सर्वोच्च अल्लाह ला प्रिय ठिकाण मस्जीद आहे.आणी सर्वात अप्रिय [नावडते] ठिकाण बाजार आहे

सर्वोच्च अल्लाह ला प्रिय ठिकाण मस्जीद आहे.आणी सर्वात अप्रिय [नावडते] ठिकाण बाजार आहे

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<सर्वोच्च अल्लाह ला प्रिय ठिकाण मस्जीद आहे.आणी सर्वात अप्रिय [नावडते] ठिकाण बाजार आहे>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

पैगंबर सलामती असो त्यांच्यावर नी सांगितले की अल्लाह तआला ला सर्वात जास्त प्रिय ठिकाण मस्जीद आहे, कारण तिथे अल्लाह ची भक्ती केल्या जाते, तसेच तिथे गेल्याने अल्लाह चे भय निर्माण होते, आणी अल्लाह ला सर्वात अप्रिय ठिकाण बाजार आहे, कारण तिथे जास्तीत जास्त धोके बाजी, एकमेकांना लुबाडणे, व्याज खोरी, खोटारडेपणा व वचन मोडणे सारख्या बाबी होत असतात, तसेच बाजारात अल्लाह चे स्मरण होतं नाही.

فوائد الحديث

मस्जीद ची पवित्रता व महत्व;मसजीद ते पवित्र ठिकाण आहे जिथे अल्लाह चे नामस्मरण फार केल्या जाते.

मस्जीद मधे वारंवार जाणे, यासाठी आहे की अल्लाह तआला शी प्रेम व त्याची मर्जी संपादन करावी, बाजारात जाणे कमीत कमी व्हावे, व कामापुरते च जावे, त्या बाबींपासुन वाचावे ज्याने सर्वोच्च अल्लाह ची नाराजी होते.

इमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:मस्जीद ति पवित्र जागा आहे, जिथे अल्लाह ची रहमत व कृपा अवतरते, व बाजार ति जागा आहे, जिथे अल्लाह ची रहमत उतरत नाही तर त्याउलट प्रकोप.

التصنيفات

Oneness of Allah's Names and Attributes, The rulings of mosques