जर आदम च्या मुलांकडे सोन्याची दोन टेकडी असेल तर त्याची इच्छा असेल की त्याच्याकडे तिसरी

जर आदम च्या मुलांकडे सोन्याची दोन टेकडी असेल तर त्याची इच्छा असेल की त्याच्याकडे तिसरी

अबु मुसा अशअरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<जर आदम च्या मुलांकडे सोन्याची दोन टेकडी असेल तर त्याची इच्छा असेल की त्याच्याकडे तिसरी टेकड्या असाव्यात, आणी हकीकत ही आहे की त्याच्या मुखाला माती शीवाय अन्य कशानेच भरता येत नाही, आणी अल्लाह पश्चात्ताप करणाऱ्याची ची क्षमा स्वीकारतो>>.

[صحيح] [متفق عليه]

الشرح

पैगंबर सलामती असो त्यांच्यावर नी फरमाविले की: जर माणसाजवळ सोन्याने भरलेली एक दरी असेल तरीही त्याच्या हाव व लालसेमुळे त्याला अजुन एक म्हणजे दोन ची ईच्छा असेल, सत्य हे आहे की, नैसर्गिक लोभ त्याचा संपत नाही, ईथपावेतो की तो मरण पावतो, आणी त्याचं पोट कबरीच्या मातीनेच शेवटी भरते.

فوائد الحديث

मालमत्ता जमा करण्यात व भौतिक गरजा करता माणुस आंधळा होतो.

ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: या हदिस मधे जगाची लालसा व एक दुसऱ्यापुढे जाण्याची ओढ व अहंकाराचा धिक्कार केला आहे.

सर्वोच्च अल्लाह पश्चात्ताप करणाऱ्यांना व वाईट सवयी सोडणाऱ्यांना क्षमा करतो.

इमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की: सदर हदिस मधे आम मानवाचं अंतरंग दाखवण्यात आला आहे, याची सत्यता प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या या हदिस वरुन येते की:(अल्लाह पश्चात्ताप करणाऱ्याला क्षमा करतो).

التصنيفات

Blameworthy Morals, Condemning Love of the World