संशय सर्वोच्च अल्लाह झोपत नाही, ना त्याच्या प्रतिभेला शोभते की त्याने झोपावे

संशय सर्वोच्च अल्लाह झोपत नाही, ना त्याच्या प्रतिभेला शोभते की त्याने झोपावे

हजरत अबु मुसा अशअरी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आमच्या दरम्यान उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला पाच प्रमुख गोष्टी सांगितल्या: << संशय सर्वोच्च अल्लाह झोपत नाही, ना त्याच्या प्रतिभेला शोभते की त्याने झोपावे, तो मिजान (तराजु) ला खाली करतो आणी वर करतो, रात्री चे कर्म दिवसा पुर्वीच त्याच्या दरबारी सादर होतात, तसेच दिवसा चे कर्म रात्र पुर्वीच सादर होतात, त्याचा सभोवताल पडदा तोजोमय प्रकाश आहे, (हिजाब नुर ने व्यापलेला आहे) - एका कथनात आहे की: अग्नी- जर त्या पडद्याला हटवले आणी जिथपर्यंत त्याची नजर गेली, त्या तेजा मुळे संपूर्ण निर्मिती जुळुन जाईल>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबांना उद्देशुन पाच प्रमुख गोष्टी सांगितल्या: पहिली गोष्ट: सर्वोच्च अल्लाह झोपत नाही. दुसरी गोष्ट:अल्लाह चे झोपी जाणे अशक्य आहे, कारण त्याचे जिवन व अस्तित्व कमालीने परिपुर्ण आहे. तिसरी गोष्ट: सर्वोच्च अल्लाह तराजु झुकवतो व उंचावतो, अर्थात मनुष्याचे कर्म जे त्याच्या पर्यंत पोहचतात, त्यांचे वजन केल्या जाते, त्यांची रोजीरोटी जमीनीवर उतरविल्या जाते तिचे सुद्धा मोजमाप होते, उपजिवीका जी सर्व जिवांकरता ठरवलेली असते, अल्लाह च्या मर्जीनुसार कुणाला कमी, कुणाला जास्त दिल्या जाते. चौथी गोष्ट : मनुष्याचे रात्री चे कर्म दिवसा पुर्वीच त्याच्या दरबारी सादर केल्या जातात, आणी दिवसाचे कर्म रात्र पुर्वीच सादर होतात, अर्थात सुरक्षेवर नियुक्त फरिश्ते (देवदूत) रात्रीच्या कर्मांना पुर्ण झाल्यावर, दिवसाच्या सुरुवातीलाच वर घेऊन जातात, आणी दिवसाच्या कर्मांना पुर्ण झाल्यावर रात्रीच्या सुरुवातीलाच घेऊन जातात. पाचवी गोष्ट: सर्वोच्च अल्लाह चा पडदा तेजप्रकाश जो त्याच्या दर्शना आड आहे, एक (नुर) तेज आहे, आणी एका कथनात आगीचा उल्लेख आहे, जर त्याने त्या पडद्याला हटविले तर त्याच्या चेहऱ्याचा प्रकाश व तेज नुर नजरच्या हद्दिपर्यंत स्रॄष्टि ला जाळुन टाकेल;त्याच्या मुखाच्या तेजस्वी झळा म्हणजेच त्याचा प्रकाश, त्याचे वैभव आणि त्याची शोभा आहे. अर्थ असा आहे की: जर सर्वोच्च अल्लाह ने आपल्या चेहऱ्यावरील पडदा हटविला व आपल्या स्रॄष्टिवर आपले तेज टाकले तर त्याच्या चेहऱ्याचा तेज प्रकाश आपल्या हद्दीत येणाऱ्या सर्वच वस्तुंना भस्मसात करुन टाकेल; कारण त्याची नजर समस्त ब्रम्हांडाला व्यापलेली आहे, म्हणजेच सर्व स्रॄष्टी वर त्याचा प्रभाव पडतो.

فوائد الحديث

अल्लाह ला झोपणे अशक्य आहे, कारण झोपणे एक कमजोरी आहे, आणी सर्वोच्च अल्लाह कोणत्याही कमी पासुन मुक्त आहे.

सर्वोच्च अल्लाह ज्याला ईच्छीतो त्याला ईज्जत देतो, ज्याला ईच्छीतो नाही त्याला बेईज्जत करतो, आणी आपल्या दासां पैकी ज्याला पसंद करतो त्याला सन्मार्ग दाखवतो, व ज्याला नापसंत करतो त्याला पथभ्रष्ट करतो.

सर्व कर्म दररोज दिवसा व रात्री अल्लाह च्या दरबारी सादर केल्या जातात, यावरुन लक्ष वेधणे जरुरी आहे की, दासांनी दिवसा व रात्री अल्लाह चे स्मरण विसरु नये.

सदर हदिस सर्वशक्तीमान अल्लाह ची न्यायसंगत निर्णयाला दर्शविते, आणी अल्लाह चे सर्वच फैसले अचुक आहेत, आणी हे सर्व एकमेव अल्लाह चे गुणविशेष आहेत.

सर्वोच्च अल्लाह च्या चेहऱ्यावर पडदा असण्याचे स्पष्ट संकेत, व तो पडदा एक नुर व तेज, जो अल्लाह व दासांच्या दरम्यान आड आहे, जर तो‌ पडदा नसता तर समस्त स्रॄष्टी जळुन खाक झाली असती.

इमाम अजुर्री रहमहुल्लाह सांगतात की: सत्यवादी एकमेव अल्लाह बाबत तेवढंच बोलतात, जेवढे एकमेव अल्लाह ने आपल्या बाबत स्पष्ट केले आहे, आणी ज्याबाबत पैगंबरांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर त्याची गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत‌, ज्याप्रमाणे सहाबांनी वेळोवेळी स्वीकार केला आहे, तसेच त्या विद्वानांचं सुद्धा यावर एकमत आहे, ज्यांनी पैगंबरांचे अनुसरण स्वीकारले,

पण (बिदअत) अवज्ञेचा ईंकार केला. भाष्य समाप्त.

बस्स अहले सुन्नत ( खरे आज्ञा कारी) एकमेव अल्लाह ची सर्व नामे आणी गुणविशेषतांचा स्वीकार करतात ज्याचा सक्षात अल्लाह ने आपल्या बाबत स्वीकार केला आहे,

त्यामध्ये कुठलाही बदल न करता, कुठल्याही नामाच्या अर्थात, ना गुणांच्या अर्थात फेरबदल करत नाही, आम्ही एकमेव अल्लाह बाबत त्या सर्व बाबींना नाकारतो, ज्याचा ईंकार खुद्द एकमेव अल्लाह ने केला आहे, आणी ज्या बाबतीत होकार आहे ना नकार, त्याबाबतीत आम्ही गप्प राहणेच पसंत करतो, खुद्द एकमेव अल्लाह ची वाणी:

"लयसा कमीसली शय अवं व हुवस्समीउल अलीम"[शुरा ११]

अर्थात{त्याच्या समान कुणीच नाही,आणी तो सर्वकाही ऐकणारा व सर्वकाही पाहणारा आहे}.

तो नुर किंवा तेज जी एकमेव अल्लाह चे गुणविशेष आहे, ते या नुर किंवा तेज जो अल्लाह व दासा दरम्यान पासुन पडदा आड आहे, तो एक निर्मीती असलेला नुर व प्रकाश आहे, एरवी एकमेव अल्लाह चा जो नुर आहे, तो त्याचा व्यक्तिगत व त्याच्या शानच्या लायक नुर आहे, त्याच्या समान अन्य कोणतीच वस्तु असुच शकत नाही, तसेच प्रेषित मुहम्मदांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर जो नुर बघितला तो अल्लाह व दासां दरम्यान चा पडदाच आहे.

التصنيفات

Oneness of Allah's Names and Attributes, Merits of Good Deeds, Repentance