إعدادات العرض
एरवी तुम्ही असे म्हणावे:आम्ही ऐकले व आज्ञापालन पालनकर्त्या आम्ही तुझी क्षमा मागतो व आम्ही तुझ्याकडेच परतणार…
एरवी तुम्ही असे म्हणावे:आम्ही ऐकले व आज्ञापालन पालनकर्त्या आम्ही तुझी क्षमा मागतो व आम्ही तुझ्याकडेच परतणार आहोत
हजरत अबुहुरैरा अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की: जेव्हा प्रेषितांवर सलामती असो त्यांच्यावर सदर आयत अवतरली {फक्त अल्लाह चे आहे, जे काही आकाशात व जे काही जमीनीवर आहे, जर तुम्ही मनातली गोष्ट प्रकट केली किंवा लपवली, अल्लाह तुमचा जरुर हिशेब घेणार, मग तो ज्याला ईच्छीतो त्याला क्षमा करतो, आणी ज्याला ईच्छीतो त्याला प्रकोप देतो, आणी अल्लाह प्रत्येक वस्तुंवर प्रभुत्व ठेउन आहे} [अल बकरा: २८४], सदर आयत सहाबांवर फार भारी पडली, एरवी ते प्रेषितांकडे सलामती असो त्यांच्यावर आले, आणी फार नम्रतेने व आपले गुडघे टेकवले, व सविनय विनंती केली:हे अल्लाह च्या प्रेषिता, आम्ही तेवढेच क्रॄत्य करु शकतो जेवढी आमची ऐपत आहे, उदा नमाज, ऊपवास, जिहाद, दानधर्म, परंतु तुम्हावर सदर आयत अवतरली आहे, परंतु आमची तेवढी ताकत नाही, प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:<<काय तुम्ही तेच सांगु ईच्छीता जे तुमच्या पुर्वी अहले किताब ग्रंथधारकांनी म्हटले होते, आम्ही ऐकले व नाफरमानी केली? एरवी तुम्ही असे म्हणावे:आम्ही ऐकले व आज्ञापालन पालनकर्त्या आम्ही तुझी क्षमा मागतो व आम्ही तुझ्याकडेच परतणार आहोत>> सहाबां नम्रतेने म्हणाले:आम्ही ऐकले व अनुसरण सुद्धा केले हे पालनकर्त्या आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो, आम्हाला तुझ्याकडेच परतायचे आहे, ज्या लोकांनी हे शब्द उच्चारले, व त्यांच्या मुखात ते वाहु लागले, त्यावर सर्वोच्च अल्लाह ने सदर आयत अवतरवीली: {पैगंबरानी ईमान आणले,जे काही त्याच्या पालनकर्ता कडुन त्याला प्रदान करण्यात आले आहे, तसेच श्रद्धावंत सुद्धा स्वीकारतात की एकमेव अल्लाह वर त्याच्या दुतांवर, त्याच्या ग्रंथांवर, त्याच्या पैगंबरांवर ठाम विश्वास बाळगतात, त्यांच्या दरम्यान कुठलाही फरक करत नाही, तसेच ते उदगारले की, आम्ही ऐकले व आज्ञापालन केले, हे पालनकर्त्या आम्ही तुझी क्षमा मागतो, व तुझ्याकडेच आम्हाला परतायचे आहे} [ बकरा: २८५], जेव्हा त्यांनी अशी घोषणा केली तेव्हा अल्लाहने पुर्विच्या आयत ला रद्द केले, आणी खालील आयत अवतरविली: {अल्लाह कोणत्याही जिवावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे टाकत नाही, त्याच्या कमाईचा मोबदला त्याला मिळेल, तेवढाच मिळेर जेवढे केले असेल, हे आमच्या पालनकर्त्या जर आम्ही विसरलो किवा चुकलो तर आम्हाला शिक्षा करु नकोस} [ बकरा: २८६] प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<होय>> {हे आमच्या पालनकर्त्या आमच्यावर ते ओझे नको टाकुस,जसे आमच्या पुर्वजांवर टाकले होते} [अल बकरा :२८६], प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<होय>> {हे आमच्या पालनहारांनो आम्ही सहन करू शकणार नाही असा कोणताही भार आमच्यावर टाकू नकोस} [अल बकरा :२८६], प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<होय>> {आम्हाला क्षमा कर, आम्हाला मोक्ष प्रदान कर, आमच्यावर [रहम] दया कर, तुच आमचा कर्ताधर्ता आहेस,या ईंकारी लोकांविरुद्ध आमची मदत कर}[अल बकरा : २८६], प्रेषितअल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर म्हणाले:<<होय>>.
الترجمة
العربية Português دری Македонски Tiếng Việt Magyar ქართული Indonesia বাংলা Kurdî ไทย অসমীয়া Nederlands Hausa ਪੰਜਾਬੀ Kiswahili Tagalog ភាសាខ្មែរ English ગુજરાતી සිංහල Русскийالشرح
{मग तो ज्याला ईच्छील माफ करील} आपल्या क्रॄपेने व दयेने, {आणी ज्याला ईच्छील प्रकोप देईल} आपल्या न्यायाने, {आणी अल्लाह सर्वांवर प्रभुत्व ठेवुन आहे} त्याला कोणतीच अवस्था थकवु शकत नाही. जेव्हा सहाबांनी सदर आयत ऐकली तेव्हा ही आयत त्यांच्यावर फार भारी पडली; कारण यामध्ये मनात येणाऱ्या विचारांवर सुद्धा पकड करण्यात आली होती. म्हणून ते प्रेषितां जवळ अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर आले, मोठ्या विनम्रतेने येउन बसले, व म्हणाले:हे अल्लाह च्या प्रेषिता, यापूर्वी आमच्यावर असे शारीरिक अमल (कर्तव्ये) बंधनकारक करण्यात आले होते, जे आम्ही पार पाडू शकतो, जसे नमाज, उपवास, जिहाद आणि दानधर्म, आणी आता सदर आयत अवतरली ज्यावर अंमलबजावणी करण्याची हिम्मत आमच्यात नाही. त्यावर प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:काय तुम्ही पण तेच सांगु ईच्छीता जे यहुदी व ईसाईंनी उदगारली होती:{आम्ही ऐकले व नाफरमानी केली}? त्याऐवजी तुम्ही हे म्हणावे:{आम्ही ऐकले व आज्ञापालन केले, हे आमच्या पालनकर्त्या आम्ही तुझी क्षमा मागतो, व तुझ्या कडेच परतणार आहोत}, सहाबांनी अल्लाह व पैगंबरांच्या आदेशाचे पालन केले, व म्हणाले:आम्ही ऐकले व आज्ञापालन केले, आम्ही तुझी क्षमा मागतो, व तुझ्या कडेच परतणार आहोत. जेव्हा मुस्लीमांनी हे शब्द उच्चारले आणी मनापासुन समाधानी झाले; तेव्हा अल्लाह ने आपल्या प्रेषितांवर सलामती असो त्यांच्यावर व त्यांच्या उम्मतवर दया दाखवत आयत अवतरविली:{पैगंबराने अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर ईमान आणले त्यावर जे त्याच्या पालनकर्ता कडुन त्याच्यावर अवतरीत करण्यात आले, आणी (मोमीन) श्रद्धावानांनी सुद्धा श्रद्धा बाळगली} अर्थात त्यांचे मुख व ह्रदय अल्लाह च्या आदेशाच्या अधिन झाले. {सर्वांनी अल्लाह वर त्याच्या दुतांवर त्याच्या ग्रंथांवर व त्याच्या पैगंबरांवर इमान आणले, तसेच आम्ही पैगंबरां दरम्यान फरक करत नाही}. आम्ही सर्वांवर ईमान ठेवतो {आणी त्यांनी सांगितले की आम्ही ऐकले} अर्थात तुझा आदेश ऐकला, {आज्ञापालन केले} चा अर्थ आहे आम्ही अंमलबजावणी केली, {हे आमच्या पालनकर्त्या! तुझी क्षमा मागतो} :चा अर्थ आहे, तुझ्याकडे माफी मागतो, {तुझ्याकडेच परतायचे आहे} चा अर्थ आहे, कयामतच्या दिवसी जेव्हा हिशेब सादर होईल, जेव्हा त्यांनी असे म्हटले:आणी अल्लाह च्या आदेशापुढे समर्पित झाले तेव्हा अल्लाह ने या उम्मत वर शथीलता उतरवली, आणी पहिल्या आयत ला रद्द करतांना, हुकुम दिला की:{अल्लाह कुण्या जिवावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे टाकत नाही} अर्थात त्याच्या प्रभुत्व व ताकत नुसारच हुकुम देतो, {त्याच्या} करिता आहे, जी नेकी त्याने कमावली,आणी {त्याच्या वर} त्याच्या पापाचे ओझे असेल, अल्लाह कुणालाच इतरांच्या गुन्ह्या मध्ये पकडत नाही, ना मनात येणाऱ्या शंकांवर पकडतो. मग दुआ शिकवली गेली, {हे प्रभु आम्ही जर विसरलो किंवा चुक केली तर आम्हाला त्यावर धरु नको} त्यावर अल्लाह ने फरमाविले की:होय, मी स्वीकार करतो. {हे आमच्या प्रभू! आमच्यावर असा कोणताही जड बोजा} कष्ट आणि ओझे टाकू नकोस, {जसा तू आमच्यापूर्वीच्या लोकांवर} , म्हणजेच बनी इस्राईल व इतरांवर टाकला होतास, मग अल्लाहने ही प्रार्थना स्वीकारली आणि म्हटले: होय, मी तसेच केले आहे. {हे आमच्या प्रभू! आमच्यावर असे कर्तव्य, परीक्षा आणि गोष्टी टाकू नकोस ज्यांना आम्ही हाताळू शकत नाही} अल्लाह म्हणाले: होय, मी तसेच केले आहे, {आणि आमचे पाप क्षमा कर} , त्यांना आमच्यापासून दूर कर, {आणि आम्हाला माफ कर} , आमच्या पापांवर दृष्टी ठेव आणि त्यांच्यापासून दुर्लक्ष कर, {आणि आम्हावर आपली व्यापक कृपा करा}, {तूच आमचा मावळणार} आणि आमचा स्वामी आहे; म्हणून{आम्हाला काफिर लोकां विरुद्ध} , पुरावे स्थापन करण्यास आणि विजय मिळविण्यास मदत कर, अल्लाहाने ही प्रार्थना स्वीकारली आणि म्हणाले: होय, मी तसेच केले आहे.فوائد الحديث
अल्लाह ची मुस्लीमांवर विशेष दया, आपल्या लाडक्या प्रेषितांमुळे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर] आहे, कारण अल्लाह ने स्पष्ट केले आहे की: {आणी आम्ही तुम्हाला समस्त जगवासीयांकरीता दया व क्रॄपा बनवुन पाठविले आहे} [अल अंबिया:१०७].
कुरआन करीम मध्ये नस्ख म्हणजे आदेश रद्द चे प्रमाण आहे, तसेच कुरआन मध्ये काही आयत आहेत, ज्यांचे पठण तर केल्या जाते परंतु त्यावर अंमलबजावणी केली जात नाही.
सहाबांचे महत्व की त्यांनी अल्लाह च्या आदेशा पुढे समर्पित झाले, नम्रता व प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर आदेशांची काटेकोरपणे पालन केले.
पैगंबरांची आपल्या समुदाया करिता खुप भिती की त्यांनी पुर्वीच्या समुदाया सारखे न बनावे, सर्वोच्च अल्लाह च्या आदेशांना पायमल्ली करण्याचा चोरमार्ग स्वीकारु नये.
अल्लाह च्या आदेशांना स्वीकारणे अनिवार्य आहे, तसेच त्याच्या आदेशांवर शंकाकुशंका उपस्थित करण्यापासुन वाचणे जरुरी आहे, कारण तसे करणे (अहले किताब) ग्रंथधारकांसोबत समानता दाखवते.
उम्मते मुहम्मदिया ची पुर्वीच्या समुदायांवर उच्चता दर्शविते, कारण त्यांनी आपल्या पैगंबराला उद्देशुन म्हटले होते:आम्ही ऐकले व नाफरमानी केली,
परंतु विद्यमान उम्मत ने उत्तर दिले:
आम्ही ऐकले व आज्ञापालन केले.
या उम्मत ची महत्ता, त्यांच्या पासुन तंगी व कठोर परिश्रम उचलण्यात आले,
दुआ स्वीकारली गेली कि नजाणतेपणात केलेल्या चुकांवर पकड नाही,
पुर्विचे कठोर ओझे संपुष्टात आले,
आणी सदर उम्मत वर त्यांच्या ऐपत पेक्षा जास्त ओझे टाकण्यात आले नाही.
सर्वोच्च अल्लाह आम्हाला त्या गोष्टींवर जबाबदार ठरवत नाही ज्याची ताकत आमच्यात नाही, व आमच्या ताकतीनुसारच आदेश देतो, मनात येणाऱ्या वाईट विचारांवर जोपर्यंत त्यावर आचरण करत नाही, त्याकडे मन झुकत नाही, आणी त्यावर अंमलबजावणी न केल्या गेली तर ते नुकसान पोहचवत नाही.
सर्वोच्च अल्लाह ने वरील दुआ ला आपल्या पैगंबर सलामती असो त्यांच्यावर व ईमानधारकांकडे उद्देशीत करुन, आपल्या अंतिम ग्रंथात नमुद केले; जेणेकरुन सदर दुआ प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर व सहाबा नंतर येणाऱ्यांची दुआ बनावी, एकंदरीत हेच कि हि दुआ त्या दुआपैकी आहे, जिचे पाठांतर व वारंवार तिचे पठण करणे जरुरी आहे.
