प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्यकर्म नाही

प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्यकर्म नाही

हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर एका प्रवासात असतांना, त्यांनी लोकांचा जमाव बघितला, लोकांनी एका व्यक्तिवर छत्री धरुन ठेवली होती, उन्ह लागु नये म्हणून, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सवाल केला:<<हे सर्व काय आहे?>>, लोकांनी उत्तर दिले की:सदर व्यक्ती उपवासधारक(रोजे दार) आहे, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले की: <<प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्यकर्म नाही>>, अन्य मुस्लीम ग्रंथात नमुद आहे की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:<<अल्लाह ने दिलेल्या संधीचा फायदा उचलावा,जे त्याने तुम्हाला प्रदान केली आहे>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

प्रेषित सलामती असो त्यांच्यावर एका प्रवासात असतांना, त्यांनी एका व्यक्तीजवळ लोकांची गर्दि बघितली, कडक उन्हामुळे व तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याच्यावर लोकांनी सावली धरली होती, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर विचारले की: या व्यक्तीला काय झाले आहे? लोकं म्हणाली की:याने उपवास धरला आहे, त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले: प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्याचे प्रतिक नाहीच, त्याउलट सर्वोच्च अल्लाह ने दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला पाहिजे, जी त्याने तुम्हाला दिलेली आहे.

فوائد الحديث

इस्लामिक शरीयतच्या सोपेपणाचे वर्णन.

सदर हदिस वरुन सिद्ध होते की प्रवासात ऊपवास ठेवणे सुद्धा मान्य आहे, तसेच अल्लाह ने दिलेल्या सुटकेनुसार ऊपवास सोडुन देणे सुद्धा मान्य आहे.

जर प्रवासात त्रास होत असल्यास अशा अवस्थेत ऊपवास ठेवणे अमान्य (मकरुह) आहे, ईथपावेतो की उपवासधारक त्रासामुळे हलाकीच्या अवस्थेत पोहचत असेल तर मग तसा अवस्थेत उपवास ठेवणे (हराम) सक्त मना आहे.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:प्रेषितांचा सलामती असो त्यांच्यावर आदेश: प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्य‌‌‌ कर्म नाही:हा आदेश तिथे लागु होतो जिथे उपवास ठेवल्यास, बिकट परिस्थिती निर्माण होऊन, शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते, सदर हदिस चा मतितार्थ याकडेच इशारा करत आहे.

प्रेषितांचा सलामती असो त्यांच्यावर आपल्या सोबत्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे व त्यांना विचारपुस करणे खुपचं प्रेरणादायक आहे.

التصنيفات

Fasting of People with Excuses