सर्वोच्च अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी केली की नम्रता अंगीकारावी, तुमच्यापैकी कुणीच एक दुसऱ्यावर अन्याय करु…

सर्वोच्च अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी केली की नम्रता अंगीकारावी, तुमच्यापैकी कुणीच एक दुसऱ्यावर अन्याय करु नये, व एक दुसऱ्यावर अहंकार करू नये

अयाज बिन हिमार रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<सर्वोच्च अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी केली की नम्रता अंगीकारावी, तुमच्यापैकी कुणीच एक दुसऱ्यावर अन्याय करु नये, व एक दुसऱ्यावर अहंकार करू नये>>.

[صحيح] [رواه مسلم]

الشرح

हा संदेश प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी सोबत्यासमोर सादर केला, संदेश असा आहे की: निसंकोच अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी पाठविली, लोकांवर अनिवार्य आहे की एकमेकांसोबत नम्रतेने वागावे, म्हणजे एकमेकांसाठी आपली मने सौम्य व मने नम्रतेने झुकलेले असावे, कुणी व्यक्ती आपल्या उच्च खानदान व आपल्या संपत्ती मुळे घमेंडीने वागु नये, व एकमेकांवर अत्याचार करु नये.

فوائد الحديث

सदर हदिस मधे नम्रा अंगीकारण्याची शीकवण देण्यात आली आहे, तसेच अहंकार व‌ गर्व चा निषेध केला आहे, लोकांना मोठेपणा दाखवणे मनाई प्राप्त आहे.

अन्याय व अत्याचार तसेच घमेंडीपणा व अहंकार ला लगाम घातला आहे.

अल्लाह खातर नम्रता दोन प्रकार ची असु शकते:

पहिला प्रकार असा की व्यक्ती ने इस्लाम समोर नतमस्तक व्हावे, धर्मा विरुद्ध अक्कडपणा बाळगु नये, ईस्लाम च्या शिकवणी चे पालन‌ करतांना स्वताला मोठे समजु नये,

दुसरा प्रकार:मानवाने सर्वच मानवजाती सोबत नम्रता व सौम्यतेने वागावे, अशी वागणुक कुठल्याच भितीपोटी नको व कुठल्याच फायद्यासाठी नको, तर फक्त आणी फक्त अल्लाह च्या मर्जी करता असावी.

التصنيفات

Praiseworthy Morals, Acts of Heart