जेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुआज बिन जबल अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला यमन कडे रवाना केले, तेव्हा…

जेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुआज बिन जबल अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला यमन कडे रवाना केले, तेव्हा त्यांना आदेश दिला कि, गाय व बैलांची जकात दर ३० गायीवर एक तब्ब किंवा एक तबीया घेण्यात यावा

हजरत मुआज अल्लाह राजी असो त्यांच्याशी वर्णन करतात की: जेव्हा प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुआज बिन जबल अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला यमन कडे रवाना केले, तेव्हा त्यांना आदेश दिला कि, गाय व बैलांची जकात दर ३० गायीवर एक तब्ब किंवा एक तबीया घेण्यात यावा, आणी दर ४० वर एक मुसिन्ना घेण्यात यावा, प्रत्येक नवयुवका कडुन एक दिनार किंवा त्याबदल्यात यमनी कपड्यापैकी मआफरी कपडा घेण्यात यावा.

[صحيح بشواهده] [رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه وأحمد]

الشرح

प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर मुआज बिन जबल अल्लाह राजी असो त्यांच्याशी ला यमन कडे धर्माचे ज्ञान व ईस्लाम कडे बोलावण्याकरिता पाठवले, सोबतच मुस्लीमांकडुन जकात सुद्धा वसुल करावी, दर ३० गायींवर एक तबिआ नर किंवा मादी एक वर्ष वयाची असावी, आणी दर ४० गायींवर एक मुसिन्ना जी दोन वर्षाची असावी, घेण्यात यावी. त्याचप्रमाणे अहले किताब बंधु यहुदी व क्रिश्चनाकडुन जिझीया वसुल करण्यात यावा, प्रत्येक युवावस्थेत असणाऱ्या पुरुषा कडुन एक दिनार किंवा त्या बरोबर यमनी कपड्यातुन (मआफरी) घेण्यात यावी.

فوائد الحديث

जिझीया फक्त आणी फक्त सने बुलूगत म्हणजे जो‌ पुर्ण वयात आलेल्या कडुनच स्वीकारण्यात येईल, कारण जो‌ वयात आला नसेल त्याला कैद मध्ये असतांना ठार करणे वैध नाही, जसे बालवयात असलेला मुलगा किंवा महिला.

जिझीया ची मर्यादा तत्कालीन शासनाच्या तर्कावर अवलंबुन आहे, कारण ती मर्यादा तत्कालीन वेळ, ठिकाण व अमिरी गरीबी, आर्थिक परिस्थिती नुसार बदलत असते, कारण स्वतः प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर यमन करिता मर्यादा ठरवुन दिली आहे,

हजरत मुआज ला सांगितले की:"प्रत्येक नवयुवका (वयात आलेल्या) कडुन एक दिनार घ्यावे", तथ्यावरुन सिद्ध होते की, उमर बिन खत्ताब रजिअल्लाहु अनहु च्या कार्यकाळात शाम वासीया कडुन जिझीया ची मर्यादा वाढवली होती.

जकात वसुली करणारे नियुक्त करणे, तसेच काटेकोरपणे वसुल करणे, हे तत्कालीन शासकाची जबाबदारी आहे.

तबिआ: त्या बछड्याला म्हणतात, जो एक वर्षाचा पुर्ण झाला व दुसऱ्या वर्षात दाखल झाला असेल, याला तबिआ यावरुन म्हटल्या जाते कारण तो अजुनही आपल्या आईच्या मागे मागे चालत असतो.

दिनार: सोन्याच्या शिक्कयाला म्हणतात, तसेच इस्लामी दिनार चे वजन ४:२५ ग्राम सोने असते.

التصنيفات

Zakah of Livestock