إعدادات العرض
तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर
तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर
सोहीब बिन सनान रुमी {अल्लाह राजी व्हावे यांच्याशी} द्वारा निवेदन आहे की, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले: तुमच्या पुर्वी एक बादशाह होता,व त्याच्या जवळ एक जादुगर होता, पण तो जादुगार वयस्कर झाला व त्याने बादशहा ला सांगितले की आता मी थकलो, तुम्ही माझ्या सोबत एक युवक पाठवा,ज्याला मी विद्या शिकवतो, त्या बादशहा ने जादुगार कडे एक मुलगा पाठवला,तो मुलगा जादुगार कडे जाण्यास निघाला असता, त्याला एक राहीब [एक ख्रिश्चन पादरी] दिसला,व त्याची शिकवण त्या मुलाला आवडली.व तो तिथेच रमु लागला.परंतु काळांतराने त्या मुलाला त्या राहीब ची बैठक खुपचं आवडायची वत्याला जादुगार पर्यंत पोहोचण्यास ऊशीर व्हायचा, जादुगार त्याला तंबी द्यायचा व मारायचा, या जादुगार ची शिकायत त्याने राहीब कडे केली असता,राहील ने त्याला सांगितले की,तु जादुगार ला घरच्या मंडळींनी उशीर केल्याचं कारण सांगायचं व घरच्यांनी विचारल्यास त्यांना जादुगर ने थांबवल्याचं कारण सांगायचं.त्यादरम्यान भररस्त्यात एका विषारी जनावराने आमरस्ता जाम केला, त्यावर त्या युवकाने एक युक्ती लढवली, त्याने म्हटले आज मी बघतोच की जादुगर सत्यावर सत्यावर आहे् की राहीब? त्याने एक दगड उचलला व म्हणाला,हे , अल्लाह ,तुला जर राहिब चा मार्ग जादुगार पेक्षा पसंद असेल तर या जनावराला नष्ट कर, लोकांना मार्ग मोकळा कर." मग त्याने एक दगड त्या जनावराला मारतच ते जनावर मरण पावले व लोकं निघुन गेली.तो मुलगा राहिब जवळ सर्व व्रुत्तांत सांगु लागला, त्यावर राहिब ने युवकाला उद्देशुन म्हटले की,तु आता माझ्यापेक्षाही पुढे निघालास.व तुझी उच्चता प्रगतीपथावर आहे, पण तुला लवकरच परिक्षेला तोंड द्यावे लागेल, परंतु परिक्षेवेळी माझे नाव घेउ न कोस.पुढे तो मुलगा जन्मतः आंधळयांना व कोड च्या रोग्यांना दुरुस्त करत होता.जवळपास सर्वच आजाराचे इलाज तो करत होता, तद्नंतर बादशहा चा एक मित्र आंधळा झाला.त्याने त्या मुलाकडे विनवणी केली की तु मला माझे डोळे परत आणुन दिल्यास, मी सोबत आणलेले सर्व उच्च भेटवस्तू तुला अर्पण करेन, त्या युवक बादशाह च्या मित्राला म्हणाला की,मी तर कुणालाच तंदुरुस्ती प्रदान करु शकत नाही.तंदुरुस्ती देणारा फक्त एकमेव अल्लाह च आहे.जर तुम्ही त्या एकमेव अल्लाह वर (ईमान)श्रद्धा बाळगशील तर मी अल्लाह जवळ तुमच्या तंदुरुस्तीसाठी दुआ याचना करतो, तुम्हाला पुर्ण तंदुरुस्ती प्रदान व्हावी, मग त्या व्यक्तीने अल्लाह वर ईमान आणले, व अल्लाह ने त्याला आजारापासून मुक्ती दिली, व तो बरा झाला. मग तो व्यक्ती बादशहा जवळ आला, जवळ येऊन बसला, त्यावर बादशहा ने विचारले की तुझे डोळे परत कुणी आणले? त्यावर तो व्यक्ती ऊत्तरला,"माझ्या पालनकर्ता ने, त्यावर बादशहा ने प्रश्न केला, की माझ्या व्यतिरिक्त अजुन कोण पालनकर्ता आहे? तो व्यक्ती म्हणाला,तुझा व माझा पालनकर्ता अल्लाह आहे, मग बादशहा त्या व्यक्तीला सजा देऊ लागला, त्यावर त्याने बादशहा ला त्या मुलाचे नाव सांगितले, मग दरबारात त्या मुलाला हजर करण्यात आले, बादशाहने त्या मुलाला विचारले की,हे ,युवका काय तुझी जादु ची पहुच ईतकी वाढली की तु आंधळयांना डोळे प्रदान करतो व जन्मतःकोडी ला बरे करतोस, मुलगा उत्तरला, मी तर कुणालाच बरं करू शकत नाही, बरं करणारा तर एकमेव अल्लाह आहे, असं म्हणताच बादशहा ने त्या मुलाला मारणे व सजा देणे सुरू केले, त्याने त्या राहिब [भिक्शु ]चं नाव सांगताच, त्याला दरबारी हजर करण्यात आले, त्याला धर्म सोडण्यास सांगण्यात आले.त्याने धर्म सोडण्यास नकार दिला, बादशाह च्या आदेशाने करवत राहीब च्या डोक्यावर ठेऊन त्याचे दोन तुकडे करण्यात आले, त्यानंतर बादशहा ने त्या मित्राला बोलावले, त्याला सांगण्यात आले की तुझा धर्म सोडुन दे! त्याने सुद्धा नकार दिला, त्याला बेरहमी ने दोन तुकडे करून मारण्यात आले, तद्नंतर त्या मुलाला बोलावण्यात आले, त्याला पुन्हा धर्म सोडण्यास सांगण्यात आले, पण त्याने नकार दिला, मग बादशहा ने आपल्या सहकाऱ्यांना त्याला एका उंच पहाडावर घेउन जा व जर याने धर्म सोडला तर त्यखला सोडुन द्या, व जर त्याने नकार दिल्यास त्याला ऊंचीवरुन फेकुन देण्यास सांगितले, त्याला पाठीवर नेण्यात आले, त्या मुलाने अल्लाह जवळ याचना केली की,हे! अल्लाह! तु माझ्याकरता पुरेसा आहेस, तुला पाहिजे त्या मार्गाने मला वाचव! लगेच पाठीवर भुकंप आले व सर्व बादशहा ची माणसे ठार झाली, व तो मुलगा परत दरबारी हजर झाला, बादशाह ने विचारले की साथीदारांचे काय झाले? तो म्हणाला की, अल्लाह ने मला त्यांच्यापासून वाचवले, मग बादशहा ने पुन्हा काही माणसाच्या त्या मुलाला हवाली केले व सांगितले की याला दुर नाव मध्ये बसला व जर याने धर्म सोडला तर त्याला सोडून द्या, अन्यथा त्याला समुद्रात लोटुन द्यावे, एका बोटीत घेउन गेले, असता मुलाने अल्लाह कडे पुन्हा याचना केली की, हे! अल्लाह!तु मला तुझ्यापरीने वाचव! मग ती बोट अचानक पलटी झाली, व सर्व बादशहा ची माणसे डुबुन मरण पावली, तो मुलगा पुन्हा बादशहा दरबारी हजर झाला, बादशाह ने विचारले की सोबत गेलेल्यांचं काय झालं? मुलगा म्हणाला की: मला अल्लाह ने त्यांच्यापासून वाचविले, तदनंतर मुलगा बादशहा ला उद्देशून म्हणाला की: तु मला तोपर्यंत मारु शकत नाहित, जोपर्यंत हि सांगीतलेल्या पद्धतीने तुम्ही मला मारणार नाही, बादशाह म्हणाला की:ती कोणती पद्धत आहे? सर्व लोकांचे काच मैदानात जमा करावे, व मला सुलीवर लटकवा, मग माझ्या भात्यातुन एक बाण घ्या व तो कमानच्या मध्यभागी ठेवा, व म्हणा,"त्या अल्लाहच्या नावाने,जो या मुलाचा प्रभु आहे, मग मला बाण मारा, या पद्धतीने तुम्ही मला फार करु शकता, मग बादशहा ने लोकांना एका मैदानात जमा केले, मुलाला सुलीवर लटकवण्यात आले, मग त्याच्या भात्यातुन एक बाण काढला, त्याला कमाणीच्या मध्यभागी ठेवण्यात आले, व म्हणण्यात आले, त्या अल्लाहच्या नावाने जो या मुलाचा प्रभु आहे, मग तो बाण जरा त्या मुलाला मारण्यात आला, तो बाण सरळ त्या मुलाच्या कवटीत लागला, त्या मुलाने आपला हात त्या बाण लागलेल्या जागेवर ठेवला व तो मरण पावला, सर्व लोकं म्हणाले, आम्ही या मुलाच्या प्रभुवर ईमान आणले, आम्ही या मुलाच्या प्रभुला माणले, आम्ही या मुलाच्या प्रभुवर ईमान आणले, बादशाह ला सांगण्यात आले की ज्याची तुला भिती होती तेच घडले, लोकानी अल्लाह वर ईमान आणले आहे, बादशहा ने दरबाराच्या दरवाजावर खंदक खोदण्याचा आदेश दिला, खंदक खोदण्यात आली त्यात आग भडकवण्यात आली, आदेश देण्यात आला की जो या मुलाचा धर्म सोडणार नाही, त्याला या खंदक मधे ढकलुन द्यावे, लोकानी तसंच केलं परंतु एक महिला आली, तिच्यासोबत एक बाळ होतं, ती महिला त्या अग्नीत जाण्यास घाबरली मागे सरकली, त्यवर ते बळ बोलुन लागलं, हे ,आई! संयम ठेव तु सत्यावर आहेस''.
الترجمة
العربية Bosanski English Español فارسی Français Bahasa Indonesia اردو 中文 हिन्दी Kurdî Русский Tiếng Việt Magyar ქართული Kiswahili සිංහල Română অসমীয়া Hausa ไทย Português ភាសាខ្មែរ دری አማርኛ বাংলা ગુજરાતી Македонски Nederlands Tagalog ਪੰਜਾਬੀ മലയാളംالشرح
प्रेषित (अल्लाहचे शांती आणि आशीर्वाद त्याच्यावर असो) म्हणाले की आपल्यापूर्वीच्या लोकांमध्ये एक राजा होता, आणि त्याच्याकडे एक जादूगार होता, जादूगार म्हातारा झाला तेव्हा त्याने राजाला सांगितले: मी आता वृद्ध झालो आहे, तुम्ही माझ्याकडे एक तरुण मुलगा पाठवा, मी त्याला जादू शिकवतो. राजाने त्या जादूगाराकडे एक तरुण मुलगा पाठवला, जेणेकरून तो त्याला जादू शिकवेल, त्या तरुणाला जादूगाराकडे जाताना रस्त्यात एक राहिब भेटत असे, एकदा तो राहिब जवळ बसला आणि त्याचे बोलणे ऐकले, ते त्याला आवडले, मग तो जेव्हा जेव्हा जादूगाराकडे जायचा, तेव्हा आधी राहिब जवळ बसायचा, जादूगाराकडे उशिरा पोहोचला की जादूगार त्याला मारायचा, त्या तरुणाने ही गोष्ट राहिबला सांगितली, राहिब म्हणाला: जेव्हा तुला जादूगाराची भीती वाटेल तेव्हा सांग की मला घरच्यांनी थांबवले होते, आणि जेव्हा घरच्यांची भीती वाटेल तेव्हा सांग की मला जादूगाराने थांबवले होते, अशाच रीतीने वेळ जात होता, एके दिवशी तो एका मोठ्या प्राण्याकडे आला, ज्याने लोकांचा रस्ता अडवला होता, तेव्हा त्या तरुणाने म्हटले:आज मी जाणून घेईन की जादूगार चांगला की राहिब चांगला? त्याने एक दगड उचलला आणि म्हणाला: अल्लाह! जर राहिबचे कार्य तुला जादूगाराच्या कार्यापेक्षा अधिक प्रिय असेल, तर या जनावराला मार, म्हणजे लोक पुढे जाऊ शकतील, मग त्याने दगड फेकला आणि त्या जनावराचा वध झाला, आणि लोक पुढे गेले, त्यानंतर तो राहिबकडे आला आणि त्याला सर्व सांगितले, राहिबने त्याला म्हटले: बाळा आज तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाला आहेस, तुझी अवस्था ज्या मकामला पोहोचली आहे ती मी पाहत आहे, आणि नक्कीच तुझी परीक्षा होणार आहे, तर जर तुझी परीक्षा झाली, तर माझा उलगडा करू नकोस, आणि तो मुलगा अल्लाहच्या आदेशाने आंधळ्यांना व बरगंड (कुष्ठ) झालेल्यांना बरे करत असे, आणि लोकांचे इतर सर्व आजारही दूर करत असे, राजाच्या दरबारी असलेल्या एका व्यक्तीने ज्याची दृष्टी गेली होती, हे ऐकले, तो बरीच भेटवस्तू घेऊन त्या मुलाकडे आला आणि त्याला म्हणाला: इथे जे काही भेटवस्तू आहेत, त्या सगळ्या तुझ्याच आहेत, जर तू मला बरा केलेस तर. त्याने म्हटले: मी कोणालाही बरा करू शकत नाही, खरं तर अल्लाच आरोग्य देतो, जर तू अल्लावर विश्वास ठेवशील, तर मी अल्लाला प्रार्थना करीन आणि तो तुला बरा करेल, मग त्याने अल्लावर विश्वास ठेवला, आणि अल्लाने त्याला बरे केले, त्यानंतर तो राजाकडे आला आणि पूर्वीप्रमाणे त्याच्या समोर बसला, राजाने त्याला विचारले: तुला दृष्टी कोणी परत दिली? त्याने उत्तर दिले: माझ्या प्रभूने, राजा म्हणाला: माझ्याशिवाय तुझा दुसरा प्रभू आहे का? त्याने म्हटले:माझा आणि तुझा प्रभू अल्लाह आहे. मग त्याने त्याला पकडले आणि सतत त्याला यातना देत राहिला, तोपर्यंत की त्याने त्या मुलाचा पत्ता सांगितला, मुलाला आणले गेले, आणि राजाने त्याला म्हटले: अरे मुला तुझ्या जादूने इतकी कमाल केली आहे की तू जन्मान्धांना आणि कोढरोग्यांना बरे करतोस, आणि हेही करतोस, तेही करतोस. त्याने म्हटले:मी कोणालाही बरे करत नाही, खरे तर अल्लाच आरोग्य देतो, तेव्हा राजाने त्याला पकडले आणि सतत यातना दिल्या, अखेर त्याने राहिबचा पत्ता सांगितला. साधूला आणले गेले आणि त्याला सांगितले: आपल्या धर्माचा त्याग कर,पण त्याने नकार दिला,मग आरी मागवली गेली, आणि ती त्याच्या डोक्याच्या मधोमध ठेवली गेली, आणि त्याचे डोके दोन तुकड्यांत कापले गेले. मग राजाच्या सहकाऱ्याला आणले गेले आणि त्याला सांगितले: आपल्या धर्माचा त्याग कर, पण त्याने नकार दिला, म्हणून त्याच्या डोक्याच्या मधोमध आरी ठेवली गेली, आणि त्याचे डोके दोन भागांत चिरले गेले. मग मुलाला आणले गेले आणि त्याला सांगितले: आपल्या धर्माचा त्याग कर, पण त्याने नकार दिला, त्यामुळे त्याला तीन ते दहा जण असलेल्या त्याच्या साथीदारांच्या ताब्यात देण्यात आले. त्याने म्हटले: याला अमुक-तमुक पर्वतावर घेऊन जा, आणि त्या पर्वतावर चढवा, जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल, तेव्हा तो आपल्या धर्माकडून परतला तर ठीक, नाहीतर त्याला खाली फेकून द्या, म्हणून ते त्याला घेऊन गेले आणि पर्वतावर चढू लागले. मग मुलगा म्हणाला: हे अल्लाह! तू ज्या प्रकारे इच्छितोस त्या प्रकारे मला त्यांच्यापासून वाचव, मग पर्वत त्यांच्या वर थरथरला आणि जोरात हलू लागला व ते कोसळले, आणि मुलगा चालत राजा जवळ आला. राजा त्याला म्हणाला: तुझ्या साथीदारांचे काय झाले? तो म्हणाला: अल्लाहने मला त्यांच्यापासून वाचवले. मग राजाने त्याला आपल्या काही माणसांच्या ताब्यात दिले आणि म्हणाला: हा मुलगा घेऊन जा, त्याला एका लहानशा होडीत बसवा, आणि समुद्राच्या मध्यभागी घेऊन जा, जर तो आपल्या धर्मातून परत फिरला तर ठीक, अन्यथा त्याला समुद्रात फेकून द्या. ते त्याला घेऊन गेले, मुलगा म्हणाला: हे अल्लाह! तू ज्या प्रकारे इच्छितोस त्या प्रकारे मला त्यांच्यापासून वाचव, तेव्हाच होडी उलटली आणि ते सारे बुडाले, आणि मुलगा चालत राजाकडे परत आला. राजा त्याला म्हणाला: तुझ्या साथीदारांचे काय झाले? तो म्हणाला: अल्लाहने मला त्यांच्यापासून वाचवले, तो मुलगा राजाला म्हणाला: मी जे सांगतो ते तू केल्याशिवाय तू मला मारू शकत नाहीस. तो म्हणाला: ते काय आहे? मुलगा म्हणाला: सर्व लोकांना मोकळ्या मैदानात एकत्र जमव, मला एका झाडाच्या खोडावर बांध, मग तरकशातील एक बाण घे, तो धनुष्यात ठेव, आणि असे म्हण: अल्लाहच्या नावाने, जो या मुलाचा पालनकर्ता आहे, आणि मग माझ्यावर बाण सोड. जर तू असे केलेस तर तू मला मारू शकशील, मग राजाने सर्व लोकांना एका ठिकाणी जमवले, त्याला झाडाच्या खोडावर बांधले, त्याच्या तरकशातील एक बाण घेतला, धनुष्यात ठेवला आणि म्हटले: अल्लाहच्या नावाने, जो या मुलाचा पालनकर्ता आहे, मग त्याने बाण सोडला, बाण त्याच्या कपाळाच्या बाजूस, डोळा आणि कान यांच्या मध्ये लागला, मुलाने हात त्या जागी ठेवला, आणि तो मरण पावला. लोक म्हणाले: आम्ही त्या मुलाच्या रब्बावर विश्वास ठेवतो, आम्ही त्या मुलाच्या रब्बावर विश्वास ठेवतो, आम्ही त्या मुलाच्या रब्बावर विश्वास ठेवतो. मग राजाकडे येऊन त्याला सांगण्यात आले: तू ज्याची भीती बाळगत होतास, ते पाहिलेस का? अल्लाहची शपथ ज्याची तुला भीती होती तेच तुझ्यावर आले आहे लोक मुलाच्या मागे चालू लागले आहेत आणि सर्वजण त्याच्या परमेश्वरावर विश्वास ठेवू लागले आहेत, मग राजाने आदेश दिला की रस्त्यांच्या प्रवेशद्वारांवर मोठमोठे, लांबट असे खंदक खोदले जावेत आणि त्यामध्ये आग पेटवली जावी, त्याने म्हटले: जो आपल्या धर्मातून परत फिरणार नाही, त्याला या आगीत फेकून द्या. त्यांनी राजाच्या आदेशाप्रमाणे तसेच केले, इतक्यात एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन आली, ती थांबली, मागे हटली आणि आगीत जाणे तिला कठीण वाटले, तेव्हा तिच्या बाळाने तिला सांगितले: अगं आई! धीर धर, निश्चितच तू सत्याच्या मार्गावर आहेस.فوائد الحديث
अल्लाह चे सदाचारी दास ज्यांच्याद्वारे चमत्कार घडतात,किस्स्या मधे एका लहान बालकाच्या दगड मारल्याने जनावर मरण पावला, आणि त्या मुलाची प्रार्थना दोन वेळा स्वीकारली गेली, आणि बालकाने (दुध पिणाऱ्या बाळाने) बोलले.
जो एकमेव अल्लाह वर विश्वास ठेवतो अल्लाह त्याची जरुर मदत करतो.
धर्मा वर गाढ श्रद्धा व संयमी व्रुत्ती चे महान दर्जे.
लवकरात लवकर कोणत्याही गोष्टीला शीकायला हवं, अन्यथा युवावस्थेत बुद्धी मजबूत असते पण वयस्कर झाल्यावर बुद्धी तेवढी मजबुत राहत नाही.
वरील संपुर्ण किस्स्यात त्या मुलाच्या ठाम अल्लाह वर असणारी श्रद्धा झळकते व अत्यंत बिकट व जिवघेण्या परिस्थितीत तो आपल्या श्रद्धा व ईमान पासुन ईंचभर हि मागे सरकला नाही.
कठीण संकटात व परेशानीत, श्रद्धावान दास ज्या ज्या वेळी एकमेव प्रभु अल्लाह ला पुकारतो त्या त्या वेळी सर्वोच्च अल्लाह आपल्या सदाचारी दासाची याचना ऐकतो व मदतीस धावुन येतो.
आम मुसलमान बांधवांच्या हितासाठी स्वताला परेशानीत लोटणं वैध आहे, जसं या मुलाने बादशहा ला सांगितले की कशाप्रकारे त्याला मरण येऊ शकते, एक बाण घेउन त्यावर: एकमेव अल्लाह चे नाव घ्यावे,हे! मुलाच्या प्रभुवंता! बाण मारावा.
स्वताला संकटातुन वाचवण्यासाठी युद्धात खोटं बोलण्याची परवानगी आहे.
ईमानधारकाला आजमावल्या जावु शकते, त्याच्या ईमान ची सत्यता व सत्यावर ठाम राहल्यामुळे त्याला आपला जिव गमवावा लागु शकतो.
एकमेव अल्लाह च्या मार्गाकडे लोकांना आमंत्रित करणे व सत्य स्पष्ट करताना त्याग करणे जरुरी आहे.
माणसांची मनं अल्लाहच्या हातात असतात, ज्याला तो ईच्छीतो सरळ मार्ग दाखवतो, व ज्याला ईच्छीतो मार्गभ्रष्ट करतो, किंबहुना त्या अल्लाहने या मुलाला सरळ मार्ग दाखवला,जो एका जादुगार जवळ जादु शीकत होता.
एकमेव अल्लाह कडे अशी याचना आपण करु शकतो की, आपल्या दासाला असे चिन्ह दाखवावे,ज्याने दासाची खात्री व ईमान मधे व्रुद्धी होईल.
ईमानधारक अल्लाह कडे आमंत्रित करताना त्या सर्व पर्याय चा उपयोग घेतात,जे एकमेव अल्लाह ने त्यांना प्रदान केले आहे.
मनुष्याला संपवण्याचे पुर्ण रस्ते अल्लाह च्या हातात आहे, तो ज्याला ईच्छीतो नष्ट करतो व ज्याला ईच्छीतो वाचवु शकतो.
अविश्वासु लोकांकडे एकमेव अल्लाह वर विश्वास आणण्यासाठी पुरेसे प्रमाण आहेत, परंतु त्यांना त्यांचा अहंकार व गर्व विश्वास व श्रद्धा बाळगण्यास परावृत्त करतो.
अत्याचारी व जुलमी लोकं नेहमीच आम लोकांना ठार करण्याच्या तयारीत असतात, त्याद्वारे ते नैसर्गिक संपदेवर प्रभुत्व राखावे.
अत्याचाऱ्याला सर्वोच्च अल्लाह असा बदला देतो, त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, जसं की लोकांनी त्या मुलाच्या प्रभु अल्लाह वर ईमान आणले ज्यावेळी त्यांनी बघीतले की हा मुलगा आपल्या श्रद्धेत[ विश्वासात] खरा आहे, व तो कोणत्याही निंदकाच्या निंदेने घाबरत नाही.
ईसा [अलैसलाम] च्या ऐवजी या कहानीत एक बालक तान्ह्या अवस्थेत काखेतच आईशी बोलु लागला, हे प्रमाण आहे की प्रेषित मुहम्मद {सल्लल्लाहु अलैही व सल्लम} नी जी हदिस सांगीतली ती सत्यावर आधारित आहे, जगात फक्त तिनच तान्ही बाळ आईच्या कडेवर बोलु लागली, व प्रेषितांनी त्यांना बनी ईस्राईल करता खास केले.
