मी तुमच्या सर्वांत जास्त अल्लाह चे भय बाळगणारा व सर्वांत जास्त ज्ञान बाळगणारा आहे

मी तुमच्या सर्वांत जास्त अल्लाह चे भय बाळगणारा व सर्वांत जास्त ज्ञान बाळगणारा आहे

ईमानधारकांची आई आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर जेव्हा लोकांना आदेश देत, जे लोकांना सहज शक्य होईल, लोकं म्हणायचे: हे अल्लाह च्या प्रेषिता आम्ही तुम्हाप्रमाणे नाही, निश्चितच सर्वोच्च अल्लाह ने तुमचे मागचे पुढचे सर्वच गुन्हे माफ केले आहेत, हे ऐकुन प्रेषित सलामती असो त्यांच्यावर क्रोधित व्हायचे, इथपर्यंत की प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर चेहऱ्याचा रंग बदलायचा, त्यांनंतर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर फरमावित असत:<<मी तुमच्या सर्वांत जास्त अल्लाह चे भय बाळगणारा व सर्वांत जास्त ज्ञान बाळगणारा आहे>>.

[صحيح] [رواه البخاري]

الشرح

ईमानधारकांची आई माँ आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर जेव्हा लोकांना क्रॄती करण्याचा आदेश देत, तेव्हा साधे व सोपे काम जे सहज शक्य, जे त्यांना जड न जावे, आणी या भितीने की त्यावर नियमीत अंमलबजावणी करणार नाहित, आणी प्रेषित सलामती असो त्यांच्यावर स्वतःसुद्धा साधे व जे सहज शक्य आहे तेच आचरण करित असत, त्याचाच लोकांना उपदेश करत असत, परंतु काही सहाबांनी प्रेषितांपेक्षा अधिक जास्त कर्म करण्याचा निश्चय केला, कारण त्यांना वाटले की जणु प्रेषितांचे पुढचे मागचे सर्वच गुन्हे माफ आहेत, त्यांना वाटले ईतर लोकांना मोठ्या दर्जा प्राप्त करण्यासाठी अधिक जास्त मेहनत करणे जरुरी आहे. त्यांनी प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर सांगितले की:हे अल्लाह च्या प्रेषिता आमची अवस्था तुमच्या सारखी नाही, कारण अल्लाह ने तुमचे मागचे पुढचे सर्वच गुन्हे माफ केले आहेत, त्यावर प्रेषित सलामती असो त्यांच्यावर नाराज होतात, चेहऱ्या वरुन राग जाणवत होता, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: मी तुमच्या सर्वांत जास्त अल्लाह चे भय बाळगणारा व एकमेव अल्लाह बाबत सर्वात जास्त ज्ञान राखणारा आहे, म्हणुन मी जेवढा आदेश तुम्हाला देतो, तेवढेच क्रॄत्य करा.

فوائد الحديث

ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर लोकांना सोपे व सरळ आचरण करण्यावर उभारले, कारण ते नियमीत त्यांवर अंमलबजावणी करु शकतील, एका हदिस मध्ये नमुद आहे की:"अल्लाह ला सर्वात प्रिय काम ते आहे, ज्यामध्ये सातत्य असेल."

सत्कर्मी मनुष्याने नेकी वर विश्वास बाळगुन, आचरणात प्रयत्नशील राहावे.

गरज पडल्यास आपल्यातील सुप्त गुणांचा उल्लेख करण्यात काही गैर नाही, फक्त त्यामागे देखावा, अहंकार किंवा घमेंडिपणा नसावा.

उपासनेत समतोल व सातत्य राखणे जरुरी आहे, त्यामध्ये अशी अतिशयोक्ती नसावी, ज्याचा अंततः परिणाम सोडचिठ्ठी असेल.

ईब्ने हजर रहमतुल्लाह सांगतात की:दास जेव्हा उपासना व त्याच्या फलिताच्या उंबरठ्यावर पोहचतो, तेव्हा त्याला अजुन सुंदर पद्धतीने उपासनेची गोडी व सातत्यता लाभते, ज्यामुळे मिळालेली भक्तिची गोडी कायम राहावी, व क्रॄतज्ञतेने त्यात अजुन भर पडत राहावी.

धार्मिक आदेशाच्या विरोधामुळे राग येणे साहजिक आहे, आणी जाणकार व्यक्तीच जर कुचकामी ठरत असेल, तर त्यावर त्याला प्रतिबंध करणे सुद्धा वैध आहे, त्याद्वारे त्याला समज मिळावी.

प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर आपल्या समुदायावर अपार प्रेम व दया झळकते, धर्म एकदम साधा सरळ व सोपा व व्यापक आहे.

सहाबांची उपासना व भक्ती मध्ये तळमळता व सत्कर्म करण्याची तिव्र ईच्छा सदर हदिस मधे दिसते.

शरियत ने ठरवुन दिलेल्या मर्यादेत राहणे, मग ते कठिण असो की सहज, आणी अशी गाढ श्रद्धा बाळगावी की धर्माच्या शिकवणीवर चालण्यातच भलाई आहे, त्या पद्धतीपेक्षा बेहतर आहे, ज्यामध्ये शरियत चा विरोध होत असेल.

التصنيفات

Our Prophet Muhammad, may Allah's peace and blessings be upon him, Shariah Ruling, The Sunnah, Merits of Good Deeds