तो भारा विकत असेल व त्यामुळे अल्लाह त्याला लोकांसमोर हात पसरवण्यापासुन वाचवत असेल तर हे, त्याच्या साठी बेहत्तर आहे की लोकांना मागत फिरावे लोकांची ईच्छा असेल तर देतील अन्यथा हात वर करतील.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी श्रद्धावानांना समज दिली आहे, की इतरांसमोर हात पसरवण्या ऐवजी ते सर्व काम मेहनत मजदुरी चे असले तरी मान्य आहे, मग जर ऊंच टेकडी वर चढुन ईंधनाचा भारा आणुन विकुण, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह किंवा दानधर्म साठी खर्च केला तरी हरकत नाही, पण लोकांना मागणे, हलकट पणाचे लक्षण आहे, व न मागणे स्वाभिमानी असण्याचे प्रतिक आहे, खरी गोष्ट हि आहे की, मोमीन [श्रद्धावान] हा स्वाभिमानी असतो अपमानीत किंवा हिन दर्जाचा नसतोच.

فوائد الحديث

लोकांसमोर हात पसरवणे पसंद नाही, त्याऐवजी स्वाभिमानी बाणा व समाधानी मन असले पाहिजे.

उपजिवीका प्राप्त करताना मेहनत मजदुरी करावी, मग लोकांनी त्या कामाला तुच्छ लेखलं तरी चालेल.

ईस्लाम ने भिक मांगणे व बेकार राहण्याला वक्तीने विरोध केला आहे, म्हणुनच मेहनत व परिश्रम ला अनिवार्य केले आहे, मग ते ईंधनाचा भारा पाठीवर आणुन विकला तरी बेहत्तर आहे.

जोपर्यंत माणुस मेहनत करुन, आपली रोजी उपजिवीका कमाऊ शकतो, तोपर्यंत त्याला दुसऱ्या समोर भिक मांगणे वैध नाही.

वेळ पडल्यावर विद्यमान बादशहा किंवा सत्ताधारी ला मदत मागणे मान्य आहे, जसं साक्षात अल्लाह ने स्पष्ट केले आहे की:{आणी त्या लोकांवर कसलाही दोष नाही, जे तुमच्याकडे सवारी करता आले होते, तुम्ही त्यांना म्हणाला की माझ्या कडे सवारी उपलब्ध नाही तर ते पलटले परंतु त्यांच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते,या चिंतेने की त्यांच्याकडे खर्च उपलब्ध नाही} [तौबा ९२].

जो व्यक्ती खरोखरच मजबुर असेल व मेहनत करण्याची ताकत ठेवत नसेल तर अशा माणसांना प्रश्न करणे वैध आहे, परंतु त्याने वारंवार तगादा लावुन व दुसऱ्यांना परेशान करु नये,

कुरआन ची स्पष्टोक्ती आहे की:{ते लोकांचा पाठलाग करुन भिक मागत नाहीत} [बकरा :२७३].

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: या हदिस मधे दानधर्म करण्याची शीकवण आहे, तसेच आपल्या हात मेहनतने कमवुन खाणे व नैतिक मार्गाने मेहनत करण्याची सुंदर शीकवण आहे.

التصنيفات

Sales