ज्याने आपल्या बंधुचा सन्मान प्रतिष्ठा किंवा तत्सम बाबतीत अपमान केला असेल तर त्याला पाहिजे की त्याने आजच आपली…

ज्याने आपल्या बंधुचा सन्मान प्रतिष्ठा किंवा तत्सम बाबतीत अपमान केला असेल तर त्याला पाहिजे की त्याने आजच आपली सुटका करून घ्यावी, तो दिवस उजाडण्या पहिले ज्या दिवसी न दिणार कामा येईल ना दिरहम

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<ज्याने आपल्या बंधुचा सन्मान प्रतिष्ठा किंवा तत्सम बाबतीत अपमान केला असेल तर त्याला पाहिजे की त्याने आजच आपली सुटका करून घ्यावी, तो दिवस उजाडण्या पहिले ज्या दिवसी न दिणार कामा येईल ना दिरहम, जर याची काही सत्कर्म असतील तर जेवढा याने हक्क मारला असेल, त्या हिशेबाने याची सत्कर्म हिसकुन घेतल्या जातील, आणी जर याच्या खात्यात सत्कर्म नसतील तर त्याच्या बंधुची दुष्कॄत्य याच्या खात्यात जमा केली जातील>>.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी आदेश दिला आहे की ज्याने कुणी आपल्या मुसलमान बंधु चे सन्मान प्रतिष्ठा संपत्ती, व जिवा बाबत अन्याय झाला असेल तर त्याने याच जगात आपल्या बंधुची क्षमा मागावी, कारण अंतिम दिवसी ना सोन्याचे दिरहम ना चांदीचे दिणार कामी पडणार जे देउन त्याची सुटका होईल, त्या दिवसी बदला सत्कर्म व गुनाह म्हणजे दुष्कर्म द्वारा घेतल्या जाईल, मग अत्याचारग्रस्त आपल्यावरील‌ अत्याचाराच्या मोबदल्यात अत्याचारी व्यक्ती ची सत्कर्मातुन हिस्सा घेईल, जर अत्याचारी जवळ सत्कर्म नसतील तर मजलुम म्हणजे अत्याचारग्रस्त ची पापं अन्यायी माणसाच्या माथी तेवढा हिस्सा टाकण्यात येईल जेवढे त्याने जुलुम केला असेल.

فوائد الحديث

अन्याय व अत्याचार करणे टाळावे.

आपल्या वरील हक्काचं ओझं लवकर अदा करावं.

आपली सत्कर्म, इतरांवर अन्याय व अत्याचारामुळे समाप्त किंवा निष्फळ बनतात, व त्याची फळे नष्ट होतात.

एकमेकांचे हक्क अल्लाह माफ करत नाही, जोपर्यंत ते एकमेकांचे हक्क अदा करत नाही.

दिणार व‌ दिरहम फक्त या जगातली चलने आहेत, परंतु कयामत च्या दिवसी हिशेब फक्त नेकी व बदी [सत्कर्म व दुष्कर्म] वर अवलंबुन आहे.

काही ज्ञानी मंडळींनी सन्मान व प्रतिष्ठे बाबत स्पष्ट केले आहे की: जर ज्याच्या वर अन्याय केला गेला त्याला जर माहीत नसेल की त्याच्या वर‌ अन्याय केला गेला तर त्याच्याकडे जाऊन सांगण्याची गरज नाही, उदाहरणार्थ कुणी एका महफिलीत एका बंधुची बुराई केली असेल व क्षमायाचना केली असेल, तर अशा परिस्थितीत त्याला सांगण्याची गरज नाही, त्याच्या करता क्षमा करावी, त्याच्याकरता प्रार्थना करावी, व ज्या महफिलीत त्याचा अपमान केला असेल तिथं त्याची प्रशंसा व सन्मान पुर्वक गुणगान करावे, याप्रकारे त्याचा हक्क अदा होईल.

التصنيفات

The Hereafter Life