वरचा हात खालच्या हातापेक्षा

वरचा हात खालच्या हातापेक्षा

इब्ने उमर रजिअल्लाहु अनहु द्वारा कथन आहे की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम मेंम्बर [प्रवचन]वर संबोधित करत होते, त्यात सदका [दानधर्म] व लोकांकडे प्रश्न न करण्याच्या विषयावर बोलत असतांना म्हणाले:<< वरचा हात खालच्या हातापेक्षा बेहतर आहे,व‌ वरचा हात खर्च करणारा आहे,तर खालचा हात मांगणारा आहे>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

मेंम्बर वर प्रवचन देताना, प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी दानधर्म व दुसऱ्या समोर हात पसरवण्याचा धिक्कार केला; आणी सांगितले की: जो व्यक्ती भलाई,सत्कर्मात च्या कामात आपला पैसा खर्च करतो, त्या व्यक्ती पेक्षा चांगला आहे जो फक्त लोकांकडे मागत राहतो.

فوائد الحديث

सदर हदिस वरुन सिद्ध होते की, सत्कर्मात खर्च करणे, एक उच्च कार्य आहे, दुसऱ्या कडे हात पसरवणे घाणेरडे कार्य आहे.

या हदिस मधे लोकांना न मागण्यावर भर देण्यात आला आहे, व स्वाभिमानी बाणा बाळगणे, व उच्चतम नैतिकता अंगीकारले, व निच्च क्रृत्यापासून दुर राहण्याची शिकवण देण्यात आली आहे, सर्वोच्च अल्लाह उच्चतम कार्याला पसंद करतो.

मानवी हात चार प्रकारचे आहेत,

अ) सर्वोत्तम हात तो आहे, जो खर्च करणारा आहे,अर्थात देणारा,

ब) त्यानंतर इतरांपासुन न घेणारा, स्वाभिमानी.

क) मग तो‌ हात जो न मागता,पण गरजे खातर घेणारा.

ढ) सर्वात खालच्या दर्जाचा हात ,तो आहे जो लोकांना मागतो.

التصنيفات

Voluntary Charity, Expenses